मे २०२२ ‘या’ चार राशींना लागणार लॉटरी, येणार राजयोग, तर या चार राशींचे होणार मोठे नुकसान!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मे २०२२ या महिन्यात बनत असलेली नक्षत्रांची ग्रह दशा काही राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार असून काही राशिंवर याचा नकारात्मक प्रभाव दिसून येईल. एकूणच बनत असलेल्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा चार राशींवर अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे आणि त्यांच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होणार असून पैशाची बचत होईल. धन लाभ होण्याची इच्छा पूर्ण होतील. याच्या जीवनातील वाईट दिवस संपणार आहे. तर चार राशींच्या जीवनात राजयोगाचे संकेत आहेत. सुख समृद्धी सौभाग्य आणि ऐश्वर्यात वाढ होणार आहे. सर्वच कामासाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे.

सर्वच क्षेत्रात त्यांना यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. हाती घेतलेली कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. करियर, कार्यक्षेत्र सामाजिक, कला, साहित्य नोकरी अशा क्षेत्रांत यांना भरघोस यश प्राप्त होईल. तर इतर चार राशींसाठी मात्र मे महिना त्रासदायक ठरणार आहे आणि यांच्या जीवनात अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एकूण आठ राशींसाठी हा महिना लाभदायक ठरणार असून चार राशींसाठी मात्र नकारात्मक ठरणार आहे. तर या राशींना कोणते फळ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी : मेष राशीसाठी मे महिना शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. सुर्य, गुरु, शुक्र आणि शनि हे आपल्यासाठी शुभ फल देणार आहेत. नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा आहे. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून नोकरीची कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील आणि या काळात राजकीय दृष्ट्या अनेक लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतात. प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे. आरोग्याची चांगली प्राप्ती होईल आणि आरोग्य उत्तम राहील.

वृषभ राशी : वृषभ राशीसाठी मे महिना अडचणीचा किंवा त्रास देणारा ठरू शकतो. सूर्य आणि बुध हे आपल्याला शुभ फल देणार असून मंगल शुक्र राहु आणि हर्षल हे अडचणीत वाढ करणार आहेत. उद्योग-व्यापार आत काही अडचणी येऊ शकतात. या काळात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या काळात आपल्याला हितशत्रू पासून त्रास होऊ शकतो. त्यामुळे शत्रूवर नजर ठेवून राहणे आवश्यक आहे. या काळात बरे पण आणि वागणे सोडून द्यावे लागेल.

मिथुन राशी : मिथुन राशीसाठी मे महिना सर्व दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गुरु, शुक्र, केतू, हर्षल हे आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. उद्योग व्यापारात भरपूर प्रमाणात लाभ होईल. भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे. भागीदारीमध्ये सुरू केलेल्या व्यवसाय पुढे चालून लाभदायी ठरू शकतो आणि राजकारणात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. या काळात कुणावरही अति विश्वास ठेवू नका. या काळात स्वतःच्या बुद्धी आणि विकासाचा वापर करणे विशेष महत्त्वपूर्ण आहे.

मित्रांनो त्यानंतर ची पुढची रास आहे ती म्हणजे कर्क राशी,कर्क राशीसाठी मे महिना मिश्र फलदायी ठरण्याची संकेत आहेत. काही कामात अडचणीत वाढ होणार असून काही कामात अपेक्षेपेक्षा जास्त यश प्राप्त होऊ शकते. हाती घेतलेली कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. या काळात तरुण तरुणीचा जीवनात विवाहाचे योग जमून येतील आणि आपल्या नातेवाईकांसोबत किंवा मुलांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात.

सिंह राशी : सिंह राशीसाठी मे महिना शुभ फलदायी ठरणार आहे. गुरु, शुक्र, शनि आणि राहू हे आपल्यासाठी शुभ फल देणारे आहेत. कुटुंबातील लोकांवर आपले प्रेम वाढणार आहे किंवा कुटुंबातील सदस्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहात. पारिवारिक सुखात वाढ होणार आहे आर्थिक खर्च वाढू शकतो आणि उद्योग व्यापारात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून या काळात भरभराट होईल. या काळात नवीन योजना बनणार आहेत. या काळात काही तरी सहली निमित्त प्रवास घडू शकतो.

मित्रांनो यापुढची रास आहे ती म्हणजे कन्या राशी, कन्या राशीसाठी हा काळ अडचणीचा ठरणार आहे. या काळात भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद वाढू शकतात. या काळात भागीदारीत कटकटी होऊ शकतात. आर्थिक प्राप्ती साठी आपल्याला धावपळ करावी लागेल. या काळात आपल्याला कुशाग्र बुद्धीचा वापर करून सोबतच रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

तुळ राशी : तुळ राशीसाठी मे महिना अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. याकाळात मंगळ बुध गुरु आणि शुक्र हे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. नोकरीत आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे हितशत्रू पासून सावध राहणे मात्र आवश्यक आहे आणि या काळात संततीची काळजी घेणे फारच आवश्यक आहे. उद्योग धंद्यात भरपूर यश प्राप्त होणार आहे. सहकारी या काळात आपल्याला मदत करतील.

पुढची रास आहे ती म्हणजे वृश्चिक राशी, मे महिना वृश्चिक राशीसाठी संमिश्र ठरू शकतो. नोकरीच्या कामात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. एखादा छोटा लघुउद्योग सुरू करण्यासाठी काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. हाती घेतलेल्या कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. आर्थिक कामात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. तरी अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल.

त्यानंतरच्या पुढच्या राशी आहेत त्या म्हणजे धनु आणि मकर राशी : धनु आणि मकर राशि साठी मे महिना लाभकारी आहे होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधान कारक ठरणार आहे. या काळात आश्चर्य करणाऱ्या अनेक गोष्टी घडून येणार आहेत. आरोग्याची देखील विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तरुण तरुणीचा जीवनात विवाहयोग जुळून येतील. परिवारामध्ये सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो मीन राशीसाठी मे महिना अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. उद्योगधंद्यांमध्ये आर्थिक आवक वाढणार आहे. या महिन्याच्या शेवटी काळ अनुकूल बनत आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळ आपल्यासाठी शुभ ठरू शकतो आणि कुंभ राशीसाठी फेब्रुवारी महिना थोडासा अडचणीचा ठरू शकतो. त्या काळात मनाला हवे तसे यश प्राप्त होणार नाही. उद्योग व्यापारात अडचणी घडू शकतात. मित्रमंडळींची हवी तशी मदत आपल्याला मिळणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *