नमस्कार मित्र मैत्रिणींनो
मित्रांनो, तुमच्या देवघरातील दिव्याची वात जर या दिशेला असेल तर आपल्या घरात कधीच पैसा टिकणार नाही. कुठल्याही कामात यश मिळणार नाही.यामुळे अशी विविध अनेक कारणे घडतील की ज्यामुळे आपले नुकसानच नुकसान होत राहील. असे होऊ नये यासाठी ही वात कोणत्या दिशेला ठेवावी याची माहिती आज आपण घेणार आहोत.
मित्रांनो, आपल्या देवघराचे, तसेच देवाचे तोंड कुठल्या दिशेला असावे? घरातील देवांची मूर्ती कुठल्या देवाची कुठल्या दिशेला ठेवावी? देव पूजा झाल्यानंतर गंध आपल्या कपाळाला कुठल्या बोटाने व कुठे योग्य ठिकाणी लावावा?मित्रांनो याचबरोबर घरातील दिवा किंवा वात कोणत्या दिशेला लावावी? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये तयार होत असतात. याची सविस्तर माहिती मिळतेच असे नाही. मात्र शास्त्रानुसार या गोष्टींना खूप महत्त्व आहे.
आपल्या देवा जवळील वात कुठल्या दिशेला लावावी. ज्याचा आपणाला चांगला फायदा होईल. कुठल्याही कामात लवकरात लवकर यश मिळेल. नुकसान होणार नाही. पैसे टिकतील. याबाबतची मुख्य माहिती घेऊ.माहितीला सुरुवात करण्यापूर्वी एक मुखी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की घरातील देवांच्या मूर्तीचे तोंड हे दक्षिण दिशेला कधीही करू नका.
यामुळे मृत्यूचे योग संभवतात. कारण या दिशेला यमराजाची दिशा असेही काही शास्त्रात नमूद करण्यात आली आहे.मित्रांनो, आपल्या घरातील देवपूजा करताना काही अडचणी येत असतात. कितीही अडचणी आल्या तरी आपली पूजा ही आपण मन एकाग्र करून केली पाहिजे.
काही वेळेला आपल्या घरातील लहान मुलेच आपणाला पूजेच्या वेळी त्रास देतात. या वेळी हा विषय जरी आला तरी देवांना तो मान्य असतो. कारण लहान मुले म्हणजे देवाचीच रूप असतात.
मित्रांनो, देवपूजेतील दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या घरात काही देवाच्या खराब मूर्ती किंवा प्रतिमा असतील तर त्या ताबडतोब बदलाव्यात. त्या ठिकाणी नवीन मूर्ती किंवा प्रतिमा आणून ठेवाव्यात. आणि या जुन्या खराब झालेल्या मूर्ती व प्रतिमा यांनी नवे वाहत्या पाण्यातच सोडाव्यात. वाहते पाणी जवळ उपलब्ध नसल्यास पिंपळाच्या झाडाखाली या खराब मूर्ती व प्रतिमा नेऊन ठेवाव्यात.
देव पूजा झाल्यानंतर जो गंध लावतो आपण तो गंध नेहमी आपणा स्वतःला लावताना मधल्या मोठ्या बोटाने लावून घ्यावा. आणि देवाला लावताना करंगळी च्या बाजूचे बोट आहे त्या बोटाने लावा.
मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशात तसेच वेगवेगळ्या शास्त्रानुसार आपण आपल्या घरातील देवाजवळ जे दिवे लावतो, समयी लावतो.
किंवा पणती लावतो ते नेहमी एक किंवा तीन किंवा 5 अशा विषम संख्येत लावावेत. याच बरोबर हा दिवा किंवा पणती ठेवण्याची दिशा ही दक्षिण दिशा कधीही असू नये.दक्षिण दिशेला दिवा ठेवल्याने किंवा लावल्याने घरात वारंवार वेगवेगळ्या समस्या निर्माण होत राहतात. काही प्रसंगांमध्ये मृत्यू देखील ओढवला जाऊ शकतो.
आपल्या घरातील दारिद्र पणा किंवा आजारपण हे लवकर हटत नाही. येणाऱ्या पैशांना नेहमीच काहीना काही वेगळ्या कारणाने खर्च जोडला जाऊ शकतो. आणि आपल्या घरातील लक्ष्मी टिकत नाही. घरामध्ये सदैव नकारात्मक ऊर्जा निर्माण होत राहते.
तर मित्रांनो, आपल्या लक्षात घ्या की आपणाला घरातील दिवा किंवा पणती ही नेहमी दक्षिण दिशेला कधिही लावू नये. घरातील देवपूजा ही मन एकाग्र करून करावी.
मित्रांनो, याच बरोबर आपल्या घरामध्ये एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो असल्यास काय करावे? देवघर कुठल्या दिशेला असावी इत्यादी प्रकारच्या वेगवेगळ्या शास्त्रानुसार माहितीसाठी आमच्या पेजला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
विविध उपाय, वास्तुशास्त्र, स्वप्न शास्त्र याशिवाय स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातील वेगवेगळ्या पद्धतीची, वेगवेगळ्या समस्यांवर उपाय याची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला सातत्याने भेट देत रहा.