३ मे अक्षय तृतीया, या ७ राशींचे भाग्य चमकणार!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो अक्षय तृतीय दर वर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते, या वर्षी अक्षय तृतीय मंगळवारी ३ मे ला अली आहे, हि तिथी अतिशय शुभ मानली जाते, या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी खरेदी करण्या बरोबरच दान धर्म करणे सुद्धा महत्वाचे मानले आहे आणि तसेच या दिवशी केलेले दान हे अक्षय पुण्य देते, कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस चांगला मानला जातो. विवाहासारखी मंगल कार्ये सुद्धा बिना मुहूर्त पाहता तुम्ही करू शकता.

आणि त्याचबरोबर या शिवाय या दिवशी तुम्ही राशीनुसार दान सुद्धा करू शकता.त्याचे सुद्धा तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळते. अक्षय तृतीय हि हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ आहे आणि या वेळी अक्षय तृतीयेला दोन प्रमुख ग्रह तुमच्या राशींमध्ये आणि दोन ग्रह त्यांच्या उच्च राशीमध्ये उपस्थित राहतील. असा योगायोग ५० वर्षांनंतर घडणार आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी ज्यांना हा संयोग शुभ आहे आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.

३ मे अक्षय तृतीयेच्या दिवशी चंद्र त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजे वृषभ राशीमध्ये असेल , सुख आणि वैभव प्रदान करणारा शुक्र मीन राशीमध्ये असेल. शिवाय शनी देव हे स्वतःच्या कुंभ राशीमध्ये विराजमान असतील.आणि नेहमी शुभ फळ देणारे देवगुरु गुरु बृहस्पती मीन राशीमध्ये विराजमान असतील.ज्योतिषांच्या मते अक्षय तृतीयेच्या दिवशी हे ४ मोठे ग्रह अनुकूल स्थितीमध्ये असल्यामुळे या दिवसाचे महत्व वाढले आहे.

शुक्र हा अतिशय शुभ ग्रह मानला जातो. ज्या राशीवर शुक्राची कृपा होते त्या राशींचे भाग्य जास्त चमकते. ३ मे च्या दिवशी दुपारी शुक्र वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्राचा प्रभाव मानवी जीवनामध्ये अनेक गोष्टींना प्रभावित करतो. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी ज्यांच्या जीवनामध्ये शुक्राचा उदय होणार आहे.

मेष राशी – शुक्राचे होणारे परिवर्तन हे मेष राशीसाठी अतिशय लाभदायक होणार आहे.आर्थिक बाजू मजबूत होणार असून अचानक धन लाभाची शक्यता आहे.गेल्या अनेक दिवसापासून अडलेला पैसा आता या राशीच्या लोकांना मिळणार आहे. वाणी मध्ये काही बदल होणार असून भाषाशैली मधुर होणार आहे.शुक्र हा या राशीच्या दुसऱ्या भावामध्ये गोचर करत आहे. कुटुंबामध्ये आनंदाचे दिवस येणार असून वैवाहिक जीवन सुखी होणार आहे.

वृषभ राशी – मित्रांनो अक्षय तृतीयेला होणाऱ्या शुक्राचे आगमन एखाद्या वरदानासारखे घडणार आहे. हे परिवर्तन अनेक सकारात्मक बदल घडवून आणणार आहे आणि मानसन्मान मध्ये वाढ होणार असून पद प्रतिष्ठा वाढणार आहे.शत्रूवर विजय प्राप्त करू शकता. नवीन व्यापार किंवा व्यवसाय सुरु करण्यासाठी हा उत्तम काळ आहे.कुटुंबामध्ये सुखाचे वातावरण येणार असून परिवाराचा पूर्ण पाठिंबा मिळणार आहे.

कर्क – उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीचे नवीन मार्ग प्राप्त होणार आहे.अडलेली कामे मार्गी लागतील. कठीण परिस्थितीमध्ये संकटाचा सामना करण्याचे बळ आता मिळणार आहे आणि कर्क राशीवर चंद्राचे राज्य आहे अशा स्थितीमध्ये या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी चांदीचे मोती धारण करावे. त्यामुळे त्यांचा चंद्र मजबूत होईल आणि आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारेल.

सिंह – शुक्राचा होणार गोचर सिंह राशीच्या दशम भावात होणार असून याचा अतिशय सकारात्मक प्रभाव या राशीवर पडणार आहे.स्वतःच्या सामर्थ्याला सिद्ध करून दाखवण्याची वेळ आलेली आहे. घर , जमीन अथवा वाहन खरेदीने योग येऊ शकतात. अनेक दिवसापासून अडलेला पैसे आता या राशीच्या लोकांना मिळणार आहे.भौतिक सुख समृद्धीमध्ये वाढ दिसून येईल.

कन्या – शुक्राचे गोचर भाग्यात वृद्धी करणार असून अनेक पटींनी यश प्राप्त होणार आहे.या काळामध्ये घेतलेले निर्णय यशस्वी होणार आहे.विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होऊन विवाह जुळून येणार आहेत.वैवाहिक जीवनामध्ये आता सुखाचे दिवस येणार आहे. जोडीदाराबरोबर होणारे वाद कमी होण्याची शक्यता आहे.या राशीच्या लोकांना अध्यात्मिक सुख प्राप्त होणार आहे.

तूळ – शुक्राचे हे रशिपरिवर्तन तूळ राशीच्या अष्टम भावामध्ये होणार आहे.सुख समृद्धीची प्राप्ती होणार असून मन अतिशय प्रसन्न होणार आहे. आथिर्क बाजू वाढणार असली तरी खर्चाचे प्रमाण सुद्धा वाढू शकते. अनावश्यक खर्च करणे टाळा.घर परिवारातील वातावरण प्रसन्न बनेल.योजलेल्या योजना सफल बनतील.

मकर – शुक्राचे हे गोचर या राशीच्या पंचम स्थानामध्ये होणार आहे. संतती कडून एखादी शुभ वार्ता कमी पडू शकते . कार्यक्षेत्रामध्ये धन लाभाचे योग मिळणार असून प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होणार आहे. प्रेम जीवनाविषयी हा काळ शुभ ठरणार आहे. वैवाहिक जीवन सुख समाधानाने फुलून येणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.