कुणी कितीही मागितले तरी ‘या’ चार वस्तू कोणालाही देऊ नका : माता लक्ष्मी घर सोडून जाईल, गरिबी येईल

नमस्कार मित्र- मैत्रिणींनो,

मित्र- मैत्रिणींनो, अशा काही वस्तू असतात की ज्यांच्याशी आपलं भाग्य आपलं नशीब हे जोडलेले असतात आणि म्हणून अशा वस्तू या आपल्या स्वतःच्या मालकीचे असतात. जे आपल्याकडे कायमस्वरूपी असतात.

त्या वस्तू इतर कोणाशीही शेअर करू नका इतर कुणालाही देऊ नका मग तो आपला चांगला मित्र असू द्या, आपली चांगली मैत्रीण असू द्या किंवा आपला जवळचा एखादा पाहुणा किंवा नातेवाईक असू द्या. कुणाशीही आपण या वस्तू शेअर करू नका.

या वस्तू वाटून घेतल्याने या वस्तू दुसऱ्याला दिल्याने मित्रांनो आपण आपलं नशीब आपलं भाग्य आहे दुसऱ्याला देत असतो.

आणि त्याचा परिणाम म्हणून आपलं नशीब मग आपल्याला साथ देत नाही. आपल्या घरामध्ये गरिबी येते आणि मग आपण म्हणतो की माता लक्ष्मी चा आशीर्वाद आम्हाला कसा काय मिळत नाही.

बघुया तर मग या कोणत्या वस्तू आहेत.. मित्र- मैत्रिणींनो, जी पहिली वस्तू आहे ती महिला वर्गाची संबंधित आहे. महिला वर्गाने त्यांच्या पायातले जोडवे हे कधीही कुणालाही देऊ नयेत. त्याचं कारण असं आहे की हे पायातील जोडवे हे सौभाग्याचं लेणं असत.

विवाहित महिला आहेत त्यांच्या अशा काही वस्तू असतात जसं की जोडवे किंवा मंगळसूत्र असेल. या वस्तू विवाहित स्त्रियांनी कधीही कोणाशीही शेअर करू नयेत. मग तुमची जवळची मैत्रीण असू द्यात किंवा जवळच्या नातेवाईक असू देत.

त्या वस्तू शेअर केल्याने दुसऱ्यांना दिल्याने तुमच्यामधील आणि तुमच्या पती, पत्नी मधील प्रेमामध्ये दुरावा निर्माण होतो. प्रेम कमी होतं आणि मग बऱ्याचस्या प्रसंगात घटस्फोटापर्यंत घडले आहेत.

ज्या पती-पत्नीमध्ये सौख्य नसतं, प्रेम नसतं अशा घरांमध्ये सतत वादविवाद होत राहतात. मग ज्या ठिकाणी वाद – विवाद असतात, शांती नसते अशा ठिकाणी माता लक्ष्मी राहणे पसंत करत नाही. लक्ष्मी त्याच्या घरातून कधीच निघून गेलेली असते.

दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आहे की आपल्या घरामध्ये जर लहान लहान मुलं असतील तर बर्‍याचदा मुलांनी वापरलेले कपडे जे त्यांना आता फिट बसत नाहीत किंवा त्यांना आता बसत नाहीत असे कपडे हे दान म्हणून गरिबांना दिले जातात.

पण लक्षात ठेवा की आपलं मूल जोपर्यंत नऊ किंवा अकरा वर्षाचा होत नाही तोपर्यंत त्यांचे कपडे कोणालाही देऊ नका.

आपल्या मनामध्ये परोपकाराची भावना नक्की असेल की गरिबांना थोडीफार मदत होईल. जर आपल्याला मदत करायची असेल तर आपण या गरिबांसाठी नवीन कपडे घेऊन द्या.

मात्र ज्यावेळी तुम्ही तुमच्या नऊ किंवा दहा वर्षापर्यंतच्या मुलांची कपडे त्यांना देता त्याचा थेट परिणाम हा तुमच्या मुलाच्या भाग्यावर होत असतो त्याच्या नशिबावर होत असतो.

तुम्ही पाहिले असेल की ज्या ज्या वेळी तुम्ही अशा प्रकारे कपडे दान म्हणून देता काही दिवसातच तुमचा मूल आजारी पडतं, तुमचं मूल किरकिर करू लागतं, ते स्वस्थ राहत नाही आणि याचं कारण तेच आहे आणि म्हणून आपल्या मुलाच्या भाग्यचा खेळ करू नका.

पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही दुसऱ्याला कपडे दान म्हणून देताना अकरा वर्षे पेक्षा मोठी मुल आहेत त्यांचे कपडे द्या.

कपडे दान म्हणून देतात तेव्हा हे कपडे साफसूथरे करून म्हणजेच अगदी स्वच्छ करून, धुवून ते कपडे आपण दान म्हणून द्यायला हवेत.

अगदी चोळामोळा झालेले आणि कसेतरी अस्ताव्यस्त पडलेले, फाटके तुटके कपडे आपण दान म्हणून देऊ नका. अशाने आपल्या पुण्य तर लाभणार नाहीच मात्र आपल्या भाग्यामध्ये मोठी घसरण यामुळे होते.

तसेच आपल्या चपला जुन्या असतील किंवा नवीन असतील या आपण कधीही कोणालाही दान म्हणून देऊ नयेत, कुठे सुद्धा देऊ नयेत. त्याचबरोबर गिफ्ट म्हणून सुद्धा या चपला किंवा बूट आपण अजिबात देऊ नका.

अजून एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची म्हणजे झाडू. आपण आपल्या घरामध्ये झाडू वापरतो तो आपण चुकूनही कोणालाही थोड्यावेळात साठी सुद्धा देऊ नका.

काही शेजारी किंवा आपले इतर लोक असतात की ते आपल्या घरातील झाडू मागतात थोड्यावेळासाठी. तर लक्षात घ्या झाडू लक्ष्मी स्वरूप आहे म्हणजे झाडू मध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीचा वास असतो.

भारतीय धर्म परंपरेमध्ये बरेचसे सण-उत्सव असे आहेत की त्या वेळी आपण या झाडूची पूजा करतो याचं कारण तेच आहे यात प्रत्यक्ष माता लक्ष्मी चा वास्तव्य असतं.

असा झाडू आपण इतरांना दिलात लक्षात घ्या तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मी इतरांबरोबर वाटून घेत आहात आणि मग पुढे जाऊन तुमच्या घरा मध्ये गरिबी आणि दारिद्र्याचा झालं तर त्यासाठी केवळ तुम्ही जबाबदार असता.

तुम्हाला झाडू दान म्हणून द्यायचा असेल तर फक्त मंदिरामध्ये द्या. कोणत्याही दिवशी एखाद्या शुभ दिवशी, शुभमुहूर्त झाडू दान करू शकता.

पण हे दान गुप्तपणे करा आणि पहाटेच्या वेळेस करा. यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम राहील.

मित्र- मैत्रिणींनो, पैसे उधार देताना ते कधीही तुम्ही मंगळवारच्या दिवशी देऊ नका कारण मंगळवारी दिलेले पैसे हे परत येण्याची सुतराम शक्यता नसते. अजिबात शक्यता नसते. धर्मशास्त्रामध्ये, वास्तुशास्त्रामध्ये, ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक पुराणांमध्ये याचे उल्लेख आढळतात.

पैसा किंवा लक्ष्मी किंवा जे तुम्ही एखाद्याला उधार देणार आहात जर तुम्ही मंगळवारी दिलं तर ते परत येण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात.

खूप प्रयत्न करून आणि खूप उशिरा हे पैसे आपल्यापर्यंत येतात आणि म्हणून मंगळवारी पैसे कधीही कुणालाही देऊ नका.

तसेच काही लहान-सहान गोष्टी की आपल्या डोक्यावरची टोपी आहे तर मित्र- मैत्रिणींनो, शेअर करतात लक्षात घ्या आपल्या कपाळावर ती आपलं भाग्य लिहिलेल असत म्हणून टोपीसुद्धा आपण एकमेकांना शेअर करू नये.

वरील माहिती ही वेगवेगळ्या शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये. तसेच अशा प्रकारच्या वेळ माहितीसाठी आमची पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *