नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींना आजचा दिवस आपल्या सर्वांचे प्रिय हनुमान चा जन्मदिवस आहे. त्यामुळे आजचा दिवस श्रीरामांच्या भक्तांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. आणि हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचे भक्त वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात. मात्र आजच्या या लेखामध्ये आपण असे काही उपाय पाहणार आहोत. ते उपाय केल्याने बजरंग बली आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत. व आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी देखील दूर करणार आहेत. त्याचबरोबर सर्व संकटे आणि नकारात्मक शक्ती या देखील यामुळे नष्ट पावणार आहेत आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे. की बजरंग बली आज सुद्धा आपल्या धर्तीवर आहेत. श्रीरामाने हनुमानाला असे वरदान दिले होते. की कलीयुगाच्या शेवटी पर्यंत ते धर्तीवरच राहणार आहेत. आणि धरतीवर राहून श्रीरामांच्या भक्तांची मदत करणार आहेत.
त्यामुळे मित्रांनो आपण सर्वजण हनुमान जयंतीच्या दिवशी श्रीराम व हनुमान यांची विशेष पूजा करायला हवी. आम्ही त्यांना आपल्या आयुष्यातील सर्व दुःखे संकटे दूर करण्यास सांगावे. हनुमान जयंतीच्या दिवशी त्यांच्या मूर्तीला शेंदूर लावा खूप शुभ मानले आहे. आणि हा शेंदूर हनुमानाच्या मूर्तीला लावल्यास आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. व हनुमान आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात. हनुमान ची पूजा करण्याआधी श्रीरामांची पूजा करावी. कारण हनुमान ची पूजा करून श्रीरामांची पूजा केल्याने हनुमान आपल्यावर कधीही प्रसन्न होणार नाहीत. त्यामुळे पहिला श्रीरामांची पूजा करावी. व त्यानंतर हनुमानाची पूजा करावी जर आपण आपल्या दुर्भाग्य पासून मुक्ती मिळवणार असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी लाल फुलांचा हार व त्या सोबत काळे उडीद व सुपारी अर्पण करावी.
हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी पासून आपली सुटका होईल. हनुमान जयंतीच्या दिवशी घेऊन त्या नारळाला शेंदूर लावावा. व शेंदुर लावलेल्या नारळाला लाल रंगाचा दोरा बांधावा. आणि लाल दोरा बांधलेला नारळ कोणत्याही हनुमानाच्या मंदिरात त्यांच्या पायाजवळ अर्पण करावा. नारळ अर्पण करत असताना नारळाची शेंडी हनुमान यांच्याकडे असावी या पद्धतीने तो नारळ हनुमान यांच्या पायावर आपल्याला ठेवायचा आहे.नारळ ठेवून झाल्यानंतर आपल्याला एक वेळेस हनुमान चालीसा चे पठाण करायचे आहे. आणि त्यानंतर तो नारळ तेथून आणून आपल्या तिजोरी मध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो. त्या ठिकाणी तो नारळ ठेवावा यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चालणाऱ्या आर्थिक अडचणी देखील कमी होतील व आपल्याकडे पैशाचा ओघ वाढेल.
जर आपल्याला हित शत्रूंचा त्रास तू एखादी व्यक्ती जर आपल्याला त्रास देत असेल तर पांढऱ्या रुईची अकरा पाने घेऊन त्यावर शेंदूराने किंवा कुंकवाने प्रत्येक पानावर श्रीराम असे लिहायचे आहे. आणि ही माळ हनुमान च्या गळ्यामध्ये घालायची आहे. व आपल्याला होणाऱ्या शत्रू जा किंवा त्या व्यक्तीचे नाव घेऊन त्याच्या त्रासापासून माझी सुटका करा, अशी विनंती हनुमान यांना करायचे आहे. हा उपाय आपण जर हनुमान जयंतीच्या दिवशी केला तर आपल्याला होणारा शत्रूंचा त्रास किंवा ज्या व्यक्ती आपल्याला त्रास देत आहेत त्या व्यक्तींच्या त्रासापासून आपली सुटका होईल. एक नारळ घेऊन मंदिरामध्ये जावे, आणि हनुमान यांच्या मूर्ती समोर उभा राहून तो नारळ आपल्यावरून सातवेळा घड्याळाच्या काट्याप्रमाणे उतरून घ्यायचा आहे. आणि तो नारळ हनुमान च्या मंदिरा मध्येच वाढवायचा आहे. आणि आपल्याला होणाऱ्या दुःखापासून त्रासापासून आपली सुटका करा अशी प्रार्थना करायची आहे.
हनुमान जयंतीच्या दिवशी तिळाच्या तेलामध्ये शेंदूर मिक्स करून हनुमानाच्या मूर्तीला लावावे. व त्यांना लाल रंगाची फुले अर्पण करावीत. आणि हनुमान च्या मूर्तीसमोर ओम रामायण नमः या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर सिताराम जय श्रीराम ओम श्री रामदूताय नमः या पैकी कोणत्याही एका मंत्राचा हनुमान जयंतीच्या दिवशी जप करावा. मात्र हा जप आपल्याला 108 वेळा करायचा आहे. या मंत्राचा आपण जर जप 108 वेळा केला तर नुमान आपल्यावर प्रसन्न होतील. व आपल्यावर येणार्या प्रत्येक अडचणी पासून आपली सुटका करतील. हे होते काही उपाय जे आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचे आहेत. यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी संकटे सर्व काही नाश होईल व दुर्भाग्य पासून आपली सुटका होईल.
मित्रांनो हि माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.