नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो 3 एप्रिल हा स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे,स्वामी समर्थ महाराज भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले. श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थांच्या रूपाने दत्तात्रेय प्रकट झाले. असे आपल्या शास्त्रामध्ये मानल जात. आणि मित्रांनो आपल्यातील बरेच स्वामी बघतो या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत असतात.
मित्रांनो हे स्वामीभक्त आणि स्वामींचे सेवेकरी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्या देवघरामध्ये देव पूजा करून झाल्यावर स्वामी समर्थांची विशेष पूजा करत असतात आणि त्याच बरोबर या दिवशी स्वामी समर्थांच्या गुरुचरित्र पारायण मधील एकदातरी अध्यायाचे वाचन यादिवशी करतातच आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचा तारक मंत्र जप करत असतात मित्रांनो अशा पद्धतीने विधी व पणे स्वामी समर्थांची पूजा या दिवशी स्वामींचे अनेक भक्त करत असतात परंतु मित्रांनो आपल्यातील अनेक जणांना स्वामींच्या अशा पद्धतीने पूजा-अर्चा करून झाल्यानंतर स्वामींना काय नेवेद्य दाखवावा असा प्रश्न पडतो.
मित्रांनो आज आपण याबद्दलची सविस्तर पणे माहिती पाहणार आहोत की स्वामींच्या प्रकट दिना दिवशी स्वामींना कोणत्या प्रकारचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे की ज्यामुळे स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या पाठीशी कायम उभे राहतील, मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला या दिवसाची सुरुवात स्वामी समर्थांच्या पूजाअर्चा आणि नामस्मरणाने करायचे आहे आणि स्वामींच्या सेवेनंतर तुम्हाला एक विशेष नैवेद्य दाखवायचा आहे. हा विशेष नैवेद्य म्हणजे स्वामींचे आवडते पदार्थ ज्यामुळे स्वामी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील
या विशेष नैवेद्यासाठी तुम्ही गोडधोड करू शकता. पुरण पोळीचा नैवेद्य म्हणजेच खास नैवेद्य होय. पुरणपोळी सोबत दूध, तूप, खीर केली तरी चालेल व सोबत कांदा भजी करा. जर तुमची परिस्थिती नसेल तरी त्यांनी साधा विशेष नैवेद्य दाखवावा त्यांनी चपाती, भाजी व व गोड शिरा जरी करून स्वामींना नैवेद्य दाखवला तरी त्यांची सेवा स्वामी गोड मानून घेतील.
एखाद्याची परिस्थिती अगदीच बिकट असेल तर त्यांनी साधी पोळी भाजी व थोडं वाटीत दूध घालून त्यामध्ये एक चमचा साखर मिसळून ते तुम्ही नैवेद्य म्हणून सेवेत अर्पण करू शकता. स्वामींना प्रसन्न, शुद्ध मनाने भक्ती करणारे भक्त आवडतात.
आणि मित्रांनो स्वामींना शुद्ध भावना असणारे भक्त अतिशय प्रिय आहेत. स्वामी भक्ती जर तुम्ही अत्यंत मनापासून मनात अडी न ठेवता केली तर स्वामी आपले आयुष्यच बदलून टाकतात, आपली परिस्थिती सुधारते व स्वामी आशीर्वादाने आपली प्रगती होते.
त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी स्वामींची आवडती पुरणपोळी व कांदा भजी जरूर दाखवा व ज्यांना ते शक्य नाही त्यांनी निःसंकोचपणे स्वामी भक्ती अखंड करा व साधा दूध साखरेचा नैवेद्य स्वामींना अर्पण करा. स्वामी प्रसन्न होतील व पुढच्या वेळेस तुमची परिस्थिती सुधारून तुम्ही पुरण पोळी व पंच पकवान दाखवाल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.