अजूनही दिवसातून दोन वेळा समुद्रामध्ये गायब होतंय गुजरात मधील ‘हे’ अनोख मंदिर : विशेष सखोल माहिती

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये विविध जाती-धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात आणि त्यातही काही धार्मिक स्थळांचे खास असे वैशिष्ट्य आहे. या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळेही धार्मिक स्थळे त्या धर्माच्या लोकांबरोबरच अन्य धर्मियांचे, पर्यटकांचेही आकर्षण बनतात. भारतात अशी अनेक स्थळे आहेत ज्यांच्याविषयी अजूनही फार कमी लोकांना माहिती आहे. अशा मंदिरांपैकीच एक म्हणजे गुजरातमधील जांबुसर तालुक्यातील कावी-कंबोई या गावातील श्री स्तंभेश्वर महादेव मंदिर. या मंदिराचे खास वैशिष्ट्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे सविस्तर वाचा.

काबी-कंबोईचे हे श्री स्तंभेश्वर महादेव मंदिर अरबी समुद्र किनाऱ्यापासून दीड किलोमीटर आत पाण्यात आहे. हे मंदिर दिवसांतून दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी क्षणभरात पाहणाऱ्यांच्या डोळ्यासमोरून अदृश्य होते आणि काही वेळानंतर पुन्हा समोर दिसते. समुद्राला येणाऱ्या भरती आणि ओहोटीमुळे हे उद्भूत दृश्य पाहायला मिळते. ही उद्भूत घटना पाहण्यासाठी भाविकांबरोबच पर्यटकही या ठिकाणी गर्दी करतात. बहुतेक मंदिरांप्रमाणे किंवा धार्मिक स्थळांप्रमाणे या मंदिराविषयीही एक आख्यायिक प्रसिद्ध आहे.

भारतीय 18 पुराणांपैकी एक असलेल्या स्कंद पुराणात या पुरातन काळातील मंदिराचा उल्लेख सापडतो. तारकासुरावर देवांनी विजय मिळविल्यानंतर जेव्हा तारकासुराने देवांना विचारले की, ‘भगवान शंकराच्या भक्ताला मारण्याच्या पापाचे क्षालन ते कसे करणार?’ त्यावर भगवान विष्णूने त्याला सांगितले की, ‘निष्पाप लोकांच्या रक्तावर पोसलेल्या दुष्टाचा नाश करण्यात कोणतेही पाप नाही. तरी तुला जर अपराधी वाटत असेल तर तुझ्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी या शिवलिंगाची आराधना कर.’ असे सांगितले जाते की कार्तिकेय यांनी माता पार्वती आणि अन्य सर्व देवांच्या उपस्थितीत विधीवत तीन ठिकाणी अशा शिवलिंगांची स्थापना केली. त्या तीन पैकी एक स्तंभेश्वर येथील शिवलिंग असल्याचे सांगितले जाते.

दिवसातून दोनदा भरती आणि ओहोटीच्या वेळी हे मंदिर पाण्याखाली जाते या अद्भूत घटनेमुळे हे मंदिर गुजरातमधील गायब होणारे शिवमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. पण या अद्भूत वैशिष्ट्याची अद्याप अनेक लोकांना माहिती नाही. पण त्याबाबत वाचल्यानंतर या मंदिराला एकदा तरी नक्की भेट द्यावीशी वाटल्याशिवाय राहणार नाही.

वरील माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *