नोकरीतून, व्यवसायातून, कमाईतून आलेला पैसा टिकण्यासाठी रविवारी करा ‘हे’ उपाय : माता लक्ष्मी प्रसन्न होईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो हिंदू धर्मात प्रत्येक दिवस म्हणजे प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो आणि त्याचबरोबर मित्रांनो रविवारी सूर्याची पूजा केली जाते. यासोबतच देवी लक्ष्मीचीही पूजा केली जाते. असे मानले जाते की रविवारी काही विशिष्ट उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. तुम्हालाही देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर रविवारी काही उपाय करू शकता. आज आपण जाणून घेऊया की रविवारी कोणते उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा होते आणि धन आणि धान्याचा वर्षाव होतो.

सर्वात आधी मित्रांनो रविवारच्या दिवशी तुम्हाला लवकर उठून स्नान करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये आपण ज्या पद्धतीने देवपूजा करतो त्या पद्धतीने देवपूजा करून घ्यायचे आहे आणि देव पूजा झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला सूर्य देवतेला सकाळच्यावेळी प्रसन्न वातावरणामध्ये सूर्य देवतेला जल अर्पण करायचे आहे मित्रांनो सकाळच्या वेळी सूर्य देवतेला म्हणजेच सूर्यनारायण देवाला जर आपण जल अर्पण केले आणि ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप केला तर यामुळे सूर्यदेवता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या कुंडलीमध्ये असणाऱ्या सर्व समस्या दूर करते म्हणूनच मित्रांनो रविवारच्या दिवशी उठल्यानंतर सर्वात आधी आपल्याला स्नान झाल्यानंतर सूर्य देवतेला अर्पण केले पाहिजे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो रविवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली चतुर्मुखी दिवा लावल्याने धन-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते. असे केल्याने माता लक्ष्मीची भक्तांवर सदैव कृपा राहते आणि रविवारी पूजा केल्यानंतर घरातील सर्व सदस्यांच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावावा. असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि रविवारच्या दिवशी पिठाचे गोळे करून माशांना खाऊ घालणे शुभ मानले जाते. हा उपाय केल्याने घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही.
देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर रविवारी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला गाईच्या तुपाचा दिवा लावावा.

त्याचबरोबर मित्रांनो रविवारी सायंकाळी शिवमंदिरात गौरी शंकराची पूजा करून त्यांना रुद्राक्ष अर्पण करावा.
रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या पानावर तुमची इच्छा लिहून वाहत्या पाण्यात टाकल्यास तुमची मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे आणि मित्रांनो कोणतेही काम करताना अपयश येत असेल तर रविवारी झोपण्यापूर्वी एक ग्लास गाईचे दूध आपल्या उशाशी ठेऊन झोपावे. नंतर सकाळी देवीची पूजा करून त्या दुधाचे सेवन करावे.
रविवारी तीन नवीन झाडू खरेदी करून देवीच्या मंदिरात ठेवा.

परंतु मित्रांनो हे करत असताना तुम्हाला कोणी पाहणार नाही आणि हटणार नाही याची काळजी घ्या. हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी धनाचा वर्षाव करते असे मानले जाते.
सूर्यदेव आणि देवी लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी रविवारी ‘आदित्य हृदया श्रुत’ चे पठण करावे. याचे पठण केल्याने घरात सदैव समृद्धी नांदते. रविवारी मुग्यांना खाऊ घालणे देखील शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी मुंग्यांना साखर खाऊ घालावी.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *