नमस्कार मित्र मैत्रिणींनो
हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्याला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले आहे. आणि त्यातच शनि अमावस्या ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. शनिवारी येणार्या अमावास्येला शनि अमावस्या म्हटले जाते आणि विशेष म्हणजे या दिवशी सूर्य ग्रहण लागत असून हा अतिशय अद्भुत संयोग बनत आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्याला सूर्य ग्रहण लागले हे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते आणि शनी अमावस्येला शनिच्या साडेसाती पासुन आणि धय्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी अनेक उपाय केले जातात.
मित्रांनो ज्या लोकांच्या जीवनात शनीची साडेसाती किंवा धय्या चालू आहे. अशा लोकांनी या दिवशी दानधर्म करणे विशेष फलदायी मानले जाते अमावस्येच्या दिवशी सुरू सूर्य ग्रहण असल्यामुळे या दिवशी महत्वपूर्ण मानले जाते. त्यामुळे सूर्य आणि शनि हे दोन्हीही प्रसन्न होतात. आणि मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर करतात. शनि अमावस्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पितृ दोष दूर होतात आणि या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी गरजू व्यक्तींना मोहरीचे तेल चप्पल बूट काळे कापड इत्यादी वस्तू दान करणे अतिशय शुभ फलदायी मानले जाते.
या दिवशी शनि मंत्रांचा जप करून मनोभावे शनिला शरण गेल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख नष्ट होतात. मान्यता आहे की या दिवशी पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी दान धर्म केले जाते. पवित्र नदीत स्नान करून पित्रांचे तर्पण करणे लाभकारी मानले जाते आणि त्यामुळे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. मित्रांनो दिनांक ३० एप्रिल रोजी ज्येष्ठा नक्षत्रावर वृश्चिक राशीत खग्रास ग्रहण होत असून हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे या ग्रहणाचे वेध पाळण्याचे कारण नाही. म्हणजे ग्रहणाचे वेध पाळले जाणार नाहीत तरी सावधगिरी म्हणून गरोदर महिलांनी काही नियम पाळण्यास हरकत नाही.
आणि मित्रांनो हे ग्रहण भारतात दिसणार नसले तरी याचा प्रभाव याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशिंवर पडण्याचे संकेत आहेत आणि याच दिवशी शनि अमावस्या देखील आहे. कार्तिक कृष्णपक्ष विशाखा नक्षत्र दिनांक २९ एप्रिल रोजी रात्री १२ ला अमावस्येला सुरूवात होणार असून दिनांक ३० एप्रिल रोजी शनिवारी दुपारी १ वाजून ५७ मिनिटांनी अमावस्या समाप्ती होणार आहे अमावस्येपासून पुढे येणारा काळ या काही भाग्यवान राशींच्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे आणि इथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो.
चला तर मित्रांनो पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
मेष राशी- सूर्यग्रहणाचा जरी थोडासा नकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असला तरी शनि अमावस्या शुभ प्रभाव हा आपल्याला प्रत्येक संकटातून तारून येणार आहे आणि शनीची विशेष कृपा आपल्या राशी वर बसणार असून जीवनात मांगल्याची सुरुवात होणार आहे. आता प्रगतीच्या काळाची सुरुवात होण्यास वेळ लागणार नाही. नकारात्मक काळ आता संपणार आहे. जे काम आपण करत आहात त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे त्याचबरोबर नकारात्मक काळाचा अंत होणार असून लवकरात शुभ आणि आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.
वृषभ राशी- सूर्यग्रहण आणि शनी अमावास्येचा अतिशय शुभ प्रभाव वृषभ राशिच्या जीवनात आनंदाची बाहेर घेऊन येणार आहे. आपल्याला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मध्ये वाढ करणारा काळ ठरणार आहे. लवकरच या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. या काळात प्रमोशनचे काम मार्गी लावू शकते आणि उद्योग व्यापार आणि व्यवसायातून भरपूर प्रमाणात लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत आणि शनीचा प्रभाव आपल्या जीवनावर पडणार असल्यामुळे हा आपल्यासाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. या काळात शनि मंत्रांचा जप करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.
मिथुन राशी- मिथून वर सूर्यग्रहणाचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. कोर्ट केसेस चालू असणारा खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या समस्या मिटणार आहेत. जुन्या वादातून मुक्ती मिळणार आहे आणि या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडण्याची शक्यता आहेत. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना पूर्ण होतील यातून आपल्याला लाभ प्राप्त होऊ शकतो. अचानक धन लाभाचे संकेत आहेत.
सिंह राशी- सिंह राशीसाठी अतिशय लाभदायी ठरणार आहे सूर्यग्रहण. शनीचा आशिर्वाद आपल्या पाठिशी राहणार असून जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. प्रत्येक अडचणीवर मार्ग निघणार आहे आणि प्रत्येक संकटातून मुक्त होणार आहात. मागील अनेक दिवसापासून अडलेली आपली कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येणार आहेत. पारिवारिक सुखात वाढ दिसून येईल. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न होणार आहे.
कन्या राशी- कन्या राशी वर सूर्यग्रहणाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. मागील अनेक दिवसापासून चालू असणारी परेशानी आता दूर होणार आहे. कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत आणि व्यवसायिक वर्गासाठी हा काळ अनुकूल आहे. न्यायालयीन कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसांपासून मनाला सतवणारी चिंता दूर होणार असून मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मनाला प्रेरणा देणाऱ्या आणि आपला आत्मविश्वास वाढवणार्या अनेक घडामोडी आपल्या जीवनात घडून येणार आहेत.
मकर राशी- मकर राशी साठी सूर्यग्रहणाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. उद्योग व्यवसाय आणि व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणारा आहे. व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे आणि तुम्ही लवकर या कामात येणाऱ्या सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. सरकार दरबारी अनेक दिवसांपासून आलेली कामे पूर्ण होतील. प्रेम जीवनात चालू असणाऱ्या समस्या दूर होणार आहेत.
कुंभ राशी- कुंभ राशी साठी सूर्य ग्रहण विशेष लाभदायी ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून चालू असणारा मानसिक ताण-तणाव दूर जाणार आहे. यश प्राप्तीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत आणि या काळात अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा दिसून येईल. व्यवसायातून आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे. सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. या काळात अडलेली कामे पूर्ण होतील. मित्रांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे.
मीन राशी- मीन राशी साठी सूर्यग्रहण आणि शनी अमावास्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव मीन राशीच्या जीवनात दिसून येईल. व्यापारातून आर्थिक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. करियर कार्यक्षेत्रात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील आणि मित्रांनो तुमच्यासाठी नोकरीसाठी हा काळ अनुकूल आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ होणार असून आर्थिक प्रगतीमध्ये वाढ दिसून येईल. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.
वरील माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.