नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो आपल्याला माहिती आहे की प्रत्येक एकादशीला वेगवेगळे महत्त्व असते. एकादशी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आणि त्याच्या एकादशीला काही उपाय केल्यास आपल्यावर देवता प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात हे आपणाला माहिती आहे.
तर मित्रांनो आज आपण वरूथिनी एकादशी बद्दल विशेष माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो असे मानले जाते की वरूथिनी एकादशी दिवशी श्रीविष्णूच्या वामन अवताराची पूजा केल्यास आपल्या आयुष्यातील सर्व दोष दूर होतात.
त्याशिवाय जर यादिवशी आणखी काही उपाय केल्यास लक्षमी-नारायण आपल्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात तसेच आपल्या मनोकामनाही पूर्ण करतात आणि त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रानुसार वरुथिनी एकादशीच्या दिवशी श्रीविष्णूला तुळशीची माळ अर्पण करावी.
मित्रांनो आपणाला माहीत आहे की तुळस ही लक्ष्मी-नारायणाला अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते. त्यामुळे तुळस अर्पण केल्यास ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. त्यासोबतच वरुथिनी एकादशीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखात गंगाजल भरून श्रीविष्णूला अभिषेक करावा.
तुम्हाला सांगतो मित्रांनो असे केल्यास तुमच्या जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतात व सुखसमृद्धी प्राप्त होते असे मानले जाते आणि पुराणानुसार या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. त्याच वेळी, व्यक्तीसाठी स्वर्गाचा मार्ग खुला होतो. सूर्यग्रहणाच्या वेळी दान केल्याने जे फळ मिळते, तेच फळ हे व्रत केल्याने मिळते.
आणि या व्रताचे पालन केल्याने मनुष्याला इहलोक आणि परलोक दोन्ही सुख प्राप्त होते आणि शेवटी स्वर्गात जातो. हे व्रत केल्याने मनुष्याला हत्ती दान आणि भूमी दान करण्यापेक्षा अधिक शुभ फल प्राप्त होते आणि मित्रांनो वरुथिनी हा शब्द संस्कृत भाषेतील ‘वरुथिन’ मधून आला आहे, ज्याचा अर्थ आहे- संरक्षक, कवच किंवा संरक्षक.
असे मानले जाते की या एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू भक्तांचे प्रत्येक संकटातून रक्षण करतात आणि त्यांना सुख-समृद्धीचे वरदान देतात. मनोज मित्रांनो आपण जर या एकादशी दिवशी भगवान विष्णूंचे व्रत केले आणि वास्तुशास्त्र मध्ये सांगितलेले आहे उपाय आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्यावर लक्ष्मी आणि विष्णू नारायण प्रसन्न होतात.
मित्रांनो जर तुम्ही पैश्यांशी संबंधित कोणत्याही समस्येमुळे तुम्ही चिंतेत असाल तर वरुथिनी एकादशीच्या दिवशी लक्ष्मी माता आणि श्रीविष्णू यांची एकत्रित पूजाअर्चा करावी. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे. पिंपळाच्या झाडात श्रीविष्णूचा वास असतो असे मानले जाते.
त्यामुळेच वरुथिनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घातल्यास व त्याची पूजा केल्यास श्रीविष्णू प्रसन्न होतात व आपल्या भक्तांवर त्यांची कृपादृष्टी कायम राहते आणि त्यासोबतच वरुथिनी एकादशीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखात गंगाजल भरून श्रीविष्णूला अभिषेक करावा. असे केल्यास तुमच्या जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतात व सुखसमृद्धी प्राप्त होते असे मानले जाते.
मित्रांनो जर घरामध्ये वारंवार वादविवाद होत असतील आणि त्याचबरोबर संबंधित अडचणी निर्माण होत असतील तर अशा वेळी तुम्ही जर पिवळ्या रंगाची कोणतीही डाळ किंवा इतर कोणतेही मिठाईचे पदार्थ श्री वैष्णव अर्पण केले किंवा गरीब किंवा गरजू व्यक्तींना पिवळ्या रंगाच्या वस्त्राचे आणि पदार्थांचे दान केले तर यामुळे हे भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटापासून सुटका करतात असे त्याचबरोबर यामुळे तुमच्या जीवनामध्ये पैशासंबंधी काही अडचणी असतील त्यापासूनही लवकरात लवकर तुमची मुक्तता होईल.
आणि त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी सकाळी लवकर उठून विष्णु चालीसा, विष्णु सहस्रनाम आणि वरुथिनी एकादशी व्रत कथा पाठ करा. व्रत करणार्या व्यक्तीने नेहमी व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी आणि आता तुम्ही पूजेतील उणीव किंवा चुकांसाठी क्षमा मागावी आणि भगवान विष्णूला तुमची इच्छा व्यक्त करावी. यानंतर ब्राह्मणाला केळी, फळे, धान्य इत्यादी दान करा आणि दक्षिणा देऊन निरोप द्या.
वरील माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.