देवघरात कोणतेही नवीन मूर्ती ठेवण्याआधी घरातच सोप्या रीतीने अभिषेक करा, मगच मूर्ती ठेवा !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्रांनो घरामध्ये सुख-समृद्धी नांदावे आणि त्याचबरोबर देवी-देवतांचा आशीर्वाद आपल्यावर रहावा यासाठी आपल्यातील बरेच जण खूप मेहनत घेत असतात आणि त्याच बरोबर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या देवी-देवतांची पूजा-अर्चा देखील करत असतात परंतु मित्रांनो आपल्या देवघरामध्ये नवीन मुर्त्या आणल्यानंतर याची कशा पद्धतीने मांडणी करावी आणि त्यामुळे नवीन मूर्त्यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये कशा पद्धतीने करावी याबद्दल आपल्यातील बऱ्याच जणांना माहिती नसते आणि त्यामुळे आपल्यातील बरेच जण मूर्ती आणल्या नंतर लगेचच ती देवघरामध्ये ठेवतात.

त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील बरेच जण आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या देवी-देवतांच्या मूर्त्यांची स्थापना करत असतात, परंतु मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेऊ नये, जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकराएवढे असावे, असे सांगितले जाते. तसेच देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते. एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य मानले गेले आहे. अन्य देवी-देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात.

परंतु मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्र मध्ये देवघरातील पूजे संबंधित अनेक नियम सांगितले आहेत, म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रानुसार आपल्याला कोणत्याही देवी देवीची मूर्ती गुरूवारच्या दिवशी खरेदी करायची आहे आणि गुरुवार च्या दिवशी देवी-देवतांची मूर्ती खरेदी केल्यानंतर त्याच दिवशी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी आपल्याला या मूर्तींची आपल्या घरांमध्ये स्थापना करत असताना त्या मूर्तींना अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतरच त्यांची आपल्या देवघरामध्ये स्थापना करायचे आहे, नवीन मूर्तीला अभिषेक घालत असताना देवघरामध्ये जाऊन एका ताटामध्ये आपल्याला नवीन आणलेली मूर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या मूर्तीला हळदी कुंकू किंवा अष्टगंध वहायचे आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थांच्या स्वामिसुत याचे वाचन करत असताना आपल्याला त्या मूर्तीला पंचामृत वाचा आणि पाण्याचा अभिषेक घालायचा आहे.

मित्रांनो जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये नवीन मूर्तीची स्थापना करणार असून यावेळी आपल्याला त्या मूर्तीला सर्वात आधी पंचामृत आणि पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि हा अभिषेक घालत असताना स्वामी समर्थांच्या स्वामिसुत चे वाचन करत करत आपल्याला आभिषेक त्या देवी देवकीला घालायचा आहे आणि त्यानंतर ती मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून पुन्हा एकदा हळदी-कुंकू किंवा अष्टगंध त्या मूर्तीला वाहून त्याच बरोबर अक्षदा वाहून त्या मूर्तीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतरच त्या मूर्तीची स्थापना आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचे आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने नवीन आणलेल्या मूर्तीला अभिषेक घातल्या नंतरच त्या मूर्तीची स्थापना आपण आपल्या देवघरामध्ये करायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने त्या देवी देवतेला अभिषेक घालून तिची विधिवत पूजा करून जर आपण त्याची देवघरामध्ये स्थापना केली तर यामुळे की देवी देवता आणि त्याच बरोबर स्वामी समर्थ ही आपल्यावर प्रसन्न होतील आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल आणि त्याचबरोबर घरातील गरिबी दूर होण्यास मदत होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *