चैत्र महिन्यात कुलदेवीची पूजा, पाहुणचार, नैवेद्य, साकडे कसे घालावे? कोणत्या दिवशी करावे? याविषयीची सविस्तर माहिती जाणून घ्या

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, चैत्र महिना हा खूपच शुभ मानला जातो. चैत्र महिन्यात नवीन वर्षाची सुरुवात देखील होते. चैत्र महिन्यामध्ये अनेक व्रत, पूजा केले जातात. नवीन कामांचा शुभारंभ देखील चैत्र महिन्यातच केला जातो. जसे मार्गशीष, श्रावण महिन्यात आपण वेगवेगळ्या देवांचे व्रत पूजा करीत असतो. त्याप्रमाणे चैत्र महिन्यात देखील आपल्या कुलदेवतेची पूजा करावी. चैत्र महिना हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात आपल्या आपली जी कुलदेवी असते त्या देवीचा पाहूनचार, पूजा तसेच नैवेद्य करणे खूपच शुभ मानले जाते. हे सर्व आपल्याला आपल्या घरी करायचे आहे.

तर मित्रांनो कुलदेवतेची पूजा पाहुणचार या विषयीची सविस्तर माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो चैत्र महिन्यामध्ये मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला आपल्या कुलदेवतेची पूजा करायची आहे. मंगळवार आणि शुक्रवार हा देवीचा वार असल्यामुळे तुम्हाला ही पूजा मंगळवारी किंवा शुक्रवारी करायची आहे. तुम्हाला ही पूजा सकाळी करायची आहे म्हणजेच अकरा ते बारा वाजण्याच्या आत ही पूजा करायची आहे. तर ती पूजा कशी करायची याविषयी जाणून घेऊया.

तुम्हाला देवघराच्या बाजुला एक पाठ मांडायचा आहे किंवा चौरंग असेल तर तुम्ही मांडू शकता. या चौरंगावर पांढरे, हिरवा किंवा केशरी कापड तुम्हाला अंथरायचे आहे आणि जी आपली कुलदेवी आहे तिचा फोटो, मूर्ती असेल तर फोटो मूर्ती ठेवायची. नसेल तर देवघरामध्ये असणारा कलश तुम्ही त्या पाठावर ठेवायचा आहे आणि दिवा, अगरबत्ती, हळदी कुंकू, अक्षता , फुले वाहून पुजा करायची आहे.

जर तुम्हाला कुलदेवतेची आरती येत असेल तर आरती करायची आहे. पूजा झाल्यानंतर आपल्या कुलदेवतेला नैवेद्य दाखवायचा आहे. हा नैवेद्य म्हणजे तुम्ही आपल्या घरांमध्ये पुरणपोळी, खीर करू शकता आणि त्याचा नैवेद्य आपल्या कुल देवीला दाखवायचा आहे. आमरस देखील तुम्ही नैवेद्य म्हणून देवीला दाखवू शकता. नैवेद्य दाखवत असताना त्या नैवेद्यावर तुळशीचे पान मात्र ठेवायला विसरू नका.

चैत्र महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा पाहुणचार देखील करायचा आहे. हा पाहुणचार कसा करायचा? तर तुम्ही जी कुलदेविची मांडणी केलेली आहे तर त्या पूजेच्या मांडणीच्या समोर तुम्ही आपल्या कुलदेवतेला भोग लावू शकता. 56 प्रकारचे भोग तुम्ही लावू शकता.

देवीची तुम्हाला ओटी देखील भरायची आहे. पूजेच्या माडणी दिवसरात्र तशीच ठेवून तुम्ही नैवेद्य दाखवून संध्याकाळी भजन करू शकता. अशाप्रकारे तुम्ही देवीचा पाहुणचार करू शकता.

नंतर देवीसमोर बसून तुम्ही हात जोडून तुमच्या काही इच्छा, मनोकामना असतील त्या सर्व इच्छा देवी समोर बोलायच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही साकडे आपल्या कुलदेवीला घालू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपल्या कुलदेवतेची पूजा, पाहुणचार, नैवेद्य तसेच साकडे चैत्र महिन्यामध्ये घालू शकता. हे खुपच आपल्यासाठी शुभ मानले जाते. यामुळे आपल्या सर्व अडचणी देवी दूर करतील.

अशा पद्धतीने तुम्ही दिवस रात्र ही पूजा ठेवायची आहे. यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून दिवा, अगरबत्ती लावून नैवेद्य दाखवून ती मांडणी काढायची आहे. जर कलश तुमच्या घरी कायमस्वरूपी नसेल तर त्या कलशातील पाणी झाडांना घालून नारळ हा पाण्यामध्ये विसर्जित करावा. देवीची ओटी भरलेले तांदूळ किंवा गहू महिलांनी त्याचे काही पदार्थ करून खायचे आहेत. आपल्या घरातील सर्वांनी जो काही नैवेद्य आहे तो नैवेद्य खायचा आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही आपल्या कुलदेवतेची पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्या इच्छा, मनोकामना पूर्ण होणार आहेत व आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या घरावर कायम राहणार आहे.

मित्रांनो हि माहिती अनेक स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला फॉलो करा आणि माहिती शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *