नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो २८ एप्रिल हा दिवस खुप मोठा दिवस कारण या दिवशी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे आणि आता खुप काही थोडे दिवस बाकी आहेत. पुण्यतिथी येण्यासाठी जसे खुप मोठे-मोठे सण असतात दिवाळी, दसरा, रक्षाबंधन, गणपती, नवरात्र तसेच स्वामी भक्तांसाठी स्वामींची जयंती आणि स्वामींची पुण्यतिथी खुप मोठा सण मानला जातो.या दिवशी स्वामींची विशेष सेवा केली जाते मठात जाऊन स्वामींच्या केंद्रात जाऊन दर्शन घेतले जाते आणि स्वामी समर्थांची विविध सेवा आणि त्याचबरोबर पूजापाठ केला जातो, परंतु मित्रांनो आपल्यातील काही भक्तांना त्यांच्या कामामुळे मठात, केंद्रात जाणे शक्य नाही.
तर मित्रांनो अशा वेळी सगळ्या स्वामी भक्तांनी घरातच राहून स्वामींची विशेष सेवा विशेष पाठ करावे आणि खास म्हणजे स्वामींना एक विशेष नैवेद्य दाखवावा, मित्रांनो स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही जर स्वामींना आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला तर याने स्वामींची कृपा तुमच्यावर होईल आणि स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील तसे तर आपण जे ही प्रेमाने संपूर्ण विश्वासाने, मनाने स्वामींना जे नैवेद्य दाखवतो त्यातच आपले स्वामी खुश होतात. परंतु स्वामींची जयंती असुद्या पुण्यतिथी असुद्या किंवा अन्य सण असुद्या आपण काही तरी विशेष केलेच पाहिजे.
तर या दिवशी सुद्धा तुम्ही काहीतरी विशेष करून स्वामींना दाखवू शकता तस तर तुम्ही जे केलात ते दाखवल तरी स्वामी प्रसन्न होतील पण जर करण्याची क्षमता असेल तर नक्कीच करावे आता हा विशेष नैवेद्य कोणता आहे. विशेष नैवद्य म्हणजे खीर आणि पुरणपोळी करायची आहे आणि त्यासोबतच कांदाभजी सुद्धा करायची आहे. स्वामींना अत्यंत काही आवडीचे असेल तर ते कांदाभजी आणि पुरणपोळी खीर अत्यंत आवडते. परंतु तुम्हाला करणे शक्य नसेल तर तुम्ही चटणी भाकर किंवा भाजी चपाती केली ते प्रेमाने करून जरी स्वामींना दाखवला तर स्वामी प्रसन्न होतात.
पण आवडीने आपण कोणती गोष्टी करायला पाहिजे आणि माहिती साठी आम्ही तुम्हाला सांगितले आहे की स्वामींना कांदाभजी खीर आणि पुरणपोळी आवडते अस नाही की हेच केले पाहिजे तर स्वामी प्रसन्न होतील असे सुध्दा नाही फक्त ज्यांना आवडीने करायचे आहे ते करू शकतात,परंतु मित्रांनो तुम्ही भाजी चपाती, वरणभात, चटणी भाकर सुध्दा दाखवली तरी आपले स्वामी खुशीने प्रेमाने खातात आणि भक्तांवर प्रसन्न होतात. असा नियम नाही की खीर आणि पुरणपोळीच करायची आहे फक्त स्वामींना हे आवडत तर तुम्हाला ही जमले तर खीर, कांदाभजी, पुरणपोळी यांचा नैवद्य नक्की करून दाखवा.
वरील माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.