हनुमान जयंतीला करा ‘हा’ उपाय : घरात सुख, समाधान भरभराट होईल!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो येणारा शनिवारी म्हणजेच 16 एप्रिल 2022 हा दिवस सर्वांसाठी खूप चांगला दिवस आहे. राम नवमी परवाच होऊन गेली त्यानंतर हनुमान जयंती येते सर्वांना माहीतच आहे. पण हनुमान जयंती दिवशी पौर्णिमा असल्याकारणाने हा दिवस उत्तम आहे.

हनुमान जयंती दिवशी बजरंग बलीची आपण मनोभावे आपण सेवा केली तर त्यादिवशी केलेली सेवा पूर्णत्वाला जाणार आहे. कारण हा बजरंग बली चा जन्मसोहळा आहे.

बजरंगबली यांच्याजवळ श्रद्धेने आपण कोणतीही गोष्ट मागितली तर ती आपल्याला मिळणारच आहे.

सध्याची परिस्थिती पाहता आपण कोणत्याही मंदिरात जाऊ शकत नाही पण मंदिराची पूजा करावयाची आहे ती पूजा जर आपण घरी केली तर स्वतः बजरंगबली आपल्या घराचे रक्षण करणार आहेत,आपल्या घरामध्ये बरकत आणणार आहेत, आपले घर सुख समाधानाने भरभरून ठेवणार आहेत.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला शेंदूर किंवा अष्टगंध लागणार आहे .शेंदूर किंवा अष्टगंध वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये थोडे पाणी घालून घट्टसर असा त्याचे मिश्रण तयार करून घ्यायचं व ह्या मिश्रणाने आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर बाहेरील बाजूस स्वस्तिक काढायचे आहे.

हनुमान जयंती दिवशी हा उपाय केल्याने घरामधील दुःख दारिद्र्य निघून जाणार आहे घरामध्ये भरपूर आनंद होणार आहे. जुनाट दुखणी देखील निघून जातील. घरामध्ये बरकत राहील घरामध्ये सुख समाधान वाढेल.

मित्रांनो हनुमान जयंती दिवशी हा उपाय जर आपण केला तर घरातील निगेटिव ऊर्जा बाहेर पडणार आहे व सकारात्मक वातावरण घरात तयार होणार आहे बाहेरील बाधा यांचा वगैरे आपल्याला काही त्रास होणार नाही.

मित्रांनो याशिवाय या उपायाचे अनेक इतरही भरपूर फायदे आहेत. हा उपाय अनेकांनी आतापर्यंत करून पाहिला आहे त्यांना निश्चित असे यश मिळाले आहे. आपणही हा उपाय केल्यास आपणाला निश्चितच चांगले यश लाभेल.

मित्रांनो वरील माहिती ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातून तसेच इतर विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेज ला आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *