नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो नैवेद्य दाखवताना बोला फक्त हे दोन शब्द यामुळे तुमचे देवता प्रसन्न होतील तुम्हाला आशीर्वाद लागतील आणि तुमचे भाग्य बदलून जाईल.
मित्रांनो आपण घरामध्ये रोज नित्यनियमाने देवांची पूजा करत असतो. पूजा झाल्यानंतर आपल्या घरी जे काही अन्न बनवले आहे त्याचा नैवेद्य आपण दाखवतो. आप्पा कुठलाही देव असेल त्याच्यावर आपली श्रद्धा असेल अशा देवांची आपण रोज पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवत असतो.
सेवेकरी असेल तर तो महाराजांची दैनंदिन पूजा आटोपून नैवेद्य दाखवतात. जेवण वगैरे तयार नसल्यास दूध, साखर, किंवा कोणते तरी फळ हे नैवेद्य म्हणून आपण दाखवत असतो. नैवेद्य हा दाखवला पाहिजे हा एक भक्ती मार्गातील श्रद्धेचा मोठा भाग आहे.
पण मित्रांनो हा नैवेद्य दाखवत असताना तुम्ही फक्त हे दोन शब्द म्हणा. यामुळे आपले देव, देवता, स्वामी समर्थ महाराज यांची आपल्यावर तात्काळ कृपा होईल. आपणाला निश्चित असे यश मिळेल. आणि सहाजिकच आपले भाग्य उजळून निघेल.
कोणते शब्द:
मित्रांनो नैवेद्य दाखवताना जे शब्द म्हणायचे आहेत ते खालील प्रमाणे.
भोजन समर्पयामि
मित्रांनो केव्हा पण नैवेद्य दाखवतो त्यावेळी नैवेद्याच्या ताटाभोवती हातातून पाणी आपण फिरवत असतो. त्यावेळी हे दोन शब्द दोन दोन वेळा म्हणायचे आहेत.
यानंतर हा नैवेद्य थोड्यावेळासाठी तेथेच ठेवायचा आहे.आणि नंतर जेवणाच्या वेळी घरातली कुठल्याही एका सदस्याने तो नैवेद्य प्रसाद म्हणून खाल्ला तरी चालेल किंवा तो नैवेद्य संपूर्ण जीवनात विसरून घरातील प्रत्येक सदस्यांनी खाल्ले तरी चालेल.
पण मित्रांनो नैवेद्य दाखवताना वरील दोन्ही शब्द मोठ्या भक्तीने व श्रद्धेने म्हणा. जेणेकरून आपली आर्त हाक आपल्या भगवंता पर्यंत पोहोचेल. आणि आपल्या भगवंताची आपल्यावर कृपा होईल.
आणि यामुळे सहाजिकच मित्रांनो आपले भाग्य चमकेल. तुम्ही करत असलेल्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये चांगली प्रगती होईल. घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल. माता लक्ष्मी चा वास होईल. मुलाबाळांची चांगली प्रगती होईल. तर वडीलधाऱ्या मंडळींचे आरोग्य चांगले राहील.
मित्रांनो आम्ही सांगत असलेले उपायांचे योग्य पद्धतीने वापर करा त्याचबरोबर आपण करत असलेल्या कामाला उद्योगांमध्ये स्वतःला झोकून देऊन काम करा आपणाला भरपूर यश समाधान समृद्धी लाभेल हे नक्की.
हा अनुभव आम्ही स्वतः घेतलेला आहे.याचा आम्हाला भरपूर असा लाभही मिळाला आहे. आपणही हा उपाय करून पाहू शकता.
वरील माहिती ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातून तसेच विविध शास्त्राच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या उपायांसाठी त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती संतान प्राप्ति ज्योतिष शास्त्र वास्तुशास्त्र अशा वेगवेगळ्या समस्यांवरील उपायांसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.