नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो आपले देखील घरांमध्ये वारंवार भांडणे होत असतील कटकटी होत असतील एकमेकांचे पटत नसेल तर तुम्ही देखील हा एक उपाय नक्की करा त्याने आपल्या घरातील भांडणे तंटे सर्वकाही कमी होईल. व आपले आयुष्य देखील सुखी समाधानी होईल. ज्यावेळी घरामध्ये वारंवार भांडणे होत असतात त्या वेळेस त्या घराच्या सर्व गोष्टी विस्कळीत होतात. त्या घराला घरपण देखील राहत नाही. कोणत्याही प्रकारची कामे व्यवस्थित होत नाहीत. व ज्या घरामध्ये वारंवार भांडण-तंटे होते त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास कधीही राहत नाही. घरातील सर्व काही विस्कळीत होते व त्या घरांमध्ये पैसा देखील टिकत नाही मग अशा घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा व वाईट शक्तींचा प्रवास मोठ्या प्रमाणात होतो.
यामुळे अनेक दोष निर्माण होतात घरातिल सदस्यांचे आरोग्य बिघडते अनेक व्याधी होतात. या सर्वांच्या साठी कारणीभूत असणाऱ्या गोष्टी म्हणजे आपल्या घरातील कटकटी आणि भांडणे यामुळे आपल्या घरामध्ये असे दोष निर्माण होतात त्यामुळे आपल्या घरामध्ये होणारे वारंवार भांडण तंटे लवकर थांबवायला पाहिजे मात्र असे करून देखील आपल्या घरातील भांडण तंटे थांबत नसतील तर आपल्याला काही उपाय तोडगे करावे लागतात. चे उपाय व तोडगे कोणकोणते करायचे आहेत. याबद्दलची माहिती आपण आज या लेखांमध्ये घेणार आहोत. हा उपाय इतका प्रभावशाली आहे की याचा फायदा आपल्याला नक्की होईल आपल्या घरातील वातावरण सुख-समृद्धीचे समाधानाचे होईल.
गाईचे गोमुत्र व हळद एकत्र करून हे आपल्या घरात सर्वत्र शिंपडायचे आहे. हळद यासाठी घ्यायची आहे, की हळदीमुळे आपल्या घरातील जे काही दोष असेल ते दोष नाहीसे होतात वाईट शक्ति घरामध्ये राहत नाहीत. ज्या वाईट शक्ती हळदीमुळे दूर होतात. व आपल्या घरातील पवित्रता दूर होते आपल्या घरामध्ये येणाऱ्या सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी घरातील वातावरण पवित्र करते. त्यामुळे सतत गाईचे गोमुत्र व हळद एकत्र करून आपल्या घरामध्ये वारंवार शिंपडावे वरचेवर हा उपाय आपल्याला करायचा आहे. ज्यांना हा उपाय वरचेवर करणे शक्य नाही. त्यांनी आठवड्यातून एकदा तरी हा उपाय करावा. हा उपाय करण्यासाठी शनिवार निवडावा शनिवारच्या दिवशी हा हळद आणि गोमूत्राचा उपाय केला तर आपल्या घरातील कटकटी, वाद-विवाद कायमचे नाहीशी होतील.
आपल्याला जो उपाय करायचा आहे तो उपाय आपण दिवसभरामध्ये कोणत्याही एका वेळेस करू शकतो. हा उपाय करण्यासाठी आपण कोणताही वार निवडू शकतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला मूठभर तांदूळ लागणार आहेत आपल्या हातामध्ये मुठभर तांदूळ घेऊन घराच्या मुख्य दरवाजाजवळ यावे व घराच्या बाहेरील बाजूस उभा राहून आपल्या घरावरून हे तांदूळ तीनदा उतरवायचे आहेत. हे उतरवत असताना घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणेच हे तांदूळ आपल्या घराच्या मुख्य दरवाजा वरून फिरवायचे आहे. हे तांदूळ आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर फिरवून झाल्यानंतर त्या तांदळातील चुकून एकही तांदूळ आपल्या घरांमध्ये येणार नाही याची खबरदारी घ्यावी.
व हे तांदूळ कोणत्याही पक्षांना खाण्यास द्यावे किंवा आपल्या घराच्या छतावर पक्ष्यांसाठी ठेवावे. मात्र हे तांदूळ पुन्हा आपल्या घरात येणार नाही याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. मात्र हा उपाय आपल्याला एकदाच करायचा आहे तो आपण कोणत्याही दिवशी करू शकतो. याचबरोबर आपल्याला दुसरा देखील उपाय करता येतो. हा उपाय जर आपण दररोज केला तर आपल्या घरामध्ये कधीही भांडण-तंटे होणार नाहीत. ही स्वामींची सेवा आपल्याला दररोज करायची आहे. स्वामींच्या मित्र सेवेच्या पुस्तकांमध्ये दिलेले कालभैरवाष्टक मंत्र आपल्याला दररोज म्हणायचे आहे.
कालभैरव अष्टक हे मात्र आपल्याला दररोज संध्याकाळची देव पूजा झाल्यानंतर वाचायचे आहे. मात्र हे संध्याकाळीच वाचायचे आहे. ज्यावेळी आपण संध्याकाळची देव पूजा करतो देवाला दिवा अगरबत्ती लावतो त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसूनच कालभैरवाष्टक मंत्र दररोज म्हणायच आहे. यामुळे आपल्या घराचे रक्षण होते व कोणत्याही प्रकारच्या अडचणी आपल्यावर आपल्या घरावर कधीही येत नाहीत. व आपल्या घरांमध्ये होणारे वारंवार भांडण तंटे देखील कमी होतात. हे दोन उपाय केल्याने आपल्या घरातील कटकटी भांडणे कायमचे संपतात. हा उपाय केल्याने आपल्या घरातील भांडण तंटे कमी होतील.
मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशा प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.