नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो शनि अमावस्या म्हणजे अमावस्येचा दिवस, जो शनिवारी येतो. यावेळी वैशाख महिन्यातील अमावस्या शनिवारी आहे. अमावस्येच्या निमित्ताने लोक गंगेसह पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि आपल्या क्षमतेनुसार गरिबांना दान करतात त्यामुळे पुण्यप्राप्ती होते. शनि अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते आणि साडेसती आणि धैयाच्या दुष्परिणामांपासून मुक्त होण्यासाठी ज्योतिषीय उपाय करतात, चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या अमावस्येला शनीची साडेसाती आणि धैय्यापासून सुटका करण्यासाठी आपल्याला कोण कोणते उपाय करायचे आहेत ते.
मित्रांनो शनि अमावस्येच्या दिवशी स्नान केल्यानंतर शनिदेवाची पूजा करा. त्यांना निळी फुले, शमीची पाने, काळे तीळ, मोहरीचे तेल इत्यादी अर्पण करा. त्यानंतर शनि चालिसाचे पठण करावे. पूजेच्या शेवटी शनिदेवाची आरती करावी. शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि दुःखापासून मुक्ती देतील आणि शनि अमावस्येला स्नान केल्यानंतर लोखंड, स्टीलची भांडी, निळे किंवा काळे कपडे, काळे तीळ, शनि चालीसा इत्यादी दान करा. साडे सती आणि धैय्यापासून सुटका होईल त्याच बरोबर शनी अमावस्येला मोहरीच्या तेलात सावली दिसल्यानंतर कोणत्याही शनी मंदिरात दान करा.
आणि त्याचबरोबर मित्रांनो या शनि अमावस्येच्या दिवशी स्नान केल्यानंतर हनुमानजींची पूजा करा. हनुमान चालिसा किंवा सुंदरकांड वाचा. शनिदेव हनुमान भक्तांना त्रास देत नाहीत आणि मित्रांनो या शनि अमावस्येला स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा करून तेथे जल अर्पण करा. संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. तुमच्या अडचणी दूर होतील.आणि त्यात भर मित्रांनो आपल्या वर असणारा पितृदोष किंवा वास्तू दोष कमी करण्यासाठी आपल्याला दिव्या संबंधीचा उपाय करायचा आहे तो करत असताना सर्वात आधी शनि अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी शनिदेवाच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. तसेच त्यांना काळे वस्त्र अर्पण करावे. यानंतर शनि चालिसाचे पठण करावे.
आणि त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. असे केल्याने पितृदोषापासूनही मुक्ती मिळते आणि शनि अमावस्येला उडीद डाळ, काळे कापड, काळे तीळ, काळे हरभरे यासारख्या काळ्या वस्तू गरीब व्यक्तीला दान केल्याने शनिदेवांची कृपा मिळते आणि शक्यतो मित्रांनो या दिवशी काळा रंगाचे कपडे घालणं टाळा आणि मित्रांनो शनि अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने भाविकांच्या जीवनातील आर्थिक संकटे दूर होतात आणि पैशाची कमतरता भासत नाही आणि या दिवशी ओम शं शनैश्चराय नमः’ या मंत्रांचा जप करावा. या दिवशी गरजूंना काहीतरी दान करा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.