सर्व प्रकारची विघ्न नष्ट करण्यासाठी, गणपतीची कृपा मिळवण्यासाठी करा बुधवारी करा ‘हा’ एक उपाय

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गणपतीची कृपा आपल्यावर होण्यासाठी करावयाचे विशेष उपाय काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की कोणत्याही गोष्टीचा शुभारंभ करताना प्रथम स्थान गणेशाचे आहे गणेशाला वंदन करूनच आपण आपल्या कोणत्याही कामाची सुरुवात करतो. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी कोणते विशेष उपाय करू शकतो याची माहिती आपण पाहणार आहोत.

मित्रांनो संकष्ट चतुर्थी दर महिन्याला येते पण बुधवारी येणारी संकष्ट चतुर्थी विशेष योग घेऊन येणारी असते. गणपतीचा वार बुधवार आहे. या दिवशी येणारी संकष्टी खूप महत्त्वाची आहे.

मित्रांनो गणपतीचा वार बुधवार आहे या दिवशी आपण जर गणपतीची या विघ्नहर्त्याची पूजा केली तर आपली सर्व संकटे विघ्ने दूर होतात. यासाठी मी तुम्हाला नऊ उपाय सांगणार आहे यामुळे आपल्यावर गणपतीची कृपादृष्टी होईल.

चला तर पाहूया कोणते आहेत ते उपाय..

  1. पहिला उपाय आहे गणपतीची कृपा मिळवण्यासाठी आपला जीवनसाथी काळजीत असेल अडचणीत असेल तर त्याचा प्रभाव आपल्या नात्यावरही होत असतो. यासाठी एक सुटी दोरा घेऊन तो गणपतीसमोर ठेवा आणि ओम विघ्नेश्वर आय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर त्या दोऱ्याला थोड्या थोड्या अंतरावर सात गाठी बांधायचे आहेत. आणि हा दोरा आपल्याजवळ ठेवायचा आहे त्यामुळे आपल्या साथीदाराची जी काही समस्या असेल काळजी असेल ती दूर होईल.
  2. मित्रांनो आपल्या व्यवसायात बिजनेस मध्ये नोकरीत काही समस्या असतील अडचणी असतील तर बुधवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन मूग दान करावेत आणि गणेश चाळीशीचा पाठ करावा असे केल्याने तुमच्या व्यवसायातील बिझनेस मधील लोक येतील ज्या काही समस्या असतील त्या दूर होतील.
  3. मित्रांनो आपल्याला आयुष्यात जर सर्वश्रेष्ठ, बहादुर म्हणून आपली ओळख व्हायचे असेल किंवा सर्वांनी आपला सर्व श्रेष्ठ किंवा महान किंवा एक सर्वात चांगली व्यक्ती म्हणून समाज समाजात ओळख हवी असेल. तर संकष्ट चतुर्थी दिवशी गणपतीला शेंदूर अर्पण करावे आणि गुळ- तूप एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा. त्यामुळे आपल्याला सन्मान बल व प्रतिष्ठित म्हणून प्राप्ती होते.
  4. मित्रांनो नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आपले बॉस किंवा उच्च अधिकारी यांच्याशी आपले संबंध चांगले नसतील किंवा पटत नसतील किंवा ते आपल्याला त्रास देत असतील. तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीसमोर आसन मांडून बसावे आणि श्री गणेशाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणावा आणि जास्वंदीची फुले अर्पण करावीत.
  5. वैवाहिक जीवनातील गोडवा टिकून राहायचं असेल तर या दिवशी आपण गणपतीला हळदी तूप मिसळून त्याचा तिलक करावा आणि तुपाचा दिवा लावावा.
  6. कुटुंबात सुख समाधान टिकून राहायचं असेल आणि नात्यात गोडवा टिकून राहायचं असेल तर गणपतीला संकष्ट चतुर्थीला खीर मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गं गणपतये नमः हा मंत्र 108 वेळा जपावा.
  7. आपल्या जीवनात प्रगती होण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला कुंकू आणि अक्षदा मिसळून तिलक करावा आणि ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा’ याचा अकरा वेळा जप करावा जीवनात प्रगती अवश्य होते.
  8. मुलांच्या शिक्षणा संबंधी जसे की कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काही अडचणी येत असतील किंवा अभ्यास करताना काही समस्या येत असतील तर नारळाला एक लाल कपडा गुंडाळून तो गणपतीच्या चरणी वहावा तो तुम्ही घरी किंवा मंदिरातही वाहू शकता त्यामुळे तुमच्या शिक्षणासंबंधी च्या सर्व अडचणी दूर होतील.
  9. विद्येच्या क्षेत्रात म्हणजे आपल्या अभ्यासात प्रगती व्हावी आपण चांगले गुण मिळावेत असे वाटत असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीला दुर्वांच्या सात जोड्या व्हाव्यात. आणि सुखकर्ता दुखहर्ता ही आरती म्हणावी किंवा तू मला गणपतीचे जे काही स्त्रोत मंत्र येत असेल किंवा कोणती आरती येत असेल तर ती म्हणावी.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *