घरात भरपूर पैसे येण्यासाठी आलेले पैसे टिकण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी करा ‘हे’ एक काम!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या जीवनामध्ये धन प्राप्ती व्हावी अशी इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये असते परंतु हे धन प्राप्त करताना आपल्याला मेहनत सुद्धा करणे गरजेचे आहे.मेहनती शिवाय सारे अशक्य असते त्यामुळे मानवी जीवनात धनसंपत्ती ला खूप महत्त्व आहे. ते धन केवळ माता लक्ष्मी च्या कृपेमुळेच आपल्याला प्राप्त होऊ शकते. अनेक लोक असे म्हणतात की फक्त उपाय करून जर पैसा मिळाला असता तर कष्ट करण्याची गरज नाही परंतु मित्रांनो तुम्ही बघितले असेल की काही लोक खूप कष्ट करतात परंतु त्यांच्याकडे खूप कमी पैसा असतो आणि काही लोक कमी कष्टात देखील भरपूर पैसा कमावतात.

मेहनतीशिवाय आपल्याला फळ मिळणार नाही पण या मेहनती बरोबरच आपल्या कष्टा बरोबरच आपल्या नशिबाची साथ मिळणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. आपण जे कार्य करतो करतो, कष्ट करतो त्याचा योग्य मोबदला आपल्याला मिळावा यासाठी माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर असणे खूपच महत्त्वाचे आहे. माता लक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवारचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो.

या दिवशी जर आपण माता लक्ष्मीची पूजा केली तर आपल्यावर माता लक्ष्मीची पूर्ण कृपा होते तसेच आपल्याला धनसंपत्ती आणि वैभव प्राप्त होते म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणते उपाय केले पाहिजे. लक्ष्मीच्या कृपेशिवाय धन प्राप्ती होणे अशक्य आहे तरी आपल्या धन प्राप्त झाली तरी ते टिकून राहत नाही.

ते धन टिकून राहावे आपल्या कष्टाचे चीज व्हावे, त्याचा योग्य मोबदला आपल्याला मिळावा यासाठी शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी आपल्याला एक गाईच्या तुपाचा दिवा आपल्या घरात प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हळदी-कुंकू लावून माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. या पूजेमध्ये विशेष करून लाल रंगाचे फूल आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे.

ही सर्व पूजा झाल्यानंतर दूध आणि गूळ यापासून तयार केलेला कोणताही गोड पदार्थ लक्ष्मीला नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे. मित्रांनो यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते तसेच जेव्हा आपण माता लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा त्या पूजेमध्ये सर्व यंत्राना देखील विशेष महत्त्व दिले जाते मग ते श्रीयंत्र असो की लक्ष्मी अष्टक यंत्र किंवा कुबेर यंत्र असेल याची देखील पूजा विशेष फलदायी ठरते.

मित्रांनो शास्त्रात सांगितल्याप्रमाणे यंत्राची जर आपण पूजा केली तर त्याच्या प्रभावाने तुमच्या धन संपत्तीत वाढ होते तसंच सुखप्राप्ती सुद्धा होते. मित्रांनो तुम्हाला जर शक्य असेल तर आपले जे घर आहे त्या घराच्या ईशान्य कोपर्‍यात किंवा आपल्या देव्हाऱ्यात श्रीयंत्राची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर त्या यंत्राची नियमित पूजा करायचे आहे. मित्रांनो असे केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.

माता लक्ष्मी च्या सोबतीने कुबेर देवता हे देखील धनसंपत्तीचे देवता आहे, मान्यतेनुसार पृथ्वीतलावरील सर्व धनसंपत्ती ही कुबेर यांच्या मर्जीनुसार कार्य करत असतात. कुबेर देवतेला प्रसन्न करून घेतले तर आपल्या जीवनात धनप्राप्तीचे योग जुळून येतात त्यामुळे आपल्या घरातील देव्हारात श्री कुबेर यांची पूजा करावी यामुळे कुबेर यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील.

आपल्या जीवनामध्ये कधीच धनाची कमतरता भासणार नाही. याचबरोबर आपल्याला शुक्रवारच्या दिवशी श्रीसूक्त पठाण करायचे आहे आणि माता लक्ष्मी यांच्या कोणत्याही मंत्राचा आपण अकरा वेळा एकवीस वेळा किंवा १०८ वेळा जप करु शकतात मित्रांनो हे उपाय जर तुम्ही नियमित प्रत्येक शुक्रवारी केले तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. आपल्या जीवनात जी काही आर्थिक समस्या असते, काही दुःख असतील तर ते देखील नाहीशी होतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *