आपल्या घरात पितृदोष आहे किंवा नाही कसे ओळखावे : जाणून घ्या सविस्तर माहिती

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्रांनो आपल्या घरात पितृदोष आहे किंवा नाही, आपल्याला त्यामुळे काही अडचणी येत आहेत का हे कसे ओळखावे जाणून घ्या आत्ताच..आपणाला पितृदोष आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी कुंडली असणे गरजेचे आहे. पण प्रत्येका जवळ कुंडली असते असे नाही.

कारण या धावपळीच्या जगात निश्चित वेळ किंवा तिथी माहिती नसल्या कारणाने आपण कुंडली काढू शकत नाही.

आणि बऱ्याच लोकांचं कुंडली असून देखील आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही हे निश्चित समजत नाही.

हे समजून घेण्यासाठी आपल्या घरांमध्ये ज्या घटना घडतात त्यावरुन देखील आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही हे समजते. हे समजून घेण्यासाठी काही उदाहरणे या लेखामध्ये दिलेली आहेत ते पाहूयात.

आपल्या घरावर पितृदोष आहे की नाही हे समजून घेण्यासाठी सर्वात पहिले उदाहरण म्हणजे ज्या घरामध्ये वडील आणि मुलगा या दोघांचे पटत नसेल त्यांच्यामध्ये वारंवार भांडण-तंटे होत असतील तर त्यांनी समजून जावे की आपल्याला पितृदोष आहे.

दुसरे म्हणजे मुला-मुलींचे लग्न लवकर जमत नसतील किंवा ती जमली तरी काही कारणाने त्यांची लग्न होत नसतील. अशा अनेक अडचणींना आई-वडिलांना सामोरे जावे लागते त्यावेळी देखील समजून जावे आपल्याला पितृदोष आहे. यामुळे या अडचणी वाढत आहेत.

तिसरं उदाहरण म्हणजे लग्न होऊन बरेच वर्ष झाले तरी ज्यांच्या घरांमध्ये पाळणा हलत नाही किंवा संतान प्राप्ति होत नाही अशा लोकांना देखील पितृदोष याचा त्रास असतो.

नोकरीमध्ये धंद्यामध्ये बरकत येत नसेल किंवा घरातील धन धान्याची बरकत होत नसेल , तर समजून जावे त्या घराला पितृदोष त्रास आहे.

वरील दिलेल्या कारणांपैकी कोणताही त्रास होत असल्यास आपल्याला पितृदोष आहे हे समजून घेऊन त्यावर उपाय करावेत.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे . याचा कोणीही अंधश्रद्धा संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि शेअर करा विसरू नका .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *