नमस्कार मित्र- मैत्रिणींनो,
मित्रांनो आज मी तुम्हाला अश्या चमत्कारिक वृक्षांबद्दल माहिती देणार आहे जी तुमच्या आयुष्यातील वेगवेगळी संकटे नष्ट करून टाकतील. तर मित्रांनो आपल्या अवतीभवती अशी भरपूर वृक्ष आहेत ज्यांची पूजा केल्याने अनंत पुण्य कमवायची संधी देतात व अनेक संकटांचे निवारण करण्यासाठी मदत करतात.
आज पर्यंत तुम्ही झाडांपासून फळे, फुले, ऑक्सीजन , लाकूड इत्यादी बाबी आपल्याला मिळतात असे ऐकले. निसर्गामध्ये प्रत्येक संकटाच निवारण असते.पण तुम्हाला शास्त्रात काय लिहिले आहे ते मी आज सांगणार आहे जे तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरेल. आज जी माहिती मी सांगणार आहे ती आजपर्यंत तुम्ही कधीच वाचली नसेल.
मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की कोणत्या वृक्षाची पूजा केल्याने आपल्या विविध समस्या आपण संपवू शकतो.
सर्वप्रथम वृक्ष आहे तुळस तुळसीमातेला धार्मिक महत्व किती आहे हे आपण जाणून आहोत. ज्या घरात तुळसीमातेची रोज पुजा केली जाते ते घर लक्ष्मी माता कधीच सोडून जात नाही त्या घरात सुख समृद्धीची नदी वाहत असते याचे कारण विष्णू व लक्ष्मी मातेची क्रुपा त्या घरावर होत असते.
पुढील वृक्ष आहे पिंपळ मित्रानो पिंपळाच्या वृक्षाला हिंदू धर्मात खूप विशिष्ट स्थान दिलेले आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते आपल्या मागे असलेली साडेसाती निघून जाते व विष्णूची अखंड क्रुपा राहते.जर का तुम्हाला पितृदोष असेल तर यावरही या झाडाचा खूप प्रभाव असल्याने पितृदोष मुक्त होण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी.
यानंतरचे वृक्ष हे वडाचे आहे या झाडाची पूजा केल्याने स्त्री चे सौभाग्य अखंड राहण्यास मदत होते व संतान संबंधी समस्यांचे निवारण होण्यास मदत होते. यानंतर बेलाचे वृक्ष ज्या वृक्षाची पाने महादेवाला अर्पण करण्यासाठी वापरली जातात व असेही म्हणतात की बेलाची पाने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केली जातात बेलवृक्षाची पूजा केल्याने नोकरीत बढतीचे योग लवकर येत असतात व अकाली मृत्यूपासून रक्षण होते.
मित्रांनो जर का तुम्हाला धन संबंधात खूप अडचणी येत असतील तर तुम्ही आवळा या वृक्षाची पुजा लाभदायक ठरेल. याने धनलाभ होणे व प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता असते. जर का तुम्हाला आरोग्य संबंधित समस्या उद्भवत असतील तर तुम्ही अशोक वृक्ष या झाडाला नियमित पणे पूजा करणे गरजेचे आहे.
तुम्हाला जर का गुरू संबंधित समस्या येत असतील तर तुम्ही केळी या झाडाची पूजा करणे योग्य ठरेल याने तुम्हाला एक योग्य मार्गदर्शक मिळण्याची अपेक्षा असते. व लक्ष्मी नारायणाची कृपाही तुमच्यावर राहील. जर का तुम्हाला शत्रू वर विजय मिळवायचे असेल तर शमी वृक्षाची पूजा करा त्याने तुमचे कोर्ट केस किंवा विरोधकांवर मात करू शकाल. व रखडलेली सर्व कामे पूर्ण होण्यास मदत होते. मित्रांनो जर का तुमच्या कुटुंबात एकोपा व सुख नसेल तर लाल चंदन खूप लाभदायक ठरेल त्याने तुमच्या कुटुंब निरोगी राहण्यास मदत होते.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.