अक्षय तृतीया येण्याआधी घरामध्ये आणा ‘ही’ एक वस्तू, घरामध्ये लक्ष्मी येईल!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो वैशाख महिन्याची तृतीया अक्षय्य तृतीया म्हणून ओळखली जाते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्यामुळे अक्षय्य तृतीयेला अनन्य साधारण महत्त्व आहे. एखाद्या नवीन कामाची सुरुवात अक्षय्य तृतीयेपासून केली जाते. कारण या तिथीला सुरू झालेले काम किंवा केलेले काम अक्षय्य राहते, अशी मान्यता आहे आणि म्हणूनच मित्रांनो यादिवशी माता लक्ष्मी पूजन महत्वपूर्ण मानले जाते त्यामुळे माता महालक्ष्मी प्रसन्न होऊन घरात धनलाभ होतो. अक्षय सुख देते ती अक्षय्य तृतीया होय, साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीय होय.

आणि मित्रांनो अशी ही अक्षय तृतीया 2022 या वर्षांमध्ये ३ मे मंगळवारच्या दिवश आली आहे, हा दिवस खूपच महत्वाचा असतो, यादिवशी सर्व शुभ कामे केली जातात. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि या दिवशी दैवी शक्ती सुदधा खूप कार्यरत असतात यादिवशी धरतीवर उतरतात. आपल्याला आशीर्वाद मिळतो व त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा विधीपूर्वक करावी.

आपण जर यादिवशी छोटे छोटे उपाय केले तर आपल्या भाग्यात वृद्धी होते व अडचणी दूर होतात, मित्रांनो आज आपण असाच एक सोपा उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपल्या घरामध्ये केला तर यामुळे लक्ष्मीमाता आपल्यावर प्रसन्न होईलच त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या पैशाने संबंधित सर्व अडचणी पासून आपली सुटका होईल. मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी देवी प्रसन्न होण्यासाठी या दिवशी 11 कवड्या खरेदी करुन त्या लाल रंगाच्या कपड्यात लपेटून देव्हाऱ्यात ठेवा.

मित्रांनो त्यामुळे घरात धनसंपत्ती लाभेल आणि ती सुद्धा अक्षय्य स्वरूपात लाभेल आणि कारण या कवड्याना विशेष असे महत्व आहे. या कवड्या म्हणजे देवी लक्ष्मीचे स्वरूपच मानले जाते. त्यांचा संबंध थेट समुद्राशी असतो व समुद्र मंथनावेळी माता लक्ष्मी समुद्रातून प्रकट झाली होती. त्यामुळे नोकरी व्यवसायात भरभराटीसाठी या कवड्या अतिशय लाभदायी असतात. या दिवशी खरेदी केलेले सोने कधीही घरातून विकले जात नाही, उलट त्यामुळे घरात सोने टिकून राहतेच तसंच वृद्धी होते आणि सोने खरेदी करणे तुम्हाला जमत नसल्यास तुम्ही लक्ष्मीच्या पादुका खरेदी करुन त्याची दररोज पूजा करा. यामुळे तुम्हाला सुख-शांती लाभेल. कारण लक्ष्मी च्या पादुकांना शास्त्रामध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे.

तसेच आपल्या देवघरात दक्षिणावर्ती शंख जरूर असावा, जो भगवान विष्णूंचे प्रतीक मानला जातो. ह शंख घरात सुख, समृद्धी, शांती घेऊन येतो आणि त्याचबरोबर मित्रांनो याची पूजा दररोज केल्यास भरपूर पुण्य मिळते. अजून एक शुभ व भाग्य बदलणारी वस्तू म्हणजे एकाक्ष नारळ होय. हा नारळ म्हणजे खूपच दुर्मिळ असतो, आपल्याला नेहमी तीन डोळे असणारा नारळ मिळतो. हा एकाक्ष नारळ भेटणे म्हणजे सुवर्ण खरेदी केल्यासारखे असते. हा नारळ आपल्या आयुष्यात सुख, समाधान, ऐश्वर्य घेऊन येतो.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *