नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणीनो 16 एप्रिल शनिवारचा दिवस आणि या दिवशी येत आहे. हनुमान जयंती चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. आणि हे हनुमान जयंती भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये साजरी केली जाते आपल्यापैकी बरेच हनुमान भक्त आपल्यावर आपल्या घरावर, आपल्या, घरातील इतर सदस्य वर आलेल्या संकटांपासून सुटका करून घेण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी काही विशेष उपाय करतात. आणि या दिवशी केलेले कोणतेही उपाय होतात. व देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो हनुमान जयंतीच्या दिवशी पैशाच्या संदर्भातील असलेल्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपण हा एक उपाय करू शकतो. हा उपाय केल्याने आपल्याकडे भरपूर पैसा येणार आहे. आणि आजच्या या लेखामध्ये या बद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन लवंग लागणार आहे. व मोहरीचे तेल लागणार आहे. जर आपल्याकडे मोहरीचे तेल नसेल तर आपण जाईचे तेल वापरू शकतो. हा उपाय आपल्याला रात्रीच्या वेळी करायचा आहे. म्हणजेच अकरानंतर ची वेळ हा उपाय करण्यासाठी योग्य आहे. हा उपाय आपण सकाळी करू शकतो. पण यायचे उचित फळ मिळण्यासाठी हा उपाय अकरानंतर केल्याने याचे फळ लवकर मिळते. आणि हा उपाय करण्यासाठी आपण जी लावून घेणार आहोत. ती लवंग अखंड फुला सहित असावी. हनुमान च्या मंदिरात जाऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर आपल्याला हनुमान च्या मंदिरा मध्ये जाणे शक्य नसल्यास आपण त्यांचा फोटो घरामध्ये आणून देखील हा उपाय करू शकतो. पूजा करत असताना मात्र हनुमान चे तोंड दक्षिण दिशेला असायला हवे याची काळजी घ्यायला हवी.
हनुमान ची पूजा करण्यासाठी पाठ घ्यायचा आहे. व त्यावर लाल रंगाचा स्वच्छ रुमाल द्यायचा आहे. आणि त्या रुमालावर हनुमान चा फोटो किंवा मुर्ती ठेवून त्यांची विधियुक्त शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करायचे आहे. पूजा करून झाल्यानंतर त्यांना भाजलेले फुटाणे आणि गूळ याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. व त्यांना लाल रंगाची फुले अर्पण करायचे आहेत. ज्यावेळी आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावणार आहोत. त्यातील वात ही लाल रंगांची असावी. लाल रंगाची वात तयार करण्यासाठी आपल्याला शेंदूर किंवा कुंकू घेऊन ती वात वळायचे आहे. त्यामुळे त्या वातीचा रंग लाल होतो. व दोन फुला सहित अखंड लवंग आपल्याला हनुमान यांच्या जवळ ठेवायचे आहेत. व हनुमान चालीसाचे पठण आपल्याला करायचे आहे.
अशा पद्धतीने तो दिवा लावून झाल्यानंतर हनुमान चालीसाचे पठण करावे. व त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या आयुष्यातील अडीअडचणी सर्व काही दूर कराव्यात अशी देवाकडे प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आरतीचे ताट तयार करावे. व त्या ताटातील दिव्यामध्ये लवंग टाकून त्यानेच आरती करावी. असे जर केले तर आपल्या आयुष्यातील संकटे दूर होतात. असे मानले जाते हनुमान जयंतीच्या दिवशी 11 पानांची रूईची माळ, मोहरीचे तेल, शेंदूर अर्पण करावे. व रुईच्या प्रत्येक पानावर कुंकवाच्या किंवा शेंदूराचा साह्याने श्रीराम असे लिहावे. व हनुमान यांच्या गळ्यात घालावी. यामुळे देखील आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि आपली आर्थिक प्रगती देखील होईल. आणि हनुमान चालीसाचे पठण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी सर्व काही दूर होतील. व आपली प्रगती होईल. आणि पैशाच्या संदर्भातील असलेल्या सर्व अडीअडचणी निघून जातील. आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सदैव राहील.
मित्रांनो हि माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.