नमस्कार मित्र, मैत्रिणींनो
आपल्या आयुष्यात अनेक संकटे एकाच वेळी आपल्यावर ओढावतात जसे की कार्यालयातील कामकाजाचा दबाव, व्यवसायातील तोटा, कमी वेतन व याबरोबरच जर का कुटुंबातील व्यक्ती आजरी पडली तर खूप त्रास होत असतो. म्हणजे बघा कामात मन नाही लागणार तसेच घरी गेल्यावर जर कुटुंब आनंदी नाही हे पाहून अजूनच वाईट वाटतं.
आर्थिक तंगी व आरोग्यास विकार होणे यामागे कुलदेवता असते तिची पूजा न केल्याने अशी संकटे येतात. तर यावर उपाय म्हणजे आपल्या कुलदेवतेला नियमित पने पूजा अर्चना करणे जेणेकरून कुलदेवी प्रसन्न होईल कुलदेवतेची पूजा न करणे भरपुर वेळा संकटात आणते.
मित्रानो आज मी जो मंत्र सांगणार आहे तो सगळ्या कुलस्वामींना प्रसन्न करण्यासाठी जपला जातो. जो मंत्र मी सांगणार आहे याचा वापर घरातील सगळे सदस्य करू शकतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा लाभदायक असतो त्याबरोबरच विवाहित महिला असतील किंवा अविवाहित मुली व विधवा स्त्रियाही या मंत्राचा वापर करू शकतात.
कुलदेवीची भरपूर सेवा जमत नसेल तर ह्या मंत्राचा जप करायला हवा या मंत्राचा जप तुम्ही कधीही करू शकता जसे सकाळी दुपारी संध्याकाळी झोपण्याआधी कधीही करू शकता कुठलेही नियम व अटी नाहीत. या मंत्राच नाव आहे निवारणा मंत्र हा मंत्र सगळ्या कुलदेवी साठी जपला जातो तुमची कुलदेवी कोणतीही असो हा मंत्र चालेल तर आता मी मंत्र सांगतो.
‘ ॐ ऐं – व्ही क्लीन चामुंडाय विखै ‘
या मंत्राचा दिवसातून कितीही वेळा जप केला तरीही चालेल व जर का तुम्हाला वेळ मिळत नसेल तर कमीत कमी १ ते ८ वेळा तर कमीत कमी हा मंत्र जपला पाहिजे खुपत खूप 5 मिनिटे लागतील या मंत्रात सगळ्या देवींचे नाव घेतले जाते जसे सरस्वती, महालक्ष्मी , महाकाली तुला माझा कोटी कोटी नमस्कार असो असा या मंत्राचा अर्थ होतो. व सर्व बीजमंत्र असल्याने हे मंत्र खूप पवित्र आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.