नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो हिंदू धर्मात तुळशीच फार महत्त्व आहे. तुळशीला आपण देवी मानतो. श्रीहरी विष्णूंना तुळस अतिप्रिय आहे. तुळस अर्पण केल्याशिवाय श्रीहरी विष्णू ची पूजा संपन्न होत नाही. तसेच श्रीहरी विष्णूंना कोणतेही नैवेद्य अर्पण करताना त्यात तुळशीचे पान टाकले जाते आणि माता तुळशीचा केवळ दर्शनानेच आपली सर्व पापे नष्ट होतात. आणि दोष निवारण होते. धर्मशास्त्रानुसार दररोज सकाळी तुळशीला पाणी अर्पण करून तुळशीचे पूजन करावे. संध्याकाळी तुळशीपुढे शुद्ध तुपाचा दिवा लावावा. त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी संपन्नता येते.
घरात सकारात्मक ऊर्जा येते. दाराच्या दोन्ही बाजूला तुळशीचे रोप लावले असता घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही. घरातील सकारात्मक ऊर्जा यामुळे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो. ते आपल्या घरात स्थायी रूपात राहतात आणि मित्रांनो जर मुले आपले म्हणणे ऐकत नसतील हट्टी पणा करत असतील. तर आपल्या घराच्या पूर्व दिशेला तुळस लावावी. त्या तुळशीचे पूजन त्या मुलांना करायला सांगावे. तुळशीपुढे मुलांना दिवा लावावयास सांगावा. यामुळे मुलांचा हट्टीपणा कमी होतो. मुले आपले म्हणणे ऐकू लागतात.
दररोज दोन ते तीन तुळशीचे पाने मुलांना खावयास दिल्यास मुलांचे मन शांत राहते. त्यांचा स्वभाव बदलतो. मन एकाग्र होऊन अभ्यासात लक्ष लागते आणि पूर्वीच्या काळी सर्वांच्या अंगणात तुळस असायची परंतु मित्रांनो आता अनेक जणांना हे सर्वांना शक्य होत नाही. परंतु गॅलरीमध्ये स्वतःवर अंगणात कुठे तरी तुळशीचे रोप नक्की असावे. त्यांच्या घरात दिवस असते त्यांच्या घरी समृद्धी नांदते. त्यांच्या घरात हिरवीगार झालेली टवट्वीत तुळस असते त्या घराची सदैव भरभराट होते. आणि माता लक्ष्मी श्रीहरी विष्णू यांची कृपा बरसत राहते.
मित्रांनोबआपल्या घरात काही आर्थिक अडचणी असतील संकटे असतील घरात कलह असतील किंवा अन्य काही कारणाने समस्या असतील मतभेद वाद विवाद असतील तर अशा सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हा उपाय करा. हा उपाय साधा सोपा असून तुम्हाला हा उपाय गुरुवारच्या दिवशी करायचा आहे.
आणि मित्रांनो गुरुवारच्या दिवशी दिवशी संध्याकाळी तुळशीचे पूजन करून तुळशी समोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. आणि मित्रांनो आता आपण गुरूवारच्या दिवशी तुळशी मातेचे पूजन कसे करावे याबद्दल माहिती पुढीलप्रमाणे. मित्रांनो सगळ्यात आधी संध्याकाळी तुळशी माते पुढे नतमस्तक होऊन शुद्ध तुपाचा दिवा लावावा. तुळशी मातेला लाल रंगाचे फूल अर्पण करावे. गुलाबाचे फुल असेल तर अति उत्तम. देवीला लाल व पिवळ्या रंगाची फुले अतिप्रिय आहेत. सौभाग्य अलंकार अर्पण करावे.
पूजन करत असताना ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः’ व ओम तुळशीदेवै नमः या मंत्रांचा मनात मंत्र उच्चार करावा. लाल रंगाची ओढणी देवीला अर्पण करावे. मनोभावे नमस्कार करावा व मनात आपले जे काही इच्छा अडचण आहे ती निवारण करण्यासाठी बोलून दाखवावे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही दर गुरूवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरासमोर असणाऱ्या तुळशीसमोर तुपाचा दिवा लावला तर यामुळे तुळशी माता तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करील आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि घरांमध्ये सुख-समृद्धी नांदेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.