28 मार्च : पापमोचनी एकादशी : महापाप नष्ट करणारी एकादशी : हे व्रत का व कसे करावे?

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो उद्या 28 मार्च रोजी पापमोचनी एकादशी आहे. या एकादशीला विशेष महत्त्व आहे कारण या एकादशी दिवशी महापाप देखील नष्ट होते असे म्हटले जाते. तर मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण हे व्रत का व कसे करावे याबद्दलची विशेष माहिती आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपणाला हे माहित आहे की सर्वच देवी-देवतांना वेगवेगळे महत्व असून, प्रत्येक देवाची पूजा, आराधना साठी अगणीत उपवास आणि त्याचे भिन्न भिन्न महत्व शास्त्रात नमुद करण्यात आले आहे. विष्णु देवांना सृष्टिचा पालनकर्ता मानले जाते आणि त्यांची उपासना केल्याने आपल्या सर्वांना सुख, समृद्धी आणि संपत्ती मिळते.

मित्रांनो विष्णूजींची पूजा करण्यासाठी प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षात पडणारी एकादशी पपामोचीनी एकादशी म्हणून ओळखली जाते. यावेळी पापमोचनी एकादशी २८ मार्च रोजी आहे. पुराणात असे म्हटले आहे की पापमोचनी एकादशीचे व्रत करणे अत्यंत शुभ फलदायी आहे.

मित्रांनो पापमोचनी एकादशी ही नावाप्रमाणे सर्व पापांचे नाश करणारी एकादशी आहे. हे व्रत सर्वांनी केले पाहिजे असे पुराणात म्हटले आहे. आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे परिमार्जन व्हावे यासाठी हे व्रत केले जाते. असे म्हणतात, कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, त्या परिस्थितीत हे व्रत भक्तिभावाने केले असता भगवंताची कृपा लाभते. येत्या २८ मार्च रोजी सोमवारी पापमोचनी एकादशी आहे. योगायोगाने त्याच दिवशी जागतिक आरोग्य दिनसुद्धा आहे. एकादशीचे व्रत आरोग्यदायी आहे. त्यामुळे हे व्रत केले असता त्या दिवसाचे महत्त्व दोन्ही बाजूंनी पूर्ण होऊ शकेल.

म्हणूनच मित्रांनो आपल्या शास्त्रात एकादशी व्रताला अतिशय महत्त्व दिले आहे. हे व्रत केल्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रहांचा दुष्परिणाम कमी होऊन चांगले आयुरारोग्य लाभते. कारण ही तिथी भगवान विष्णू यांची आवडती तिथी आहे. त्यामुळे हे व्रत करणाऱ्याला विष्णूंची कृपा प्राप्त होऊन चन्द्र, मंगळ, शनी आदी ग्रहांकडून होणाऱ्या विपरीत प्रभावापासून स्वतःचा बचाव करता येतो. या व्रताचा परिणाम शरीरावर आणि मनावर पडतो. एकादशीचे पवित्र व्रत केले असता, मनातील विकार नष्ट होतात. तसेच पापमोचनी एकादशी व्रत केले असता, आजवर घडलेल्या पापातून मुक्तता होते आणि मनावरील दडपण दूर होते. अजाणतेपणी झालेल्या चुकांची देवाकडे क्षमा मागून आयुष्याची नवी सुरुवात करता येते.

फाल्गुन कृष्ण एकादशीला येणारी तिथी पापमोचनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या एकादशीला भगवान विष्णूंना पिवळे फुल वहावे आणि नवग्रहांची देखील पूजा करावी. दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी एकादशीचा उपास सोडावा. उपासाला फलाहार करावा, बाकी पदार्थ खाऊ नयेत. ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नमः’ हा भगवान महाविष्णूंचा जप करावा. तसेच विष्णू सहस्रनाम आणि नवग्रह स्तोत्र यांचे पठण किंवा श्रवण करावे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो यादिवशी व्रताच्या दिवशी सूर्योदयावेळी उठा आणि स्नान केल्यावर व्रताचा संकल्प करा. यानंतर, गणेशाचे ध्यान करा आणि पूजा यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करा. यानंतर भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करा आणि धूप, दीप, चंदन, फुले, फळे, कपडे, भोग आणि दक्षिणा द्या. पापामोचनी व्रताची कथा वाचा आणि नंतर आरती करा. दिवसभर व्रत ठेवा. रात्री जागरण भजन कीर्तन करा. दुसर्‍या दिवशी द्वादशीला गरजूंना जेवण खाऊ घाला आणि दान द्या आणि मगच आपला व्रत सोडा.

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार मन: शांती सह जीवन जगण्याच्या इच्छेने हे व्रत पाळले जाते. एकादशीचे सर्व व्रत अतिशय शुभ असतात. या पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने शेकडो हवन केल्या सारखे फळ मिळते आणि या दिवशी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून जल व अन्नाचा त्याग करून व्रताचे व्रत करावे. दिवसाच्या एका वेळी थोडे से पाणी आणि फळे घेऊ शकता. या दिवशी दान करावे आणि गरिबांना आणि ब्राह्मणांना सन्मान पूर्वक भोजन द्यावे. या दिवशी भगवान श्री हरींच्या उपासने कडे पूर्ण लक्ष द्यावे आणि या एकादशीचा उत्सव उपवास व पूजा करून साजरा करावा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.