अक्षय तृतीयेला जर सोने खरेदी करू शकत नसाल तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी घरात आणा!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो अक्षय्य तृतीयेचा दिवस हा वर्षातील साडे तीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी मुहूर्त न काढताही लग्न, मुंज, गृहप्रवेश, नवीन कार्याची सुरुवात, घर-गाडी खरेदी यासारखी शुभ कार्ये करता येतात. हा दिवस खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो. विशेषतः सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकतात, शुभ परिणाम देतात आणि त्यामध्ये वाढ होते. यावेळी ३ मे रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो जर आपल्याला या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते, परंतु सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे या दिवशी सोने खरेदी करणे जवळपास अशक्य आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल, तर अन्य काही गोष्टी देखील आहेत ज्या खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते. या गोष्टींमुळे लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचाही आशीर्वाद मिळतो. म्हणूनच मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शक्य नसेल तर आपल्याला कोणत्या वस्तू आपल्या घरामध्ये आणायचे आहे किंवा लक्ष्मी मातेला अर्पण करायचे आहे याबद्दल सविस्तर पणे माहिती आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शक्य नसेल तर या दिवशी जव खरेदी करू शकता. जव खरेदी करणे देखील सोने खरेदी करण्यासारखेच शुभ मानले जाते. हे जव भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करा. नंतर लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. तुमच्या घरातील धन-संपत्ती दिवसेंदिवस वाढत जाईल आणि देवीला कवड्यांची माळ आवडते. अक्षय्य तृतीयेला कवड्यांची माळ देवीला अर्पण करा. मित्रांनो कवड्यांची माळ तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल आणि त्याच बरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ही कवड्याची माळ ऑनलाईन सुद्धा मागवु शकता.

मित्रांनो या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करा आणि दुसऱ्या दिवशी कवड्यांची माळ लाल कापडात गुंडाळून तिजोरीत ठेवा. त्यामुळे आर्थिक चणचण भासत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि अक्षय्य तृतीयेला श्री यंत्र खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. या दिवशी विधिपूर्वक श्रीयंत्राची स्थापना करावी. अक्षय्य तृतीयेचा दिवस घरामध्ये श्री यंत्र आणण्यासाठी सर्वात शुभ आहे असे म्हणता येईल.मित्रांनो शंख देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. हा शंख घरात ठेवल्याने नेहमी सुख-समृद्धी येते. दक्षिणावर्ती शंखाची पूजास्थळी विधिवत स्थापना करा.

परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की अक्षय तृतीयेच्या दिवशी देवघरामध्ये पूजा करत असताना पूजेच्या ठिकाणी एकापेक्षा जास्त शंख ठेवू नका आणि त्याचबरोबर मित्रांना अक्षय तृतीयेच्या दिवशी वर सांगितलेल्या सर्व वस्तू खरेदी करा कारण हे खूप शुभ मानल जाते म्हणूनच मित्रांनो तुम्हाला या दिवशी वर सांगितलेल्या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये आणायच्या आहे आणि ज्यावेळी तुम्ही देवपूजा करत असतात त्यावेळी तुम्हाला लक्ष्मी मातेला या सर्व गोष्टी अर्पण करायच्या आहेत मित्रांनो जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करू शकत नसाल तर अशावेळी तुम्ही या सर्व वस्तू नक्की खरेदी करा.

आणि त्याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी रांगोळी बरोबरच दारात लक्ष्मीची पावले रेखाटा. त्या कुंकवाच्या पावलांकडे आकर्षित होऊन लक्ष्मी तुमच्या कुटुंबावर कायम कृपादृष्टी ठेवेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *