2 एप्रिल गुढीपाडवा: नवीन वर्ष, चैत्र नवरात्र अशा पद्धतीने भरा देवीची ओटी, जे मागाल ते मिळेल!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्याचा सण आहे आणि या दिवसापासून नवीन वर्ष आरंभ होत आहे तर मित्रांनो अशा या शुभ दिवशी आपल्यातील बरेच जण वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतात कारण वस्तू खरेदी करण्यासाठी आणि त्याचबरोबर महत्त्वाची कामे करण्यासाठी घराचे बांधकाम करण्यासाठी हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो आणि त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी लक्ष्मी मातेला किंवा आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी ही आपल्यातील बरेच जण वेगवेगळे उपाय करत असतात मित्रांनो आज आपण आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला असाच एक सोपा उपाय पाहणार आहोत.

मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर माता लक्ष्मी आपल्यावर आणि त्याचबरोबर आपल्या घरावर प्रसन्न होईल त्यामुळे महालक्ष्मीच्या कृपेमुळे आपल्याला काहीच कमी पडणार नाही आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला नी आपल्या कुलदेवतेची किंवा लक्ष्मी मातेची ओटी भरायची आहे. मित्रांनो हे ओटी भरत असताना आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या कोणत्याही देवीची किंवा त्याचबरोबर तुमच्या कुलदेवतेची ही तुम्ही ओटी भरू शकता.

आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही ज्या कोणत्याही देवीला म्हणतात या देवीचीही तुम्ही ओटी भरू शकता परंतु मित्रांनो फक्त विवाहित महिलांनी भरायचे आहे. तर मित्रांनो विवाहित स्त्रियांनी त्यांच्या घराच्या सुख-समृद्धीसाठी आणि पतीच्या प्रगतीसाठी कशा पद्धतीने ओटी भरायची आहे आणि त्याच बरोबर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ओटी भरण्याचा हा उपाय आपल्या घरामध्ये कसा करायचा आहे याबद्दलच आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो या नवीन वर्षामध्ये देवीची ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते. याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात.एका ताटात साडी ठेवावी. आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी.

देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी. कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा. याऐवजी आपण लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा असा रंग निवडू शकता. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ज्याचा रंग देखील शुभ असावा जसा लाल, सोनेरी किंवा इतर.

तसचं संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोपर्‍याची वाटी ठेवावी आणि हळद-कुंकु, हळकुंड, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ आणि खडी साखर देखील असावी.नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी.

ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वहावेत.मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसंच घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवाष्णीला पण देऊ शकता. तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे. मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच देवीची ओटी भरायचे आहे मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने जर आपण आपल्या घरामध्ये देवीची ओटी भरली तर लक्ष्मीमाता आपल्यावर प्रसन्न होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.