आपले कुटुंब सुखी आणि समाधानी राहण्यासाठी रोज संध्याकाळी करा ‘हे’ एक काम !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या सर्वांना एक सुखी व समाधानी कुटुंब हवे असते त्यांना हव्या त्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण अहोरात्र कष्ट करून पैसे कमावत असतो. परंतु तरीही कुटुंबातील काही व्यक्तीमध्ये एक नाराजी किंवा असमाधान असते. बाहेरील कामाचा ताण हा रागाच्या स्वरूपात घरच्यांवर निघत असतो पैशांनी आपण आपल्या कुटुंबात आनंद व समाधान हे विकत घेऊ शकत नाही त्यासाठी मानसिक शांतता महत्त्वाची असते.

परिवारातील प्रत्येक जण आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो. जसे कुटुंबातील कर्ता हा पैसे कमवून तर गृहिणी घर व्यवस्थापन करून आपले कर्तव्य बजावत असतात. पण फक्त आयुष्य घालवण्यात व जगण्यात फरक असतो. पैसे कमावण्याच्या या धावपळीच्या जीवनात आपण फक्त आणि फक्त पैसे कमवायच्या मागे असतो.

खरे तर जगण्यासाठी पैसा लागतो परंतु आपण पैश्यासाठी जगात असतो फक्त पैसेच महत्त्वाचे आहेत का हो कुटुंब आनंदी व सुरक्षित ठेवण्यासाठी, अध्यात्म, मनःशांती या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत का ? पैसा हा जगण्यासाठी, सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाचा असतो परंतु सुखी जगण्यासाठी तर मनःशांती महत्त्वाची असते मनःशांती मिळवण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक साधा उपाय आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे.

आपले कुटुंब आनंदी व सुरक्षित राहण्यााठी तुम्हाला एक काम रोज नित्य-नियमाने करायचे आहे. रोज अंघोळ करून देवपूजा करते वेळेस हे एक काम केल्याने कुटुंबातील सर्व दुखांचे निवारण होउन जाईल तर मित्रानो हे काम करण्यासाठी आपल्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांच नित्यसेवा हे पुस्तक असणे गरजेचे आहे.

जर तुमच्याकडे नित्यसेवा हे पुस्तक असेल तर त्यामधे एकदम सोपे कालभैरव अष्टक दिलेले आहे. हे कालभैरव अष्टक तुम्हाला रोज संध्यकाळी तुम्हाला देवघरासमोर वाचायची आहे. संपूर्ण एकाग्रतेने निर्मळ मनाने व शांत चित्ताने कालभैरव अष्टकाचे वाचन करायचे आहे. कुटुंबातील कोणीही व्यक्ती हे कार्य करू शकते.

वाचन करण्याअगोदर देवघर स्वच्छ करून तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावलेला असावा त्याबरोबरच महत्त्वाचे म्हणजे अगरबत्ती लावणे आवश्यक आहे. कालभैरव अष्टक वाचून झाल्यानंतर अगरबत्तीची उदी सर्व कुटुंबातील सदस्यांनी ती टिळा म्हणून लावावे हे कार्य वाचून झाल्यावर न चुकता करावे. हे कार्य रोज नित्यानियमाने केल्याने तुमचे कुटुंब सुखी आणि समाधानी राहतील.

वनी माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *