रोज पूजा करायला जमत नसेल तर ‘हे’ नियम जरूर पाळा !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्रांनो, आपण दररोज देवांची पूजा करीत असतो. विशेष सेवा करीत असतो. ही जाणीव करून देते कि, देवांचा आशीर्वाद आपल्यावर आहे. आपल्यावर आलेली सर्व संकटे दूर राहावे. घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. घरातील सर्व दुःख नाहीशी व्हावीत. घरांमध्ये शांततेचे वातावरण राहावे. लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आपल्या घरावर व्हावा.

यासाठी प्रत्येकजण पुजा करत असतो. सेवा करत असतो. विशेष असे मंत्रजप करत असतो. परंतु काही जणांना हे सर्व करणे जमत नसते. त्यांच्या काही अडचणी असतात की, त्यांची इच्छा असून देखील त्यांना हे करणे शक्य नसते. अशा लोकांसाठी आज आपण एक असे काही कामे सांगणार आहोत की, जे काम केल्यामुळे त्यांना पूजा केली नसली तरी चालू शकते किंवा विशेष असेल सेवा केली नसली तरी चालू शकते. परंतु दररोज नित्य नियमाने ही तीन ते चार कामे करणे खूप गरजेचे आहे.

ही कामे कोणती? याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. पहिले कार्य म्हणजे आपण आपल्याला जर विशेष असी सेवा करणे शक्य नसेल किंवा दररोज पूजा करणे शक्य नसेल तर, सकाळी उठल्या उठल्या आपल्या हाताचे दर्शन करावे. आणि आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण करावे. यामुळे नक्कीच आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद मिळतो.

कुलदेवी आपल्या सर्व कामांमध्ये आपल्या सोबत राहावी तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. दुसरे कार्य म्हणजे आपण घरातून बाहेर जात असताना कोठे मध्ये आपल्याला कोणी गरीब दिसला किंवा गरजू दिसला तर त्याची मदत करावी. आपल्याला आपल्या परीने होत असेल ती त्याला मदत करावी किंवा अन्न खाण्यास द्यावे किंवा थोडे पैसे द्यावेत. असे केल्याने देखील आपल्यावर देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो.

तिसरे कार्य म्हणजे जर कोणी संकटात असेल तर, त्या व्यक्तीला आपण धीर द्यावा किंवा त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्याला मदत करावी. कोणत्याही प्रकारचे वाईट गोष्ट त्याला बोलू नये. त्याला त्यातून बाहेर निघण्यास मदत करावी व आपल्या परीने शक्य होईल तितकी आपण त्याची संकटातून सुटका करण्यास मदत करावी. त्याच बरोबर आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे वाईट विचार आणू नयेत.

सर्वांचा परी आपल्या मनात चांगलेच विचार असावेत. कारण आपल्या मनात जर वाईट विचार येत असतील तर, आपल्यावर संकटे येत राहतील. देवी-देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळणार नाही. कारण आपल्याच मनामध्ये वाईट विचार आहे तर, आपण इतरांचे कसे चांगले करू शकतो. जर आपण इतरांचे चांगले केले नाही. तर आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद कसा प्राप्त होईल.

म्हणून कधीही आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार येऊ नयेत. सर्वांकडे चांगलेच विचार मनात आणावेत. त्याच बरोबर दिवसभरात कधीही शक्य असेल त्यावेळी आपल्या देवाचे नामस्मरण करावे. कोणत्या देवावर तुमची श्रद्धा असेल भक्ती असेल तर, देवाचे तुम्ही आपल्याला शक्य असेल तेव्हा मनातल्या मनात नामस्मरण करावे. त्याचबरोबर कोणत्याही प्राण्यांना दुखावू नये. त्यांना काहीना काही खाऊ घालावे.

अशा प्रकारे ही चार पाच कामे जर तुम्ही दररोज नित्य नियमाने केली तर, नक्कीच तुम्हाला देवी देवतांचा आशीर्वाद मिळेल. घरांमध्ये कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही. घरामध्ये सदैव शांतता राहील. सकारात्मकता राहील. घरातील सर्व नकारात्मकता दूर होईल. घरातील सर्व सदस्यांच्या आरोग्य चांगले राहील व घराची आर्थिक स्थिती देखील चांगली राहील.

लक्ष्मी देवीचा आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला देखील जर दररोज पूजा करणे किंवा सेवा करणे शक्य नसते तरीही चार पाच कामे नक्की तुम्ही करा. नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ झालेला दिसून येईल.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *