17 मे मोठा मंगळवार : रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिट काढून बोला ‘हे’ शब्द , घरात येईल सुख समृद्धी!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मंगळवार हा श्री हनुमानांचा वार, हनुमानजींची पूजा आराधना केल्याने त्याचे पूर्ण फळ प्राप्त होते. श्री हनुमान आपल्या सर्व कष्टांचे निवारण करतात म्हणूनच त्यांना संकटमोचन असेही म्हणतात.तसेच श्री हनुमानाची भक्ती करणाऱ्या व्यक्तीला कशाचेही भय राहत नाही. त्या व्यक्तीचे सगळे रोग मुक्त होतात. त्याच्या कुंडलीमध्ये असणारे ग्रह सुद्धा त्याचे काही हि बिघडवू शकत नाही आणि जी व्यक्ती हनुमानांची पूजा करते , मनोभावे त्यांची आराधना करते , श्रद्धा ठेवते त्या व्यक्तींचे शनिदेव सुद्धा अनिष्ठ करू शकत नाही. या संबंधित शास्त्रामध्ये कथा आहे की रावणाने सर्व ग्रहांना पराभूत करून पायाखाली ठेवले. त्यामुळे सर्व देवी देवतांमध्ये हाहाकार माजला आणि त्यानंतर यावर देवी देवतांनी एक योजना बनवली.

मित्रांनो नारद मुनी रावणाकडे गेले आणि सर्वात प्रथम त्याची स्तुती करू लागले आणि रावणाला म्हणाले कि ज्याला आपण पराभूत करतो त्याच्या कमरेवर नाही तर छातीवर पाय द्यावा. रावणाला नारद मुनींचे म्हणणे पटले. तेव्हा त्याने आपला पाय ग्रहांवरून थोडासा बाजूला केला आणि सर्व ग्रहण उलटे होण्याचा आदेश दिला.हि संधी साधून शनी देवांनी आपली वक्री दृष्टी रावणावर टाकली आणि त्याच क्षणापासून रावणाच्या मागे शनी दशेला आरंभ झाला. रावणाला हे सगळे लक्षात आले आणि तो खूप क्रोधीत झाला.

आणि त्यानंतर रावणाने शनी ला शिवलिंगावर अशा प्रकारे बांधले कि शनी शिवलिंगावर पाय दिल्याशिवाय खाली उतरू शकत नव्हता. कारण रावणाला माहीत होते कि शनिदेव हे शिव भक्त आहे. ते शिवलिंगावर पाय कधीही देणार नाही, शनिदेव तिथे अडकले होते पण रावणाचा शनी दशेला आरंभ झाला होता. पुढे झाले असे कि हनुमानजी सीता मातेला शोधात होते. तेव्हा शनी देवांनी हनुमानजींना प्रार्थना केली कि त्यांनी शिवलिंगावर आपले मस्तक ठेवावे जेणेकरून मस्तकावरून पाय ठेवून त्यांना खाली उतरता येईल. यामुळे हनुमानजी म्हणाले कि माझ्यावर शनीचा काय दुष्परिणाम होईल.

तेव्हा त्यांना शनिदेव म्हणाले कि ज्याच्या मस्तकावर पाय देईल त्याच्या घर संसाराची ताटातूट होईल आणि हे करण्यासाठी हनुमानजी लगेच तयार झाले कारण त्यांना माहित होते कि त्यांचा कोणताही घर परिवार नाहीये. हनुमानजीने त्यावर आपले मस्तक ठेवले आणि शनिदेवांनी त्याच्यावर पाय ठेवून खाली उतरले. या उपकाराच्या बदल्यामध्ये शनी देवांनीं हनुमानजींना वर मागायला सांगितला आणि तेव्हा हनुमान म्हणाले तुम्ही कधीही माझ्या भक्तांवर अनिष्ठ कृपा करणार नाही. शनिदेव सुद्धा यावर तथास्तु म्हणाले. त्यामुळे हनुमान भक्ताचे शनिदेव कधीच वाईट करणार नाही.

म्हणूनच मित्रांनो जर तुम्ही सुद्धा हनुमानजींची प्रार्थना केली किंवा मनोभावे त्यांची पूजा केली तर तुमच्या कुंडलीमधले शनी देव किंवा ग्रह काही हि बिघडवू शकत नाही. हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला एक मंगळवारी रात्री एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र झोपण्यापूर्वी तुम्हाला बोलायचा आहे , हा मंत्र तुम्हाला ५ किंवा २१ वेळा बोलायचा आहे.

दीन दयाल बिरिदु संभारी |
हरहु नाथ मम संकट भारी ||

हा उपाय अत्यंत मनोभावे , पूर्ण श्रद्धा ठेवून , भक्तिभावाने करायचा आहे. जेणेकरून तुम्हाला त्याचा १०० % फरक जाणवेल. मंगळवारी रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र नक्की म्हणा आणि जीवनामध्ये सुख व समृद्धीसाठी प्रार्थना करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *