अक्षय तृतीया पूजेचा शुभ मुहूर्त : या वेळेस करा घरात पूजा : महत्त्वाची माहिती!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या प्राचीन संस्कृती, परंपरांमध्ये साडेतीन मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत. त्यापैकी एक अक्षय्य तृतीया असल्यामुळे यालाही अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही. म्हणून ही तिथी अक्षय्य मानली गेली आहे. देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य होते. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो सर्व पापांतून मुक्त होतो, अशी मान्यता आहे. या दिवशी विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.

अक्षय्य तृतीया दिनी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची विशेष पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या पूजनामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते, अशी मान्यता आहे. वास्तविक या दिनी सोने खरेदीचा सल्ला दिला जातो. नेहमीप्रमाणे प्रातःविधी उरकल्यानंतर पूजनाचा संकल्प करावा आणि एका चौरंगावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची प्रतिके ठेवावीत. दोन्ही देवतांचे आवाहन करावे. पंचामृत अभिषेक आणि मुख्य अभिषेक झाल्यानंतर दोन्ही देवतांना हळद-कुंकू वाहावे. उपलब्ध फुले अर्पण करावीत. तुळशीची पाने वाहावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी.

आणि त्यानंतर घरातील सदस्यांना प्रसाद वाटून पूजेची सांगता करावी आणि त्याचबरोबर तुम्हाला जे काही होईल ते सर्व दान करावे कारण मित्रांनो या दिवशी उष्णतेपासून दिलासा देणाऱ्या गोष्टी दान करणे शुभ मानले जाते. असेही म्हटले जाते की, या दिवशी जे काही दान केले जाईल, त्या सर्व गोष्टी पुढील आयुष्यात प्राप्त होतील. म्हणून बरेच लोक या दिवशी सोने-चांदी देखील दान करतात आणि त्याचबरोबर मित्रांनो अक्षय्य तृतीयेचा हा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी कपडे, सोन्या चांदीचे दागिने, वाहन, घर, मालमत्ता इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते.

परंतु मित्रांनो नवीन वस्तू खरेदी करत असताना किंवा घरामध्ये पूजा करत असताना आपल्याला या दिवशी शुभ मुहूर्ताची वेळ माहित असणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो जर आपण या दिवशी असणाऱ्या शुभमुहूर्तावर घरामध्ये पूजा केली किंवा त्याच बरोबर ज्या काही नवीन वस्तूंची आपण खरेदी करणार आहोत ही या वेळेमध्ये केली तर हे अत्यंत शुभ मानलं जातं म्हणूनच मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्यावेळी शुभमुहूर्ता असेल ते वेळा मध्येच आपल्याला शुभ काम करून घ्यायचा आहे आणि त्याच बरोबर आपल्या घरामध्ये देवपूजा किंवा नवीन वस्तूची खरेदी आपल्याला या वेळातच करायची आहे.

ग्रहण आता आपण जाणून घेऊयात की अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्ताची वेळ कोणती आहे ती तर मित्रांनो सकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिट ते दुपारी 12:18 पर्यंत शुभ मुहूर्त आहे म्हणूनच मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी साडे पाच वाजल्यापासून दुपारी साडेबारा पर्यंत आपल्याला महत्त्वाची कामे आणि त्याच बरोबर भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर ज्या काही नवीन वस्तूंची आपण खरेदी या दिवशी करणार आहोत ती खरेदीही मित्रांनो आपल्याला या सकाळच्या वेळी मध्येच करून घ्यायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *