तुमच्याही मनात वाईट विचार येत असतील, खूप टेन्शन असेल तर आवर्जून ‘हे’ 1 काम करा!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

तुमच्याही मनात नेहमी वाईट विचार येत असतील किंवा तुम्हाला खूप जास्त टेन्शन असेल तर तुम्ही सुद्धा एक काम करा. श्री स्वामी समर्थ महाराज सर्व काही ठीक करतील. जेव्हा आपले काम पूर्ण होत नाही तेव्हा आपल्या मनात वाईट विचार येतात किंवा आपल्याला कोणती वस्तू किंवा कोणती गोष्ट हवी असते ती वस्तू ,एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही तेव्हा आपल्या मनात वाईट विचार येतात आणि आपण कुठेतरी खूप प्रयत्न करतोय पण तरी आपल्याला यश मिळत नाही किंवा मेहनत करून सुद्धा आवश्यक फळ मिळत नाही तर अश्यावेळी आपल्याला खूप जास्त टेन्शन सुद्धा येतात आणि मनात वाईट विचार सुद्धा येतात.

आपल्याला यासाठी आपल्या मनावर नियंत्रण ठेवायचे आहे कारण कोणतेही टेन्शन असू द्या किंवा वाईट विचार असू द्या हे मनातून जाण्यासाठी आज आपण उपाय करणार आहोत. मित्रांनो आपल्या स्वामी सेवेमध्ये याचा एक प्रभावी उपाय मार्ग सांगितला गेला आहे. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुमच्या मनात खूप वाईट विचार येत आहे किंवा तुम्हाला खूप जास्त टेन्शन आहे किंवा कोणत्याही गोष्टीची तुम्ही खूप जास्त चिंता करत आहात तेव्हा तुम्ही हा एक मार्ग निवडा आणि एक गोष्ट करा.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही दिवशी, कोणत्याही वारी कोणत्याही वेळी स्वामींच्या मूर्तीसमोर,फोटोसमोर बसायचे आहे किंवा कसा वेळ मिळेल तसे तुम्ही केंद्रात जाऊन बसू शकतात, मठात जाऊन बसू शकतात किंवा तुमच्या घरा स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो असेल तर त्याच्या समोर तुम्ही बसू शकतात आणि जर मूर्ती फोटो नसेल तरी तुम्ही कोणत्याही एका शांत जागेवर जाऊन डोळे बंद करून बसू शकतो आणि स्वामींना बघण्याचा प्रयत्न करा कारण आपण ज्या श्रद्धेने विश्वासाने स्वामींचे सेवेकरी असू तर डोळे बंद केल्यानंतर आपल्याला स्वामी नक्की दिसतील.

बाकीच्या इतर लोकांना डोळे बंद केल्यानंतर अनेक दुसऱ्या गोष्टी दिसतात.आपण कुठेतरी फिरायला जातो ,टीव्ही बघतो, अश्या वेगळ्या मनात गोष्टी सुरू असतात परंतु त्या गोष्टी बंद करायचे आहेत. फक्त आपल्याला स्वामी समर्थांना बघायचे आहे. स्वामी कसे दिसतात? स्वामींचा फोटो कसा आहे? स्वामी ची मूर्ती कशी आहे ? हे बघण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप सुरु करा.

हा उपाय आपल्याला फक्त पाच मिनिट करायचे आहे. रोज पाच मिनिट तुम्ही कुठेही असाल, केंद्रात ,घरी कुठे स्वामी यांच्या फोटो च्या समोर असाल किंवा नसाल तरी तुम्ही जिथे असाल तिथे शांत बसा शांत जागेवर बसला सकाळी उठून बसा. मित्रांनो असे केल्याने काही दिवसातच तुमच्या मनात जे वाईट विचार येतात ते एकदमच नाहीसे होतील आणि कधी भविष्यात येणार सुद्धा नाही. वाईट विचार तुमच्या मनात येतील तेव्हा स्वामी असतील. टेन्शन येणार नाही. सगळं काही ताण तणाव नष्ट होईल. तुमच्या मनात फक्त स्वामी असतील आणि टेन्शन वाईट विचार हे स्वामी महाराज तुमच्या मनात कधीच येऊ देणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.