स्वामी सेवा करत असताना स्वामी भरपूर परीक्षा घेतील त्यावेळी फक्त एक काम करा !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्रांनो, अनेक भक्त लोक स्वामींची सेवा करत असतात आणि त्यांच्या अनुभवातून ते काही गोष्टी आपल्याला सांगत असतात. त्यांना सेवेमध्ये खूप अडचणी आलेला आहेत. खूप व संकटांना सामोरे जाऊन ते आज खूप सुखात आहेत. असे का घडत असेल? हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो.

म्हणजेच स्वामी सेवा करत असताना देखील स्वामी आपल्याला संकटामध्ये का ढकलत असतात? का सारखी सारखी दुःख आपल्या वाटेला येत असतात? अशा अनेक संकटांना कंटाळून अनेक जण स्वामी सेवाही मध्येच सोडून देतात.परंतु असे करणे हे अगदी ही बरोबर नसते. कारण त्या संकटाला पेक्षाही मोठे स्वामी आहे. स्वामी आपली संयम शक्ती पहात असतात.

पण त्यांच्या भक्त म्हणून घेण्यासाठी योग्य आहोत की नाहीत याची परीक्षा ते घेत असतात. म्हणून कधीही संकट आली तर त्यांना सामोरे जावे. न भिता न घाबरता संकटांना सामोरे गेल्यास त्यांना मात करून आपण पुढे गेलो तर स्वामी नक्कीच आपली कायमस्वरूपी पाठीशी राहील. आपल्यावर येणार्‍या संकटाची तीव्रता कमी करील व सर्व सुख अनुभवण्यास मिळेल. स्वामींची किंवा इतर कोणत्याही देवाची सेवा करीत असतांना आपल्या मनामध्ये स्वार्थाचे भाव कधीही ठेवू नये.

कारण स्वार्थाने केलेल्या कामाचे यश हे आपल्याला कधीच मिळत नसते. निस्वार्थ शुद्ध मनाने भक्ती केली तर त्याचे फळ देखील खूप चांगले मिळते. मनो भावात श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून सेवा केल्याने त्याचे फळ तुम्हाला भविष्यात एक ना एक दिवस इतके मिळेल की तुम्ही त्याचे कधी अपेक्षा केली नसेल. स्वामी हे संपूर्ण सृष्टीचे पालन हार आहेत ते आपल्या भक्तांना कधीही एकट्याला सोडत नाही.

ते आपल्या भक्ताच्या पाठीमागे सतत उभ्या असतात. ते आपल्या भक्तावर येणाऱ्या संकटातून त्याला बाहेर काढण्याचे मार्ग देखील दाखवत असतात. म्हणून त्यांनी घेतलेल्या परीक्षेत आपण पास होणे खूप गरजेचे असते. म्हणून कधीही सेवा करीत असताना कितीही संकटे आली कितीही दुःखी आली तर न डगमगता निस्वार्थ मानाने विश्वासाने आणि श्रद्धेने ती सेवा पूर्ण करा.

तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्याचे फळ मिळेल. फळ इतके मोठे असेल की तुम्ही त्याची कधीही अपेक्षा करू शकत नसते. स्वामी तुम्हाला नेहमी तुमच्या सोबत असल्याची जाणीव तुम्हाला होत राहील. फक्त त्यांनी आपल्या भक्ताची परीक्षा घेतलेली असते त्या भक्ताच्या परीक्षांमध्ये आपण पास होणे खूप गरजेचे असते.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *