नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
ज्योतिष शास्त्रात प्रत्येक धातूचे गुणधर्म आणि परिणाम सांगितले आहेत. यामुळे सोने परिधान करणे शुभ मानले जाते. याशिवाय कुंडलीतील ग्रह दोष दूर करण्यासाठी सोने, चांदी किंवा इतर धातूंमध्ये अनेक रत्ने घालण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, बहुतेक रत्ने सोन्याबरोबर परिधान केली जातात. चला जाणून घेऊया सोन्याचे दागिने परिधान करण्याचे फायदे आणि कोणत्या राशीच्या लोकांनी सोने घालू नये. मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या राशीच्या लोकांनी जर सोन्याचे दागिने घातले आणि त्या सोबतच काही रत्ने घातली तर यामुळे त्यांचे नशीब बदलू शकते आणि त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येण्याची सुरुवात होऊ शकते.
आणि त्याच बरोबर आपल्या ज्योतिष शास्त्रामध्ये ही सोन्याचं खूप वेगळे महत्त्व सांगितलं गेला आहे, आपल्या ज्योतिषशास्त्रात सोन्याचा संबंध गुरु ग्रहाशी सांगितला आहे. वास्तविक, सोन्यावर गुरू ग्रहाचा प्रभाव आहे. अशा स्थितीत हे धातू धारण केल्याने गुरू ग्रह मजबूत होतो आणि जीवनात ऐश्वर्य, वैभव आणि सुख-समृद्धी येते. मित्रांनो याचा राशी पैकी सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे मेष,
या राशीसाठी सोने लाभदायक आहे, आणि या राशीच्या लोकांसाठी सोन्याची अंगठी घालणे फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. त्यातून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात. तसेच कर्जातून मुक्ती मिळते.
मित्रांनो त्यानंतरची दुसरी रास आहे ती म्हणजे सिंह, या राशीसाठी सोनं फायदेशीर ठरू शकते. वास्तविक या राशीचा अधिपती ग्रह सूर्य आहे. सूर्य आणि गुरू ग्रह यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे या राशीच्या व्यक्तीने सोनं परिधान करावे. आणि त्याच बरोबर मित्रांनो या राशीच्या लोकांनी सोने खरेदी करताना किंवा त्या सोन्याच्या दागिन्यांवर एखादे रत्ने लावताना ज्योतिषांचा सल्ला घेणेही खूप गरजेचे असते.
मित्रांनो त्यापुढची रास आहे ती म्हणजे कन्या, या राशीच्या लोकांसाठीही सोनं लाभदायक असल्याचे सांगितले जाते. या राशीचे लोक सोनं धारण करून भरपूर यश मिळवू शकतात. तसेच आर्थिक स्थितीही देखील चांगली राहते. म्हणूनच अनेक ज्योतिषी या राशीच्या लोकांना ही शरीरावर सोनं परिधान करण्याचा सल्ला देत असतात कारण या राशीच्या लोकांसाठी अंगावर सोनं परिधान करणं शुभ मानला गेला आहे आणि मित्रांनो त्यानंतर ची पुढची रास आहे ती म्हणजे धनु.
मित्रांनो धनु या राशीचा स्वामी गुरु असून सोन्याचा त्याचा गुरु ग्रहासोबत याविशेष संबंध असल्याचे मानले जाते. या राशीच्या व्यक्तीने सोने परिधान करणे शुभ असते. तसेच त्यांना प्रत्येक कामात यश मिळते. मित्रांनो वर सांगितलेल्या या चार राशीच्या व्यक्तीने अंगावर सोनं परिधान करणं शुभ असतं आणि त्याचबरोबर जर या व्यक्तीने आपल्या राशीनुसार या दागिन्यांत सोबत रत्ने घातली तर यामुळेही त्यांना खूप फायदा होऊ शकतो.
मित्रांनो या राशीन व्यतिरिक्त आणखीन जराशी आहेत त्यांनी ज्योतिषाचा सल्ला घेऊनच शरीरावर परिधान करावे कारण मित्रांनो आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ, मिथुन, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांनी सोने घालू नये. दुसरीकडे, तूळ आणि मकर राशीच्या लोकांनी जास्त प्रमाणात सोन्याचे दागिने घालू नयेत.
वरील माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.