नमस्कार मित्र मैत्रिणींनो
मित्रांनो तुम्ही स्वामींचे भक्त असाल, स्वामींचे सेवेकरी असाल तर तुम्हाला माहीतच असेल की स्वामींच्या सेवेमध्ये, स्वामींच्या भक्तीमध्ये स्वामींना रोज नेवेद्य दाखवायचा असतो. मग तो नेवेद्य सकाळचा असेल दुपारचा असेल किंव्हा संध्याकाळचा असेल. बहुतेक दा दोन वेळेचा नेवेद्य आपण दाखवतच असतो.परंतु मित्रांनो नवीन सेवेकरांना यातील काहीच माहीत नसते की स्वामींनी नेवेद्य दाखवायचा असतो.
परंतु मित्रांनो आजची माहिती खूप महत्वपुर्ण आहे. कारण आज आम्ही तुम्हाला गुरुवारच्या दिवशी दाखवला जाणार स्वामींचा नेवेद्य दाखवणार आहे. हा विशेष नेवेद्य जर रोज तुम्ही स्वामींना दाखवत असाल तरी तुम्ही दार गुरुवारी हा नेवेद्य दाखवू शकता आणि जर तुम्ही स्वामींना नेवेद्य ठेवतच नसाल तर तुम्ही फक्त गुरुवारी नेवेद्य नक्की ठेवा आणि तो सकाळी असेल, दुपारी असेल, संध्याकाळी असेल फक्त गुरुवारी ठेवा. मित्रांनो नेवेद्य कोणता ठेवायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की स्वामींचा वार हा गुरुवार आहे. ज्या दिवशी विशेष पूजा केली जाते, नेवेद्य दाखवला जातो आणि हा नेवेद्य असतो गोड नेवेद्य म्हणजे पुरणपोळी, खीर किंव्हा शिरा आणि पुरी.
या पैकी तुम्हाला जे जमेल तो नेवेद्य गुरुवारी करायचा आहे आणि स्वामींना हा नेवेद्य दाखवायचा आहे. हे जमले नाही तर चपाती आणि दूध हा नेवेद्य दाखवला तरी चालेल परंतु मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा काहींना काही नेवेद्य दार गुरुवारी दाखवायचाच आहे. मग तो कधीही दाखवा. स्वामी भक्तांनी प्रेमाने केलेलं सर्व काही ग्रहण करतात. कोणताही नेवेद्य दाखवताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नेवेद्य दाखवताना तो प्रेमाने, मनाने, कोणतीही मनामध्ये अपेक्षा न बाळगता दाखवला पाहिजे.
आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या स्वामींना दाखवलेला कोणताही नेवेद्य स्वामी अगदी मनापासून स्वीकार करत असतात आणि ते आपल्या भक्ताने प्रेमाने आणि पूर्ण भक्तीने विश्वासाने केलेले सर्व काही ग्रहण करतात. पण त्यामध्ये काही चुकीची भावना नको आहे, आपुलकीने तुम्ही स्वामींची काही करत आहेत हे जास्त महत्वाचे आहे. स्वामी नक्कीच तुमचा हा प्रेमाने दिलेला नैवेद्य ग्रहण करून खुश होतील आणि त्यांची कृपा दृष्टी सदैव राहील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.