नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो हिंदू शास्त्रात तुळशीला अतिशय पवित्र वनस्पती मानली जाते. ही वनस्पती लावल्याने घरात सुख-समृद्धी वाढते. ही औषधी म्हणून देखील वापरली जाते. असे म्हणतात की जेथे तुळस असते, तिथे नकारात्मक ऊर्जा वास करत नाही. भगवान विष्णूच्या पूजेत तुळसचा वापर केला जातो. याशिवाय, त्यांची पूजा अपूर्ण मानली जाते. मान्यता आहे की, तुळशीची नियमित पूजा केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते. ज्योतिष शास्त्रानुसार घरगुती त्रास, लग्नाला उशिर होणे, व्यवसायातील तोटा या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुळशीचा उपयोग केला जाऊ शकतो.
आणि त्याचबरोबर मित्रांनो घरामध्ये तुळशीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते. याला जेवढे धार्मिक महत्त्व आहे, तेवढेच ते विज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे. याशिवाय घरामध्ये तुळशीचे रोप ठेवणे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात खूप फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. या सर्व कारणांमुळे बहुतेक घरांमध्ये तुळशीचे रोप असते. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीची पाने नक्कीच अर्पण केली जाते. विष्णूचे तुळशीवर खूप प्रेम आहे. याशिवाय ज्या घरात तुळशीचे रोप असते, तिथे लक्ष्मीची कृपादृष्टी राहते.
परंतु तुळशीचे रोप ठेवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. मित्रांनो या मधील सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुळशीचे रोप नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे. तुळशीचे रोप चुकीच्या दिशेने ठेवल्याने फायदा होत नाही.
घरात तुळशीचे रोप लावणे पुरेसे नाही, तर त्याची रोज पूजा आणि सेवाही करावी. यासाठी रोज सकाळी आंघोळ करून तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी दिवा लावावा.महिलांनी तुळशीला जल अर्पण करताना केस कधीही उघडे ठेवू नयेत.
आणि त्याचबरोबर मित्रांनो घरातील महिलांनी किंवा सुहासिनींनी नेहमी तुळशीला केस बांधून जल अर्पण करावे. शक्य असल्यास दुधात पाणी मिसळून अर्पण करावे आणि रविवारी आणि एकादशीला कधीही तुळशीला जल अर्पण करू नका. या दिवशी तुळस भगवान विष्णूसाठी उपवास करते, असे म्हणतात आणि तुळशीच्या झाडाभोवती केर, घाण भांडी, पादत्राणे, झाडू किंवा कचरा चुकूनही ठेवू नका. तसेच तुळशीच्या झाडावर घाण पाणी कधीही पडणार नाही अशी व्यवस्था करा, अन्यथा तुम्हाला धनहानी सहन करावी लागू शकते. याशिवाय अनेक समस्याही येऊ शकतात.
त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना तुळशीच्या आजूबाजूला इतर अनेक झाडे लावण्याची सवय असते परंतु मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार तुळशीभोवती काटेरी झाडे लावू नका. अन्यथा, घरामध्ये अशुभ आणि नकारात्मकता वाढेल.ज्या भांड्यात तुळशीचे रोप लावता त्या कुंडीत दुसरे कोणतेही रोप लावू नका. तसेच तुळशीचे रोप टेरेसवर ठेवू नका. ते घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत ठेवावे. संध्याकाळी तुळशीखाली दिवा ठेवल्यानंतर विझलेला दिवा काढायला विसरू नका.
वरील माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.