नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात स्त्रियांना लक्ष्मीचे रूप समजले जाते आणि असे म्हटले जाते की आपल्या घरातील स्त्रिया आपल्या घराला म्हटले तर ते घराला स्वर्ग करू शकते किंवा नरक सुद्धा करू शकते. संपूर्ण सृष्टी ही स्त्री जातीवर अवलंबून आहे. असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एका स्त्रीचा हात असतो ,ते खरेच आहे. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी महिलांनी रोज सकाळी हा एक उपाय नक्की करायला हवा. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला लगेच याचा फरक दिसायला सुरुवात होईल.
तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही, या बरोबरच तुमच्या पतीचे आयुष्य वाढेल आणि तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये चांगली प्रगती होईल. मुलांचे भविष्य अगदी आनंदात जाईल आणि घरामध्ये सुख समाधान प्राप्त होईल आणि मित्रांनो खास करून विवाहित महिलांनी हा उपाय करायला हवा, हा उपाय अविवाहित महिलांनी केला तरी चालणार आहे. हा उपाय तुम्ही तुमच्या पतीसाठी किंवा मुलांसाठी करू शकता किंवा दोघांसाठी केला तरी चालणार आहे.
हा उपाय तुम्हाला पहाटे लवकर उठून करायचा आहे, सकाळी लवकर अंघोळ करून तुम्हाला देवघरामध्ये बसायचं आहे, रोजची नित्यनेमाची पूजा करून घ्यायची आहे. देवाला दिवा लावायचा आहे आणि अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर महिलांनी रोज सकाळी रामरक्षा वाचायचे आहे, रामरक्षा हि स्वामी समर्थांच्या नित्यसेवा पोथीमध्ये दिली गेली आहे, या बरोबरच इंटरनेटवर सुद्धा तुम्हाला ही रामरक्षा मिळणार आहे.
महिलांनी रोज सकाळी एक वेळेस रामरक्षा वाचायची आहे, रामरक्षा वाचून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पतीसाठी आणि मुलांसाठी प्रार्थना करायची आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं संकट येऊनये यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील एक चिमूटभर साखर घ्यायची आणि ती आपल्या घराच्या एका कोपऱ्यामध्ये किंवा दाराच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवायची आहे.
त्यानंतर आपण जी अगरबत्ती देवाला लावली असेल त्याची निघालेली राख म्हणजेच विभूती आपल्या पतीच्या आणि मुलांच्या कपाळी टिळा म्हणून लावायची आहे. मित्रांनो हा उपाय केल्यामुळे तुमच्या पतीच्या जीवनामध्ये प्रगती होईल आणि आयुष्यामध्ये उंची मिळवण्यासाठी नवीन मार्ग खुले होतील, तसेच मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागेल आणि त्यांची अभ्यासामध्ये चांगली प्रगती होईल आणि त्याच बरोबर जर घरावर कोणत्याही वाईट शक्तीचे संकट आले असेल तर ते निघून जाईल, घरामध्ये कायम सकारत्मक वातावरण खेळत राहील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.