नमस्कार मित्र- मैत्रिणींनो,
मित्र- मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माहित आहे की मंत्रा मध्ये किती ताकद आहे. असे काही मंत्र आहेत की ज्यामुळे अनेक अशक्य गोष्टीही आपण शक्य करू शकतो. तुम्हीही या मंत्राद्वारे तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. तुमच्या घरी धनदौलत पैसा यांची भरभराट करून घेऊ शकता.
मित्र- मैत्रिणींनो, आपणाला येणाऱ्या असंख्य अडचणी आणि संकटा मधून तुम्ही मुक्त होऊ शकता. कृष्ण मंत्र असुदे, दुर्गा मातेचा मंत्र असू दे, ग्रीन तारा असू दे किंवा रेड तारा असू दे, बीजमंत्र असो अगर गायत्रीमंत्र असो या सर्वात मंत्रांमध्ये एक अदभूत शक्ती आहे जादू आहे जी तुमच आयुष्य बदलू शकते.
या मंत्रांचा तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने उच्चारण केले, नामस्मरण केले, जप केला तर तुम्हाला यापासून नक्कीच फायदा मिळेल.
मित्र- मैत्रिणींनो, आम्ही तुम्हाला एका शब्दाचा मंत्र सांगणार आहे जो तुमचा आयुष्य जादू प्रमाणे बदलून टाकेल. याआधी तुम्ही सर्व उपाय करून पाहिले असतील सर्व टोटके करुन पाहिले असतील पण आज मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे तो एकदा करून पहा आणि अनुभूती घ्या.
पण त्यापूर्वी तुमच्या मनात आहे की माझ आयुष्य बदलणार नाही. मी असाच संकटात राहणार. मला नेहमी अडचणीच येणार. मला कधीही सुख-शांती आयुष्यात मिळणार नाही हे नकारात्मक विचार आहेत ते अगोदर मनातून काढून टाका.
जोपर्यंत तुम्ही सकारात्मक विचार करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही तुमच्या संकटातून अडचणीतून मार्ग दाखवू शकणार नाही आणि कधीही तुम्ही या संकटरूपी जंजाळातून बाहेर येऊ शकणार नाही, अडचणीवर मात करू शकणार नाही म्हणून मनात आधी सकारात्मक ऊर्जा तयार करा.
मित्र- मैत्रिणींनो, जाणून घेऊया हा एका शब्दाचा मंत्र… तो आहे ‘विघ्नेश्वराय’. त्याच्या आधी ओम लावायचे नाही कि नमो नम: लावायचा नाही फक्त ‘विघ्नेश्वराय’ हा एक शब्द हा एकच मंत्र..
या एकाच शब्दाच्या मंत्राद्वारे तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकाल. हो पण जर तुम्ही असं म्हणाल की आज हा मंत्र म्हटला तर उद्या मला पन्नास हजार मिळतील. एक लाख मिळतील तर असं कधीच होणार नाही.
कष्टाला पर्याय नाही, मेहनतीला पर्याय नाही तुम्ही तुमचे काम करत रहा मेहनत करत रहा तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
तुम्हाला असं वाटेल की आज हा मंत्र म्हटल्यानंतर उद्याच माझ लव मॅरेज होईल. तर असं कधीच होणार नाही हा मंत्र तुम्ही रोज भक्तिभावाने म्हटला तर महिन्याने कदाचित तुम्हाला यश मिळेल. तुमचं लग्न होईल. आई-वडील लग्नाला विरोध जर मान्य करत नसतील तर ते सुद्धा तुमच्या बाजूने उभे राहतील.
मात्र तुम्हाला नोकरी हवी असेल, तुमचा इंटरव्यू असेल, मित्र बोलत नसेल मैत्रिणी बोलत नसेल तर ते बोलतील अशी छोटी -मोठी कामं मात्र या मंत्राने लगेच साध्य होतील.
तुम्ही म्हणाल हा मंत्र कसा म्हणावा तर याला कुठलीही अट नाही कुठलीही शर्थ नाही, कोणताही नियम नाही. तुम्ही कुठेही बसून म्हणा, उभारून म्हणा, झोपेत म्हणा, झोपेतून म्हणा, कशाही पद्धतीने हा मंत्र जप करत राहा.
फक्त विघ्नेश्वराय विघ्नेश्वराय विघ्नेश्वराय
मनापासून म्हणा. कितीही वेळा म्हणा, कुठेही म्हणा कोणतीही अट नाही कुठलाही उपवास नाही, कोणताही नियम नाही, कुठल्याही वेळी हा तुम्ही हा मंत्रजप करून तुम्ही तुमचा आयुष्य बदलू शकता. आपणाला हवे ते यश प्राप्त करून घेऊ शकता.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारित एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
मित्र- मैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी आणि तुमची भरभराट होण्यासाठी आवश्यक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या पेजला सतत भेट देत राहा. आपल्या मित्र -मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा याबद्दल माहिती द्या आणी पेजला लाईक करून कमेंट करा, शेअर करायला विसरू नका.