चैत्र नवरात्री : यावेळी देवी येणार घोड्यावर स्वार, जाणून घ्या मातेच्या प्रत्येक वाहनाचे महत्त्व आणि परिणाम

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणीनो आता काही दिवसांमध्ये चैत्र नवरात्री ला सुरुवात होत आहे यावे चैत्र नवरात्री केव्हा आहे. व माता यावे कोणत्या वाहनावर येणार आहेत. आणि कोणत्या वाहनावर बसून आल्या आहेत. त्याचे कोणकोणते चांगले आणि अशुभ परिणाम होणार आहेत. चैत्र नवरात्री मध्ये आपण मातांच्या वेगवेगळ्या नऊ रूपांची पूजा करत असतो. वर्षभरामध्ये चार नवरात्री येतात. त्यामध्ये चैत्र, आषाढ, आश्विन आणि माघ महिन्याच्या शुक्लपदी पक्षाच्या पुणे नऊ दिवस नवरात्र असते. याचा नवरात्रीमध्ये दोन गुप्त नवरात्रि व दोन प्रकट नवरात्रि असतात. चैत्र नवरात्री पासून नवीन वर्षाची सुरुवात होते. व त्या दिवशी गुढीपाडवा देखील साजरा केला जातो.

असे मानले जाते की या तिथी मध्ये विश्वाची उत्पत्ती झालेली आहे. यावर्षीची चैत्र नवरात्रि दोन एप्रिलपासून सुरू होणार आहे. आणि चैत्र नवरात्री चा शेवटचा दिवस दहा एप्रिल रोजी असणार आहे. आणि या दिवशी राम नवमी देखील आहे. या चैत्र नवरात्रीच्या वेळी मातेच्या वेगवेगळ्या नऊ रूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते. त्यामुळे मातेच्या वेगवेगळ्या रूपांच्या पूजेचे भक्तांना वेगवेगळे फळ मिळत असते. त्याच बरोबर चैत्र नवरात्री मध्ये कन्या पूजन आला देखील खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की माता या कन्यांच्या रूपावर ने धरतीवर येत असतात. व त्यांची सेवा केल्याने आपल्याला फळ मिळते असे मानले जाते. कि नऊ दिवस माता दुर्गा व श्री गणेश या घटांमध्ये विराजमान असतात.

वर्षातून दोनदा येणाऱ्या नवरात्रीमध्ये प्रत्येक वेळी माता नवीन वाहनाने पृथ्वीवर येते आणि नवीन वाहनातच पृथ्वीवरून देवलोकाचे प्रस्थान करते. या वाहनांचा देश, जग आणि पृथ्वीवर मोठा प्रभाव पडतो. आईची वाहने कोणती आहेत आणि तिचा देश आणि जगाशी काय संबंध आहे ते जाणून घेऊया.हिंदू धर्मात देवी मातेला नेहमी सिंहावर स्वार होताना पाहिले जाते, परंतु नवरात्रीच्या निमित्ताने माता वेगळ्या वाहनावर स्वार होऊन पृथ्वीवर येते. डोली, होडी, घोडा, म्हैस, माणूस आणि हत्ती ही आईची वाहने आहेत. व येथील भक्तांना शुभ आशीर्वाद देतात त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात.

दिवसाच्या आधारे आईचे वाहन ठरविले जाते सोमवार किंवा रविवारपासून नवरात्र सुरू होत असेल तर मातेचे वाहन हत्ती आहे.नवरात्र शनिवार किंवा मंगळवारपासून सुरू होत असेल तर मातेचे वाहन घोडा असते.गुरुवार किंवा शुक्रवारपासून नवरात्र सुरू झाली तर आई डोलीत बसून येते.बुधवारपासून नवरात्र सुरू होत असेल, तर आई बोटीने येते. दिवसानुसार देवीचे वाहन करत असते त्यानुसार त्याचे परिणाम देखील आपल्यावर होत असतात

वाहन परिणाम
देवी भागवतांच्या एका श्लोकातून ही वस्तुस्थिती व्यवस्थित सांगितली आहे.”शशिसूर्ये गजरुधा शनिभौमे तुरंगमे।
गुरु शुक्रे चडोलायना बुधे नौक प्रकीर्तिता।”म्हणजे जेव्हा माता हत्तीवर स्वार होऊन पृथ्वीवर येते तेव्हा पाऊस अधिक पडतो, ती घोड्यावर आली की युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, ती बोटीवर आली तर सर्व काही चांगले होते आणि शुभ फलदायी होते. आई डोलीत बसून आली तर महामारी, उच्चाटन होण्याची शक्यता असते.

या वर्षी म्हणजेच 2022 च्या चैत्र नवरात्रीमध्ये देवी माता घोड्यावर स्वार होऊन येत असून युद्धाची शक्यता असल्याने तिची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आपणास माहित आहे.की सध्या जगातील दोन देश रशिया आणि युक्रेन यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे.

आणि इतर अनेक देशांना त्याचा त्रास होत आहे.आईची निघण्याची वाहने वेगळी आहेत.म्हणजेच रविवारी किंवा सोमवारी देवी म्हशीच्या स्वारीवर निघाली तर देशात रोगराई आणि दुःख वाढते.शनिवारी किंवा मंगळवारी मातृदेवता कोंबड्यावर गेल्यास जनमानसात दु:ख आणि त्रास वाढतो.

बुधवार किंवा शुक्रवारी मातृदेवता हत्तीवर स्वार होऊन निघून गेल्यास पाऊस जास्त पडतो.गुरुवारी माँ दुर्गा मानवी स्वारीवर जाते आणि याचा अर्थ मानवता वाढेल, आनंद आणि शांती राहील. अशाप्रकारे चैत्र नवरात्री व त्यांच्या वाहनांचे आपल्या वर अशाप्रकारे प्रभाव पडत असतात.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशा प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.