दुसरे काही करायची गरज भासणार नाही फक्त गुरुवारी करा ‘हे’ उपाय!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की आपल्या स्वामींना गुरुवारचा दिवस हा अत्यंत प्रिय असतो आणि म्हणूनच आपल्यातील अनेक जण या गुरुवारच्या दिवशी स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्याचबरोबर स्वामींचे कृपादृष्टी आपल्यावर हवे यासाठी स्वामींची सेवा व विविध उपाय करत असतात कारण मित्रांनो जर आपण स्वामींच्या या गुरुवारच्या दिवशी स्वामींची अगदी मनापासून पूजाअर्चा केली आणि त्याच बरोबर काही उपाय केले तर यामुळे आपल्यालाही त्याचा फायदा होत असतो. आणि मित्रांनो जर तुमच्या घरा मध्ये वारंवार होत असतील किंवा संबंधित अनेक अडचणी निर्माण होत असतील तर अशा वेळीही तुम्ही आपल्या वास्तुशास्त्रामध्ये गेले काही उपाय गुरुवारच्या दिवशी करू शकता.

मित्रांनो घरांमध्ये सुख-समृद्धी नांदते आणि पैशासंबंधी राहणाऱ्या सर्व अडचणी पासून आपली सुटका व्हावी यासाठी आणि तुम्हाला जर तुमचे भाग्य बदलायचे असेल तर गुरुवारी करा हे ५ उपाय. मित्रांनो जर तुमच्या पत्रिकेत गुरु ग्रह म्हणजेच बृहस्पतीशी निगडीत कुठलेही दोष असतील तर त्याच्या शांतीसाठी गुरुवारी विशेष पूजा केली जाते कारण मित्रांनो बृहस्पति देवांचे पण गुरू आहेत गुरु वैवाहिक जीवन व भाग्याचे कारक ग्रह आहे. येथे आम्ही तुम्हाला गुरु ग्रहाच्या पूजेचे पाच उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या वरचे सगळे दोष दूर होते. त्यातला पहिला उपाय गुरुवारी गुरु ग्रहाच्या निमित्ताने व्रत कराव.

म्हणजे गुरुवारी उपवास करावा. त्यात तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करावे आणि त्याचबरोबर या दिवशी बिना मीठाचे भोजन ग्रहण करावे. जेवणात पिवळ्या रंगाचे खाद्य पदार्थ जसे बेसनाचे लाडू आंबे केळी इत्यादी सामील करावे. आणि त्याचबरोबर मित्रांनो दुसरा उपाय बृहस्पतीची प्रतिमा किंवा फोटोला पिवळ्या वस्त्रावर विराजमान करावे. यानंतर पंचोपचार पूजा करावी. पूजेत केसरी चंदन पिवळे तांदूळ पिवळे फुल व प्रसारासाठी पिवळे पकवान किंवा फळ अर्पित करावीत. आणि आरती करावी. बृहस्पती यांची प्रतिमा ऑनलाइन सुद्धा मिळते.

मित्रांनो तिसरा आणि अत्यंत प्रभावी उपाय जो आपल्याला गुरूवारच्या दिवशी करायचा आहे तो म्हणजे गुरु मंत्राचा जप करावा मंत्र असा आहे ओम बृहस्पती नमः ओम गुरु बृहस्पति नमः मंत्र जपाची संख्या कमीत कमी १०८ म्हणजे संपूर्ण एक माळ असायला पाहिजे.चौथा उपाय गुरु ग्रहाची निगडित पिवळ्या वस्तूंचे दान करावे. पिवळी वस्तू जसे हळद चण्याची डाळ आंबा आणि अन्य. मित्रांनो पाचवा उपाय महादेवाला बेसनाचे लाडूचा प्रसाद गुरुवारच्या दिवशी अर्पण करावा.

तर पाच उपाय होते हे उपाय केल्याने धनसंपत्ती विवाह आणि भाग्य संबंधित सर्व अडचणी दूर होतात. आणि तुम्हाला सगळे उपाय करणे शक्य नसेल तर एक-दोन उपाय सोपे आहेत आणि जे तुम्हाला जमतील ते तुम्ही करू शकत असाल ते नक्की करावे. गुरु ग्रह आपल्या पत्रिकेत प्रसन्न राहतात. आणि आपल्यावर कोणतीही अडचण येत नाही आणि आपले भाग्य नक्की बदलते आणि त्याच बरोबर तुम्ही गुरूवारच्या दिवशी किंवा दर गुरुवारी हे उपाय केले तर यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी येण्यासाठी इतर कोणतेही उपाय करावे लागणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.