गुढीपाडव्याच्या दिवशी करा ‘हा’ उपाय : वर्षभर पैशाची कमतरता भासणार नाही

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, नव वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. आपल्या हिंदू नवीन वर्षाचा प्रारंभ होतो. या दिवशी हिंदु धर्मात गुढीपाडव्याचा उत्सव साजरा करतात. गुढीपाडवा या दिवसापासूनच नववर्षाची सुरुवात होते म्हणून या दिवसाचे जास्त महत्त्व आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त म्हणून हा दिवस मानला जातो.
या दिवशी कोणत्याही कार्याची सुरुवात करणे शुभ असते.

या दिवशी नवीन व्यवसायाला सुरुवात केली तर त्या प्रत्येक कार्यात आपल्याला यश व सफलता मिळते.
या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणेही शुभ असते.

हा आनंदाचा व उत्साहाचा एक सण आहे. या दिवशी जर आपण उपाय केले तर वर्षभर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी किंवा धनसंपत्तीची कमतरता जाणवत नाहीत.

मित्रांनो,गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या उपायांचे आपल्याला खूप प्रभावी परिणाम आपल्या जीवनात दिसून येतात. गुढीपाडव्याच्या दिवशी एक खूप सोपा उपाय आपल्याला करायचा आहे.

या उपायामुळे आपल्याला आपल्या नशिबाची वर्षभर साथ मिळेल. आपल्या प्रत्येक कार्यात आपल्याला यश व सफलता मिळेल. आपल्या प्रत्येक अडचणीतून आपल्याला मार्ग सापडेल.
आपल्या घरातील सर्वांचे आरोग्य व स्वास्थ्य चांगले राहील व आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळत राहील.

चला तर जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी कोणता उपाय आपण करू शकतो ते ….
आपण गुढीपाडव्याच्या दिवशी सुंदरशी गुढी उभारतो. गुढी म्हणजे मांगल्याचे सौख्याचे सुख समृद्धीचे आनंदाचे प्रतीक. या गुढीपाडव्याला आपण काठी, तांब्या, साडी, साखरेची माळ, कडुनिंबाची पाने आणि चाफ्याची फुले यांचा उपयोग करतो.

सर्वात आधी आपण गुढीची काठी स्वच्छ धुवून घेतो. त्यानंतर एका तांब्याला हळदीकुंकवाची पाच बोटे लावतो. या तांब्यावर चाफ्याची माळ साखरेची माळ लावून सुशोभित करतो. सुशोभित केलेली गुढी आपण एका पाटावरती उभी करतो आणि त्या पाटाभोवती देखील रांगोळी काढतो.

गुढीला गोडाचा नैवेद्य करतो म्हणजे पुरणपोळी, पुरी-बासुंदी, शिरा असं काहीही गोड पदार्थांचा नैवेद्य आपण दाखवतो. गुढी दिवसभर उभी केली जाते. मात्र सूर्य मावळायच्या आत गुढी उतरली जाते गुढी उतरताना देखील साखर आणि दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो.

यातील कडू लिंबाच्या पानांचा उपयोग वापर आपल्या उपायासाठी करणार आहोत. ज्यावेळी आपण गुढीचे पूजन करतो गुढी उतरताना गुढीला नैवेद्य अर्पण करतो. गुढी खाली उतरल्यानंतर गुढीला बांधलेले कडुलिंबाची चार-पाच पाने आपण आपल्या तिजोरीत किंवा गल्ल्यात किंवा आपण ज्या ठिकाणी आपले पैसे, धनसंपदा ठेवतो त्या ठिकाणी ठेवायची आहे.

हि पाने ठेवताना अगदी भक्तीभावाने आणि माता लक्ष्मीचे स्मरण करून ठेवावीत. ही पाने आपण आपल्या पाकिटात, पर्समध्ये किंवा आपल्या धनधान्याची कोठारी किंवा डबे असतात तिथेही ठेवू शकतो.

कडू लिंबाचे पाने देवी लक्ष्मीला अर्पण केली जातात. कडुलिंबाची पाने देवी लक्ष्मीला अतिप्रिय आहेत. आयुर्वेदाच्या दृष्टीने हे कडुलिंबाची पाणी अतिशय महत्त्वाचे आहेत बऱ्याच शाळा औषधात कडू लिंबाच्या पानांचा उपयोग केला जातो कडुलिंबाच्या पानांमुळे आपले बरेचसे रोग आपण घालवू शकतो नष्ट करू शकतो.

कडूलिंबाची पाने घरात ठेवल्यामुळे वर्षभर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात.

पण आपण इकडे लक्ष द्यायला हवे की गुढीला वापरलेलीच कडुलिंबाची पाने आपण या उपायासाठी वापरायची आहेत. हा उपाय खूप साधा व सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे. हा सहज साधा उपाय तुम्ही जरूर करा आणि आपले आयुष्य सुखसमृद्धी आणि संपत्तीने भरून टाका.

मित्रांनो हि माहिती तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि कमेंट करुन सांगा कशी वाटली ही माहिती अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या पेज ला सतत भेट देत रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *