नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते, काहीतरी मागणं असतं जी पूर्ण होण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते. आज आपण आपलं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणता मंत्र जप करावा याविषयी माहिती घेणार आहोत. शिवपूराणामध्ये तसेच अनेक प्रकारच्या हिंदू धर्म ग्रंथामध्ये स्वतःच घर त्या घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी काही उपाय दिले आहे आणि विशेष करून काही खास उपाय दिले जाते. प्रत्येक मनुष्याचं एक स्वप्न असतं की आपलं स्वतःच घर असावं त्या घरामध्ये आपण आपलं कुटुंब आपलं मुल राहावीत कोणाचंही आपल्यावर बंधन नसावं अगदी आपल्या मनाला वाटेल त्याप्रकारे आपल्या घरात स्वतःचा घरात राहू शकतो,
आणि यासाठी अगदी दिवस रात्र अनेकजण प्रयत्न करतात, आणि कष्ट करतात, पैसा जमवतात मात्र कधी कधी अनपेक्षित संकट येतात अशा काही बाधा निर्माण होतात की आपलं घराचं स्वप्न अपूर्ण राहत. अनेकदा आपल्याला कर्ज मिळत नाही किंवा बँका ते कर्ज मंजूर करत नाहीत, व्यवस्थित जागा मिळत नाही, किंवा ज्या ठिकाणी तुम्ही जागा पाहता मात्र म्हणावी तशी जागा वास्तूशास्त्रानुसार मिळत नाही,
आणि त्याचबरोबर अनेक प्रकारच्या अडचणी येतात, कधी कधी आपल्या अगदी जवळची माणसं आपल्या या स्वप्नाच्या आड येताना दिसून येतात. मित्रांनो कोणत्याही समस्या असुद्या की ज्या तुमच्या घराच्या स्वप्नाच्या आड येत आहेत जर तुम्ही मनापासून तुमचं घर होण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि तुमच्या मार्गात जर बाधा येत आहेत, अडचणी येत आहेत. तर मित्रांनो या एका मंत्राचा जप अवश्य करावा या मंत्राचा जप केल्याने घराचं स्वप्न पूर्ण होत घराचं सुख लाभत. मित्रांनो हा मंत्र जप करण्यासाठी आपण आपल्या घरात ही या मंत्राचा जप करू शकता किंवा जवळपास जर गणपतीमंदिर असेल, मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण गणपतीमंदिरात या मंत्राचा जप केला तर अत्यंत प्रभावी ठरतो.
मित्रांनो तो मंत्र पुढील प्रमाणे आहे,
“ओम विघ्नेश्वराय नमः ओम विघ्नेश्वराय नमः”
भगवान गणेश आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांचा अधिक प्रभावी मंत्र आहे आणि हा या मंत्राचा जप करत आपण तांब्याभर जल अर्पण शिवलिंगावर करायचा आहे आणि या मंत्राचा जप करत चमेलेची म्हणजे मोगऱ्याची काही फुलंसुद्धा आपण शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत. आपण ११ चमेलेची फुलं घ्या मोगऱ्याची फुलं घ्या आणि प्रत्येक फुल अर्पण करताना “ओम विघ्नेश्वराय नमः” हा या महामंत्राचा जप करा आणि जो काही नैवेद्य असेल तो त्या ठिकाणी आपण अर्पण करा.
आणि मित्रांनो मनोभावे हात जोडून घरा संबंधित असणाऱ्या सर्व समस्या दूर व्हाव्यात आणि आपलं स्वतःच घर बनावं यासाठी गणपती पप्पांकडे आणि त्याचबरोबर भगवान शंकराकडे प्रार्थना करा आणि मित्रांनो या उपायाची सुरुवात केव्हाही करू शकता परंतु दररोज मनोभावे तुमच्या घरा जवळ असणाऱ्या गणपतीमंदिरात जा आणि जर तुमच्या घराजवळ गणपतीमंदिर नसेल किंवा मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर आपल्या घरात जी महादेवाची जी पिंड आहे आणि मंत्राचा जप करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना आणि त्याचबरोबर भगवान शंकरांच्या पिंडीला नमस्कार करून हाच उपाय आपण दररोज मनोभावे करायचा आहे सकाळी ही करू शकता किंवा अगदी दिवसभरात कधीही केला तरी ही चालेल मित्रांनो हा उपाय आपलं घराचं स्वप्न नक्की पूर्ण करेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.