नमस्कार मित्र मैत्रिणींनो
मित्रांनो , यंदाच्या वर्षी म्हणजेच शुक्रवार दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी पहाटे 05:55 ते 08:40 या वेळेत रवी योग तयार होत आहे. या योगामध्ये हनुमानाची उपासना, अनेक विधी केल्याने इच्छित फल प्राप्त होते. तसेच या योगामध्ये तुम्ही कोणतेही काम कराल तर त्यात यश मिळेल.चला तर मग जाणून घेऊयात हनुमान जयंतीच्या दिवशी करायचे उपाय.
मित्रांनो, आपल्या घरात आजारी व्यक्ती असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन तुपामध्ये कुंकू मिसळून हनुमानाला त्याचा लेप लावावा असे केल्याने आपल्याला हनुमंताचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपण रोगमुक्त ,भयमुक्त होऊ शकतो.
मित्रानो जर आपल्याला कर्जाविषयक तांत्रिक अडचणी असतील तर हनुमान जयंतीच्या दिवशी पांढऱ्या कोऱ्या कागदावर स्वस्तिक काढून हनुमानाना अर्पण करावा आणि आपल्या अडचणी असतील तर त्या हनुमानापुढे सांगायच्या. स्वस्तिक काढलेला कागद आपण ज्या ठिकाणी पैसे किंवा धन ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचा. असे केल्याने आपल्या पैशाच्या किंवा कर्जाच्या विषयी असलेल्या अडचणी दूर होतात आणि आपले घर धनधान्याने भरते.
मित्रानो, जर आपल्या घरातील कन्येचा विवाह होत नसला तर हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन हनुमानाला कुंकू वाहून त्यातलाच थोडा कुंकू घेऊन आपल्या माथ्यावर लावायचा आहे. जर घरामध्ये सतत वाद, तंटे होत असतील तर मोहरीच्या तेलात कुंकू मिसळून घराच्या प्रत्येक खोलीच्या दरवाज्यावर स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे. असे केल्याने नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येऊ शकत नाही आणि आपल्या घरात सुख, शांती समाधान नांदेल.
मित्रांनो, तुम्हाला नोकरीविषयी किंवा उद्योगधंदा विषयी अडचणी असतील तर हनुमानाला कुंकू अर्पण करून त्यातला थोडा घेऊन कोऱ्या कागदावर स्वस्तिक चिन्ह काढून आपल्या पाकीट मध्ये ठेवावा. असे केल्याने आपल्या अडचणी दूर होतील.जर कर्ज झाले असेल तर मोहरीच्या तेलात कुंकू मिसळून हनुमानाला त्याचा लेप लावावा. यातून तुम्हाला कर्जाची अडचणी असतील तर त्या दूर होतील.
तर मित्रांनो तुम्हाला देखील यापैकी कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर हनुमान जयंती दिवशी हे उपाय केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील व तुमचे जीवन कायमच आनंदी राहील. घरामध्ये सुख शांती नांदेल.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.