नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे. अबूझ मुहूर्तामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. अक्षय तृतीयेचा पवित्र सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी, अक्षय तृतीया हा सण मंगळवार, 03 मे 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. या पवित्र दिवशी स्नान, दान, धर्म आणि कर्म यांचे महत्त्व खूप आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा विधीपूर्वक करावी.
आणि त्याचबरोबर मित्रांनो मित्रांनो मे महिन्यातील मोठा सण म्हणजे अक्षय तृतीया होय. या दिवसाला आणि या सणाला खूप महत्त्व आहे. या दिवशी साडेतीन मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्त असेही म्हटले जाते. या दिवसाच्या मुहूर्ताने आपले कुठलेही काम केल्यास ते निश्चितपणे मार्गी लागते व यशस्वी होते आणि मित्रांनो अक्षय तृतीया या सणाला आपणाला पितरांचे आशीर्वाद मिळतात. असेही सांगण्यात येते. त्याचबरोबर या दिवसाच्या अगोदर आपण आपल्या घराला असा एक नारळ बांधा त्यामुळे अक्षय तृतीया पासून आपल्या पितरांचे आशीर्वाद आपणाला सदैव मिळतील त्यांचे काही दोष असतील ते निघून जातील.
आणि मित्रांनो हा नारळ आपणाला अक्षय तृतीयेच्या आधीच आपल्या घराला बांधायचा आहे. कारण अक्षय तृतीया च्या आधीपासूनच एकेक शुभमुहूर्त ना सुरुवात होत असते. सर्वात आधी हा उपाय करत असताना मित्रांनो घराला बांधण्यासाठी आणलेला नारळ जसाच्या तसा एका लाल कापडामध्ये बांधून त्याची पूजा करून त्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती बांधून ठेवायचा आहे. मुख्य दरवाजाच्या डाव्या किंवा उजव्या अशा कुठल्याही बाजूस किंवा मधोमध हा नारळ बांधून ठेवला तरी चालेल.
त्याचे कारण म्हणजे आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती ही आपल्या दरवाजातून आत प्रवेश करत असते. घरात कोणीही माणूस बाहेरून येताना त्याच्यासोबत ती वाईट शक्ती येत असते. तर अशा येणाऱ्या वाईट शक्तींना रोखण्यासाठी आणि पितरांचा चांगला आशीर्वाद मिळवून देण्यासाठी या नारळाचा उपयोग होत असतो आणिम्हणून हा नारळ आपण अक्षय तृतीया च्या आधी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला वरती बांधून ठेवायचा आहे. मित्रांनो यानंतर आपणाला आपल्या पितरांचे आशीर्वाद तात्काळ मिळतील.
आणि त्याचबरोबर मित्रांनो जर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी केला तर यामुळे आपल्या घरात येणाऱ्या सर्व वाईट गोष्टी, वाईट शक्ती नष्ट होतील आणि त्याचबरोबर मित्रांनो
या उपायामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल. घरात धन धन्यासह बरकत येईल, सुख-समृद्धी वाढीस लागून ऐश्वर्य प्राप्त होईल आणि या साडेतीन मुहूर्तांपैकी एका मुहूर्ताचा चांगला लाभ होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.