इच्छाप्राप्तिसाठी स्वामी सेवा : मनातली कोणतीही इच्छा असेल तर करा ‘ही’ स्वामी सेवा

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींना आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींची ही सेवा करायला आपल्याला तर माहीतच आहे. की प्रत्येकाला काही ना काही हवे असते कोणाला घर नोकरी हवी असेल किंवा अन्य कोणत्याही अडीअडचणी असतील. या सर्व अडचणींवर स्वामी केंद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा दिल्या जातात आणि आपल्याला मिळालेली केंद्रातील सेवा अत्यंत श्रद्धेने व निष्ठेने त्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करून जर आपण केले तर आपली इच्छा पूर्ण होते. मात्र ही सेवा करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा असायला हवी आणि आपण ज्या कार्यासाठी ही सेवा सुरू केली आहे ते कार्य पूर्ण होते. त्याचबरोबर आपल्या मनात सर्व इच्छा देखील पूर्ण होतात. आजच्या लेखामध्ये आपण मनातील इच्छा पूर्ण करणारा उपाय कोणता आहे तो जाणून घेणार आहोत.

आपल्या मनामध्ये कोणतीही इच्छा असू द्या. किंवा आपल्याला कोणतीही गोष्ट हवी असेल तर आपल्याला फक्त एका मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. सर्व आपल्या मनासारखे होईल. आपण जर स्वामी समर्थांचे सेवेकरी असाल तर आपल्याला ह्या गोष्टी माहीतच आहेत. स्वामींच्या भक्तीमध्ये, सेवेमध्ये कसल्याही प्रकारचे स्वार्थ नसतो. स्वामी समर्थ महाराजांना सर्व काही माहीत असते. ते सर्व ज्ञानी आहेत त्यांच्यापासून कोणत्याही गोष्टी लपलेल्या नाहीत. आपल्या सर्वच गोष्टींवर कार्यांवर त्यांचे लक्ष असते. कारण स्वामी महाराज हे प्रत्येक भक्तांचे आई वडील असतात. आणि आई-वडिलांना आपल्या मुलांना काय हवे आहे काय नको हे माहीत असते.

मित्रांनो ही सेवा करण्याआधी आपल्याला संकल्प सोडायचा आहे. आणि हा संकल्प आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने सोडू शकतो. संकल्प सोडण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये बसायचे आहे. देवघराच्या समोर बसल्यानंतर संकल्प सोडण्यासाठी आपल्याला एक तामण पळी पात्र लागणार आहे. आपल्या डाव्या हाताच्या साह्याने परी पात्रातील पाणी आपल्या उजव्या हातावर घ्यायचे आहे. आणि आपल्या मनातील काही आहे. ती इच्छा त्या ठिकाणी बोलायची आहे. आपली इच्छा सांगून झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर असे बोलायचे आहे. की मी इच्छा पूर्ण करण्यासाठी हा संकल्प सोडत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करा. माझी ईच्छा लवकरात लवकर पूर्ण करा असे म्हणून आपल्या उजव्या हातातील पाणी त्यात ताम्हनात सोडायचे आहे.

आणि त्याच्या मनातील पाणी तुळशी मध्ये जायचे आहे. ही सेवा आपण कोणत्याही महिन्यातील गुरुवार पासून सुरू करू शकतो. ही सेवा आपल्याला कमीत कमी तीन महिने करायची आहे. ही सेवा केल्यामुळे आपली इच्छा पूर्ण होईल आपल्याला सारामृत या पारायणाचे क्रमशा रोज तीन अध्याय वाचायचे आहेत. 21 पारायणाचा हा ग्रंथ आहे सात दिवसांमध्ये आपले हे एक पारायण पूर्ण होते. पुन्हा दुसऱ्या दिवसापासून आपल्याला सलग क्रमशा हे तीन अध्याय वाचायचे आहेत. अशा प्रकारे स्वामी सार अमृताचे पारायण तीन महिने आपल्याला करायचे आहे. त्यानंतर स्वामी नित्यसेवा या पोथी मध्ये गीतेचा पंधरावा अध्याय दिलेला आहे. हा गीतेचा पंधरावा अध्याय आपल्याला एक वेळेस वाचायचा आहे. सारामृत-अध्याय व गीतेमधील पंधरावा अध्याय दररोज न चुकता आपल्याला एक वेळेस वाचायचा आहे.

त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे. ज्यांना अकरा माळी जप करणे शक्य नाही. त्यांनी कमीत कमी एक माळ तरी जप करायचा आहे. या तीनच गोष्टी आपल्याला या सेवेमध्ये करायचे आहेत. या गोष्टी करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि इच्छा ठेवून करा, म्हणजे आपली इच्छा पूर्ण होईल. ही सेवा करत असताना मनोभावाने, श्रद्धेने, विश्वासाने आपल्याला करायची आहे. आणि वर सांगितल्याप्रमाणे ही सेवा करत असताना दररोज आपल्याला संकल्प सोडायचा नाही. ज्यावेळी आपण पहिल्यांदाच ही सेवा करणार आहोत. त्यावेळेसच आपल्याला हा संकल्प सोडायचा आहे. पुन्हापुन्हा संकल्प सोडायचा नाही. आणि सारामृत ग्रंथाचे पुस्तक आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सहज मिळते. किंवा आपण हा ग्रंथ ऑनलाईन देखील मागू शकता.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.