नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र- मैत्रिनिनो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीला वैद्यकीय शास्त्रानुसार देखील तुळशीला खूप महत्त्व देण्यात आले आहे. आपल्या प्रत्येकाच्याच घरांमध्ये तुळशीचे रोप असते. आणि घरातील स्त्रिया या तुळशीची पूजा करत असतात ज्यांच्या घरांमध्ये तुळशीचे रोप नाही त्यांनीदेखील तुळशीचे रोप लावावे.
आणि दररोज या तुळशीची पूजा करावे. आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दररोज न चुकता तुळशी मातेची पूजा करायला हवे. विष्णू देवांचे आपण कितीही पूजा केली मात्र त्यांना तुळस नीचे पान अर्पण जर नाही केले तर आपली पूजा निष्फळ ठरते. लक्ष्मीनारायणाचा जर आपल्याला आशीर्वाद पाहिजे. असेल तर आपल्याला तुळशी मातेची पूजा करायला हवी. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील आपल्या घरामध्ये असणे खूप महत्त्वाचे आहे.
अध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील तुळशी मातेची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे प्रत्येकाच्याच घरामध्ये तुळस ही असायलाच हवी आपले कुटुंब सुखी, समृद्धी, समाधानी रहावे. आपल्या कुटुंबामध्ये वादविवाद होऊ नयेत, म्हणून तुळशी मातेची स्थापना करून तिची पूजा करायला हवी. तुळशीच्या रूपामध्ये औषधी गुणधर्म बरोबरच दैवी शक्तीदेखील असते. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण सकारात्मक राहते.
तुळशीमुळे अनेक सूक्ष्म किटाणू मारले जातात. व यांचा आपल्या शरीरावर कसल्याही प्रकारचा वाईट परिणाम होत नाही. जर आपल्या घरांमध्ये वास्तुदोष असेल किंवा नकारात्मक ऊर्जा असेल या सर्व दोषांपासून आपली सुटका होते. तुळशीचे रोप जर आपल्या वास्तूमध्ये असेल तर आपल्या घरातील हवा शुद्ध होते. व मुबलक प्रमाणात आपल्याला ऑक्सिजन मिळतो.
तुळस ही कार्तिक महिन्यामध्ये लावावी. तुळस लावण्यासाठी कार्तिक महिना खूप शुभ आहे. कार्तिक महिन्याच्या कोणत्याही दिवशी तुम्ही आपल्या घरांमध्ये तुळशी माती ची स्थापना करू शकता. त्याचबरोबर कोणत्याही महिन्यातील गुरुवारच्या दिवशी आपण तुळशी मातीची स्थापना करू शकतो. एकादशीच्या दिवशी देखील आपण तुळशी मातेची स्थापना करू शकतो. किंवा कोणत्याही महिन्यामध्ये येणार्या पौर्णिमेला देखील आपण तुळशीची स्थापना करू शकतो.
वरील सांगितलेल्या प्रमाणे कार्तिक महिन्यातील सर्व दिवशी व प्रत्येक महिन्याच्या गुरुवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपण तुळशी मातेची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. मात्र ही स्थापना सायंकाळ होण्यापूर्वी करायचे आहे. मग तुम्ही सकाळी दुपारी केव्हाही तुळशी मातेची स्थापना करू शकता.
तुळशी मातेची स्थापना घरामध्ये केल्यानंतर तुळशी मातेचे रोप कोणत्या दिशेला असायला हवे. असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये येतो तुळशी मातेचे रोप ठेवण्यासाठी आपल्या घरातील पूर्व दिशा अत्यंत शुभ आहे पूर्व दिशेला आपण तुळशी मातेची स्थापना करू शकतो. किंवा तुळशी मातेचे रोप उत्तर दिशेला लावले तरीही चालते पूर्व आणि उत्तर दिशेच्या मधील दिशेला म्हणजेच ईशान्य कोपर्यात देखील आपण तुळशीचे रोप लावू शकतो. आपल्या शास्त्रामध्ये तुळशी मातेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे जर या दिशेला जर आपण तुळशी मातेची स्थापना केली व नित्य नेमाने त्यांची पुजा केली तर आपल्यावर लक्ष्मीनारायण प्रसन्न होतील. व आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आपल्या घरांमध्ये भरभराटी येईल.
मित्रांनो हि माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.