महामृत्युंजय मंत्राचे तिर्थ कसे प्यावे? सगळे आजार रोग बरे होतात!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो देवांचे देव महादेव यांना मृत्यूचे देवताही मानले जाते. यांचे एक नाव महाकाल असेही आहे. यामुळे महादेवाला स्मशान निवासी असेही म्हणतात. शिवपुराणासहित विविध ग्रंथांमध्ये महामृत्युंजय मंत्रांविषयी सांगण्यात आले आहे. महादेवाला प्रसन्न करायचे असल्यास या मंत्राचा जप सर्वोत्तम मानण्यात आला आहे. एखादा व्यक्ती खूप आजारी किंवा जखमी असेल तर त्याच्या रक्षणासाठी या मंत्राचा संकल्प प्रभावी मानण्यात आला आहे. ग्रंथानुसार या मंत्र जपाने अकाल मृत्यू योग टाळता येऊ शकतो.

आणि मित्रांनो असेही मानले जाते की, जो माणूस सतत महामृत्युंजय मंत्राचा जप करतो, त्याचा आत्मा घेऊन यमलोकी जाण्यासाठी यमराजाला परत एकदा विचार करावा लागतो असे शिवपुराणात सांगितले गेले आहे. तो लवकरच भक्तांची हाक ऐकतो आणि त्यांचे दुःख दूर करतो. भगवान शिव भक्तांवर लगेच प्रसन्न होतात. जटाधारी शिवशंकर यांना संतुष्ट करण्यासाठी कोणत्याही मनुष्याला अडचणींचा सामना करावा लागत नाही. शास्त्रात असे म्हटले आहे की, महादेवांच्या महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने सर्व त्रास दूर होतात आणि यापुढे यमराजालासुद्धा हार मानावी लागते.

मित्रांनो तुम्हीही या मंत्राचा जप करणार असाल आणि यापासून मिळणाऱ्या फायद्यांसाठी लाभ घेणार असाल तर यासाठी सोमवारी किंवा प्रदोष तिथीला महामृत्युंजय मंत्राचा जप करणे योग्य मानले जाते. हे दोन्ही दिवस भगवान शिवाचे मानले जातात. या दिवशी महामृत्युंजय मंत्र जप केल्याने विशेष फायदे होतात. यासाठी सकाळी लवकर आंघोळ करावी. चांगले विचार व आत्मशुध्दीने पूजास्थळावर भगवान शंकरासमोर आसन ग्रहण करावे. तुपाचा दिवा लावावा आणि नंतर महामृत्युंजय मंत्राचा जप किमान १०८ वेळा हातात चंदनाची माळ घेऊन करावा. त्यानंतर, भगवान शिवाचे स्मरण करावे आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करावी.

मित्रांनो तुमच्या घरांमधील एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल एखाद्या व्यक्तीला वारंवार आरोग्य संबंधित समस्या उद्भवत असतील तर अशावेळी मित्रांनो आपल्याला
आपल्या देवघरासमोर बसून एका तांब्याच्या पात्रांमध्ये किंवा तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या द्यावा हत्या ची मधली तीन बोटे आपल्याला त्यात तांब्यामध्ये अलगदपणे उडवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला 108 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे मित्रांनो डाव्या हाताची मधली तीन बोटे तुम्हाला त्यात तांब्यामध्ये पाण्यात बुडवायचे आहे आणि उजव्या हाताने जप माळेच्या साह्याने तुम्हाला 108 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला महामृत्युंजय मंत्र आणि त्यानंतर मंत्र म्हणून झाल्यानंतर घरामध्ये जी व्यक्ती आजारी आहेत त्या व्यक्तीला पिण्यासाठी द्यायचा आहे मित्रांनो जोपर्यंत ती व्यक्ती निरोगी होत नाही किंवा तुमच्या घरामध्ये ज्या आरोग्य संबंधित समस्या आहेत त्या पूर्णपणे नष्ट होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला हा छोटासा उपाय तुमच्या घरा मध्ये दररोज अगदी न चुकता मनापासून करायचा आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *