म्हणा ‘हा’ संकट निवारण मंत्र : कोणतेही संकट, रोग दूर होईल : श्री स्वामी समर्थ

मित्रांनो सुखी समृद्धी व्हावे यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. त्यासाठी आपण नेहमी कष्ट करीत राहतो. परंतु तरीही आपल्या जीवनात कधी काही अडचणी येतात.

आपणाला काही संकट येतात. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी भगवंतांचे नामस्मरण करतो. काही उपाय करतो. कधी कधी या छोट्या छोट्या उपायांनी आपली आपल्या अडचणी दूर होतातही.

परंतु कधी कधी असे होते काहीही केले, कोणतेही उपाय केले तरीही आपल्या मागील संकटांची मालिका काही थांबत नाही. आता काय करावे हे आपल्याला सुचत नाही बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही.

मित्रांनो याच बाबत आज आम्ही आपणाला एक उपाय सांगणार आहोत. तो म्हणजे या मंत्राचा जप करणे. आपण सारखे नामजप करीत राहिलो तर या मंत्राच्या प्रभावामुळे जीवनातील मोठ्यात मोठे संकट, अडचणी, रोग, दोष सर्व कुठल्याकुठे पळतील.

हा श्रीमद्भागवतातील श्लोक आहे. श्रीमद्भागवतात स्पष्ट उल्लेख आहे की ज्या व्यक्ती या मंत्राचा मनोभावे व श्रद्धापूर्वक जप करतील त्यांच्या जीवनातील सर्व कष्ट व बाधांचे निवारण स्वतः भगवंत करतील.

मंत्र अगदी सोपा आहे आणि असेही नाही की हा मंत्र एका ठिकाणी बसून, काही पूजापाठ करून मग त्या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्राचा जप आपण आपले काम करता करता, येता-जाता, उठता -बसता, आपल्या मनातल्या मनात करू शकता.

त्यासाठी वेळेची किंवा विशेष अशा पूजनाची आवश्यकता नाही. फक्त मनोभावे व श्रद्धापूर्वक आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे.

हा मंत्र असा आहे –
‘ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।। प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।।’

या मंत्राचा स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की या मंत्राच्या नामस्मरणाने जपाने साक्षात भगवंत आपले क्लेष दूर करतात.
मित्रांनो शक्य असेल तर हा मंत्रजाप आपण पहाटे लवकर उठून, स्नान करून, स्वच्छ कपडे परिधान करून, एका आसनावर बसलात आणि या मंत्राचा 108 वेळा मंत्रजाप केला तर नक्कीच जास्त फलदायी होईल. यामुळे तुमचे मन दिवसभर नेहमी प्रसन्न आणि आनंदी राहील.

मित्रांनो या मंत्र जपाच्या सहाय्याने आपण आपल्या जीवनातील सर्व कष्ट व बाधांचे अगदी सहज निवारण करू शकतो. फक्त आपली श्रद्धा व विश्वास हवा.

सदरची माहिती ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातून तसेच इतरही विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे.याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेज ला सतत भेट देत राहा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *