नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो 3 एप्रिल स्वामी समर्थांचा प्रकट दिवस. हा दिवस म्हणजे प्रत्येक सेविका साठी विशेष भाग्याचा आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी करण्यात आलेली स्वामी समर्थांची सेवा ही मोठी भाग्याची मानली जाते. स्वामी समर्थांचा हा प्रकट दिन प्रत्येक सेवेकरी आणि भक्ती वर्गातून मोठ्या भक्तीने व महाराजांच्या श्रद्धेने साजरा करण्यात येतो.
मित्रांनो या दिवसाला दुसरे विशेष महत्त्व असे आहे की या दिवशी तुम्ही सेवा कराल आणि त्यानंतर तुम्ही तुमचे जे मागणी असेल ते महाराजांकडे स्वामींकडे कराल ती तात्काळ पूर्ण होते तुम्हाला त्या सर्व कामात यश लाभते. मित्रांनो हे आम्ही कोणाचीही ऐकून किंवा सांगण्यावरून आपणाला सांगत नाही तर तो अनुभवातून ही विशेष माहिती येथे आपल्यासाठी नमूद करत आहोत.
तर मित्रांनो फारशी विषयांतर न करता जाणून घेऊया आजच्या स्वामी समर्थांच्या विशेष प्रकट दिनानिमित्त करता येणाऱ्या एका सोप्या सेवेबद्दल ची सविस्तर माहिती..
मित्रांनो 3 एप्रिल रोजी स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. यादिवशी आपणाला एक मंत्र म्हणायचं आहे. तो एकदा म्हणा, अकरा वेळा म्हणा , एकवीस वेळा म्हणा 51 वेळा म्हणा, 101 वेळा म्हणा, एक हजार एक वेळा म्हणून यापैकी जे शक्य असेल ते तुम्ही करू शकता.
विशेष म्हणजे मित्रांनो या दिवशी तुम्हाला हा मंत्र म्हणण्यासाठी कोणत्याही वेळी ची वाट पाहावी लागणार नाही किंवा कोणताही मुहूर्त पहावा लागणार नाही या दिवशी तुम्ही दिवसभरात तुम्हाला जी वेळ शक्य असेल त्यावेळी हा मंत्र वर सांगितल्याप्रमाणे म्हणायचा आहे.
हा मंत्र म्हणण्यापूर्वी आपण आपले हात पाय स्वच्छ धुऊन स्वामींच्या मूर्ती पुढे किंवा प्रतिमा पुढे दिवा अगरबत्ती करून, फुले असल्यास फुले वाहून आसनस्थ होऊन बसायचे आहे आणि खालील दिलेला मंत्र जितका वेळ आहे त्यावेळी तितका वेळ आपण म्हणायचा आहे.
ओम श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थाय नमः
मित्रांनो हा मंत्र आपणाला या दिवशी म्हणायचा आहे. हा मंत्र सोपा आहे साधा आहे. मात्र मोठा फलदायी व अत्यंत लाभदायी असा हा स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आहे. या मंत्रांमध्ये विशेष अशी शक्ती असल्याचे तुम्ही श्रद्धेने जेव्हा हा मंत्र म्हणाले तेव्हा तुम्हाला अनुभव येतील.
मित्रांनो असा हा मंत्राचा लाभ आतापर्यंत अनेकांनी घेतला आहे स्वामींच्या या सेवेचा लाभ अनेकांनी घेतला आहे.त्यांच्यावर स्वामींची चांगली कृपा दृष्टी देखील झाली आहे. आणि हा लेख आम्ही सो अनुभवावरून येथे नमूद करत आहोत. मित्रांनो आपणही स्वामींची श्रद्धेने मनोभावे पूजा करून हा मंत्र शक्य तितक्या वेळी म्हणा आपली ही निश्चितच सर्व कार्य मार्गी लागतील. आपल्या अनंत अडचणी दूर होतील. आणि आपणाला प्रगतीचा मार्ग दिसेल.
मित्रांनो वरील माहिती विविध सुलतान च्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही कुठल्याही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.